राजेश खन्ना - एका तरुण पिढीचा सच्चा सुपरस्टार

By Admin | Updated: July 18, 2016 16:21 IST2016-07-18T16:09:50+5:302016-07-18T16:21:10+5:30

आज त्याला जाऊन ४ वर्षे झाली.. त्याची आठवण आली की सोबत बरंच काही आठवतं. पाकिस्तान आणि चीन सोबतची लागोपाठची युद्धं, दुष्काळ, आणीबाणी आणि भारताच्या निर्मितीपासून पाचवीला पुजलेल्या आर्थिक मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून जाणा-या भारतीय जनमानसाला स्वप्नाच्या दुनियेची सफर घडवून आणणारा एक सुपरस्टार हवा होता.

Rajesh Khanna - The true superstar of a young generation | राजेश खन्ना - एका तरुण पिढीचा सच्चा सुपरस्टार

राजेश खन्ना - एका तरुण पिढीचा सच्चा सुपरस्टार

आज त्याला जाऊन ४ वर्षे झाली.. त्याची आठवण आली की सोबत बरंच काही आठवतं.
पाकिस्तान आणि चीन सोबतची लागोपाठची युद्धं, दुष्काळ, आणीबाणी आणि भारताच्या निर्मितीपासून पाचवीला पुजलेल्या आर्थिक मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून जाणा-या भारतीय जनमानसाला स्वप्नाच्या दुनियेची सफर घडवून आणणारा एक सुपरस्टार हवा होता. 
निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंता हे त्या सुपरस्टारला जन्माला घालणारे त्या काळचे अफलातून रसायन होते. 
आणि त्या सुपरस्टारचं नाव होतं, राजेश खन्ना. त्याचे व्यक्तिमत्त्व लौकिकार्थाने नायकाचे नव्हते. किंबहुना त्याची बेडौल शरीरयष्टी, त्याचे ते हातवारे करणे, मान वाकडी करणे, गुरु शर्ट घालून वावरणे आणि काहीशी अवघडलेली देहबोली थोडी खटकणारीच होती. कलाकृतींना प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि पाशर््वगायकांची उत्तम साथ लाभल्याने त्याला सुपरस्टारपदाकडे नेणारा मार्ग अलगद निर्माण व्हायचा. 
ये दुनिया बडी जालीम रे पुष्पा हा भावविभोर संवाद किंवा ए..बाबू मोशाय ही हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक, प्रेक्षकमनाचा ठाव घेत होती. राजेश खन्नाचे पडद्यावर लाडीगोडी करणे, आपल्या हळुवार आवाजाने त्याचे साद घालणे... सारे काही विलक्षण होते.
किशोरच्या आवाजाने सजलेली, आर.डी/ एल.पी.च्या संगीताने नटलेली, पडद्यावर खास राजेश खन्ना स्टाइलची एकाहून एक सरस गाणी. त्याचे सुपरस्टारडम अधिक उजळवणारी होती. अशा या सुपरस्टारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. जतीन खन्ना हे त्याचे मुळ नाव. बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करताना त्याने आपले नाव बदलून राजेश खन्ना केले होते.
काका या नावानेही ते प्रसिद्ध होते. काका हे टोपणनाव कसे मिळाले, हे खुद्द काकांनीच सांगितले. आयफा पुरस्कार सोहळ््यादरम्यान त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले मी पंजाबी, काका या शब्दाचा अर्थ पंजाबीमध्ये लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा सिनेजगतात पाऊल ठेवले, त्यावेळी मी तरुण होतो. व्यक्तीमत्त्वही तसेच होते. त्यामुळे मला सर्वजण काका म्हणू लागले. अनेक वेळा पंजाबीमध्ये काके अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारायचे. हळूहळू हेच नाव लोकप्रिय झाले. पुढे काका या शब्दाला एक जी लागला. लोक आदराने काकाजी म्हणू लागले. 
त्याचे ओझरते का होईना दर्शन व्हावे, यासाठी त्याच्या प्रसिद्ध आशीर्वाद बंगल्यासमोर ऊन-पाऊस आणि वयाची तमा न बाळगता दिवस-दिवस उभे राहण्याचा तरु णींचा तो काळ. म्हणूनच जेव्हा त्याने चाहत्यांना गुंगारा देत सोळा वर्षीय डिंपल कपाडियाशी लग्न केले, तेव्हा देशातील लाखो चाहत्यांचा हृदयभंग झाला होता. नैराश्याच्या भरात हाताच्या शिरा अनेकींनी कापून घेतल्याच्या बातम्या देखील चर्चेत होत्या.
आपली उंची जीवनशैली त्याने शेवटपर्यंत ठेवले होते. मात्र काळ थांबत नाही, हा सुपरस्टार अखेरच्या टप्प्यात विस्मरणाच्या वाटेवर गेलाच..
एक मात्र नक्की अपयशाने त्याच्यातील कलाकार कधी संपला नाही. त्यामुळेच ते छातीठोक पणे म्हणाले होते, पुन्हा जन्म झालाच तर राजेश खन्ना बनून त्याच चुका करण्याची इच्छा आहे. 
कारण आनंद कधी रडत नसतो..
त्याला डोळ्यातील आसवांची चिड होतीच..


- निलेश बुधावले

Web Title: Rajesh Khanna - The true superstar of a young generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.