शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

होता है जो लव्हसे जादा वैसेवाला लव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 08:00 IST

वरवरच्या सेलिब्रेशनचा व्हॅलेण्टाइन्स डे तर साजरा झाला आता आपल्या प्रेमाचा, नात्याचा आणि त्यातल्या रसरशीत रोमान्सचा खराखुरा विचार करून पाहू.

ठळक मुद्देलास्ट सिन. स्टेट्स. पीडीए. यापलीकडे जातं कधी तुमचं प्रेम?

- गौरी पटवर्धन

लाँग ड्राइव्ह. रोड ट्रिप. सेलिब्रेशन. स्पेशल फील. गिफ्ट्स. चॅट्स. बाइक. हॉटेल. शारीरिक आकर्षण. शारीरिक जवळीक.प्रॅक्टिकली विचार करता हा मसावि आहे. आताच्या अनेक अफेअर्समधल्या महत्त्वाच्या शब्दांचा. अनेक अफेअर्स किंवा खरं तर प्रेम प्रकरणंच म्हणू, एवढय़ा शब्दांमध्ये मांडून संपून जातात. म्हणजे त्यातलं प्रेम खरं असतं. भावना प्रामाणिकच असतात; पण ते सगळं या गोष्टींच्या पलीकडे जातच नाही.असं का होत असेल जरा विचार करून पाहू, म्हणजे होऊन गेला ना आता सेलिब्रेशनचा व्हॅलेण्टाइन्स डे तर आता जरा खराखुरा विचार करून पाहू.तर पहा म्हणजे प्रेमात पडलेल्या अनेकांचं त्या शब्दांच्या मर्यादेपलीकडे काही होतं का?प्रेमात असलेल्या त्या दोघांना हातात हात घालून बेवजह फिरणं येतच नाही. पावसात टपरीवरचा चहा अर्धा अर्धा पिणं राहून जातं. तासन्तास काहीच न करता एकमेकांबरोबर घालवायला वेळच नसतो. आणि मग नात्याचा बेस बनतच नाही.कारण नात्याचा बेस हॉटेलमध्ये बनत नाही, टेडी बेअर्स आणि चॉकलेट्सनी बनत नाही, बर्थ डेच्या दिवशी स्पेशल फील देणार्‍या पार्टीतून बनत नाही आणि घाईघाईने केलेल्या शारीरिक जवळिकीतून तर अजिबातच बनत नाही.नात्याचा सगळ्यात भक्कम पाया तयार होतो तो बाजारात पैशानं विकत न मिळणार्‍या गोष्टींतून.सहज करायला घ्या यादी, बरंच काही सापडेल.कुठल्यातरी हिरवळीवर दोघंच गप्पा मारत बसलेले असताना एक क्षण असा येतो, की तो नव्याने तिच्या प्रेमात पडतो. तिचं एखादं वाक्य, एखादा विचार, एखादी अदा त्याला नव्याने घायाळ करते. आणि मग तो तिथल्या तिथेच असणारं एखादं नखाएवढं फूल तोडून तिला परत प्रपोज करतो. तीपण स्टाइलमध्ये त्याला होकार देऊन ते फूल वहीत ठेवून देते. ते फूल त्यानंतरच्या कित्येक कातर क्षणांना तिला सोबत करतं. कारण ते फक्त त्या दोघांमधलं असतं. असं फूल, अशी घटना, अशी आठवण इतर कोणाच्याच आयुष्यात नसते. ती त्या दोघांची युनिक आठवण असते. आणि नातं म्हणजे तरी दुसरं काय असतं? स्वतर्‍मध्ये विरघळलेल्या हळुवार आठवणींची साखळी म्हणजे नातं. अशी साखळी जी कोणी बनवू शकत नाही आणि बिघडवूही शकत नाही.