ढिंकचिका.?
By Admin | Updated: February 5, 2015 18:46 IST2015-02-05T18:46:24+5:302015-02-05T18:46:24+5:30
नवी नोकरी, नवाकोरा ब्रॅण्डेड मोबइल, बढीया है! ऑफिसात तो स्मार्टफोन लोकांनी पहावा म्हणून टेबलावरच ठेवला जातो

ढिंकचिका.?
निकीता देसाई -
नवी नोकरी, नवाकोरा ब्रॅण्डेड मोबइल, बढीया है! ऑफिसात तो स्मार्टफोन लोकांनी पहावा म्हणून टेबलावरच ठेवला जातो; आणि सिंघममधल्या ‘गोट्या’सारखा तो सतत ‘ढिंक चिका-ढिंग चिका’ वाजतच राहतो. सतत मोठय़ा आवाजात वाजतो, कधी गाणी, तर कधी कोकिळेचे, कुत्र्याचे, मांजराचे आवाज.
सगळं ऑफिस डिस्टर्ब होतं, लोकं कावतात, हसतात, पण ज्याचा मोबाइल त्याला हे कळत नाही की, मोबाइल ‘असा’ वाजणं, म्हणजे आपल्याला काहीच ऑफिस एटीकेट्स नाही, हे आपणच कोकलून सांगणं.
असं होतं का तुमचंही?
मग हे लक्षात ठेवा.
* मोबाइलवर लाउड रिंगटोन वाजणं, कसकसले आवाज वाजणं हे आपल्याच ‘उथळ’ आणि ‘उल्लू’ पर्सनॅलिटिचं लक्षण आहे. मी असाच उल्लू आहे, हे तुम्ही त्यातून लोकांना सांगता.
* आपला मोबाइल वाजत असताना आपण जागेवर नसणं, लोकांना त्रास होणं, हे नव्यासंदर्भात अत्यंत ‘अशिष्ट’ आणि ‘असभ्य’ मानलं जातं.
* त्यामुळे ऑफिसात पोहोचताच मोबाइल सायलेण्टवरच ठेवायला हवा.
* रिंगटोन ठेवायचीच असेल, तर हळू आवाजात, अत्यंत सोबर ट्यून असावी, शक्यतो ती तुमच्याशिवाय दुसर्या कुणाला ऐकू जाऊ नये.
* ऑफिसात असताना तिसरी रिंग वाजली जायच्या आत तुम्ही फोन उचलायला हवा किंवा घ्यायचा नसेल, तर कट तरी करायला हवा.