राहीचं सुवर्ण सातत्य

By Admin | Updated: August 7, 2014 21:42 IST2014-08-07T21:42:30+5:302014-08-07T21:42:30+5:30

कोल्हापूरच्या या विजयगाथेत सुवर्णाचं पान लिहिलं ते राही सरनौबतनं.

Rahi's golden continuity | राहीचं सुवर्ण सातत्य

राहीचं सुवर्ण सातत्य

कोल्हापूरच्या या विजयगाथेत सुवर्णाचं पान लिहिलं ते राही सरनौबतनं.
२५ मीटर पिस्तूल शुटिंगमध्ये तिनं भारताच्या अनिसा सैय्यसला मागे टाकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. २0१0 मध्ये झालेल्या दिल्लीतल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिनं दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. शुटिंग वर्ल्डकपमध्येही तिनं सुवर्णपदक जिंकलं होतं. तिचा हा गोल्ड मेडल जिंकण्याचा सिलसिला याही स्पर्धेत कायम राहिला. राहीच्या सुवर्ण सातत्याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.

 

Web Title: Rahi's golden continuity