मग अशा आठवणी विकतच्या वस्तूंमध्ये नसतात का? तर असतात ना. जरूर असतात. पण त्या आपल्यासारख्या अनेकांच्या असतात. अनेक जणांनी त्याच दुकानातून तसंच हार्ट विकत घेतलेलं असतं आणि ‘तिला’ दिलेलं असतं. त्यातलेच आपणही एक. त्याच हॉटेलमध्ये अनेकांनी ‘तिला’ आणलेलं असतं आणि बिल भरलेलं असतं. त्यातलेच आपणही एक.पण ‘अगं आज मी शिरा करून बघते’ असं म्हणून शिरा करून तो डब्यात आणून दोघांनी खाण्यात तिसर्‍या कोणाची लुडबुड नसते. तो आपण आपल्यापुरता जगलेला क्षण असतो.असे जितके क्षण नात्यात येत जातात तितकी एकमेकांची खरी ओळख होत जाते. तो रोमँटिक आहे का अगदी प्रॅक्टिकल हे समजतं. ती नखरेल आहे का अ‍ॅडजस्ट करणारी आहे याचा अंदाज येतो. नाही तर फक्त एकमेकांच्या खिशात किती पैसे आहेत ते समजत राहतं. अर्थात काही नाती तेवढाच हिशोब मांडत असतात; पण ती आपण सोडून देऊया. ती जमातच वेगळी असते. त्यांचा प्रेम या गोष्टीशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो.पण ज्यांचं प्रेम खरं असतं, ते तरी नातं रुजायला पुरेसा वेळ, पुरेशी उसंत देतात का? नुसती तोंडाला फडकी बांधून शहरातल्या आडोश्याआडोश्याने थांबण्यात नातं गवसत नाही. एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या विश्वासावर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून अंगावर भणाणता वारा घेत लांबच्या बाइक राइडमध्ये नातं गवसतं. जराश्या गावाबाहेरच्या टेकडीवर दुपारी जाऊन बसायचं आणि मग सूर्यास्त होऊन एकेक दिवा लागून सगळं शहर प्रकाशाने उजळून निघालेलं बघायचं यात नातं गवसतं. एकमेकांच्या क्लासमध्ये चोरून बसण्यानं नातं गवसतं.एकमेकांशी तासचे तास बोलत बसण्यातून नातं उलगडतं. आणि खोल मनातलं, खरं खरं सांगून टाकण्यानं आणि ऐकून घेण्यानं नातं बहरत जातं. आपल्याला वाटणारी भीती, काळजी, आपल्या मनातले न्यूनगंड, आपली खरी खरी स्वप्नं शेअर केल्याशिवाय नात्याला खोली येत नाही. आणि मुख्य म्हणजे हे सगळं समोरासमोर, मोबाइल बाजूला ठेवून देऊन केल्याशिवाय नात्याला अर्थ येत नाही. कारण समोर बसून बोलणारा माणूस आपल्याला संपूर्ण समजतो. कारण त्याच्या शब्दांबरोबर त्याचा चेहेरा बोलतो, डोळे बोलतात, हावभाव बोलतात, संपूर्ण शरीर बोलतं. मग या मनीचा त्या मनी विश्वास वाटतो. समोरासमोर बोलताना एका वेळी दोन चॅट विंडोज उघडता येत नाहीत. तेवढा आश्वस्तपणा आला की नातं मजबूत बनत जातं. आपण एकमेकांसाठी नेमके काय आहोत याचं भान येत जातं. आपल्यासाठी आपलं नातं काय आहे याची किंमत समजत जाते. मगच माणसं एकमेकांसाठी त्याग करायला, कठीण दिवसांना तोंड द्यायला, संकटं झेलायला तयार होतात. आणि हे सगळं नीट उमगलं तर मग मरेपर्यंत एकमेकांना धरून ठेवणारी नाती जन्माला येतात..आपलं नातं आहे का असं.विचारावं ज्यानं त्यानं/जिनं तिनं स्वतर्‍ला.

(गौरी मुक्त पत्रकार आहे.)