शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

तसलं तर काही पाहत नाही? -पबजीच्या क्रेझवर तरुणांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:23 PM

पबजी खेळत होतो; पण तसलं म्हणजे पोर्न तर पाहत नव्हतो असं तरुण मुलं का सांगतात?

ठळक मुद्देएक गेम काय बॅन झाला. जगण्याचं रिकामपणही असं जगजाहीर झालं. 

- प्रगती जाधव-पाटील, 

लॉकडाऊनच्या सहा महिन्यांत पबजीने आम्हा मित्रांमध्ये अनोखं नातं रूढ केलं.. वर्षानुवर्षे ज्यांच्यासोबत शिक्षण घेतलं त्यांच्याबरोबर टय़ूनिंग जुळलं ते या खेळामुळेच.. पबजी हा स्ट्रॅटजी गेम आहे. त्याचं व्यसन नाही लागतं. मात्र स्ट्रेस रिलीज करण्याचा आम्हा सर्वाचा उत्तम पर्याय होता.. -तो सांगत असतो. पबजीवर बंदी आल्यानंतर या खेळाचे शौकीन असणारी तरुणाई अक्षरशर्‍ दुर्‍खात बुडाली होती. या गेमवर उदरनिर्वाह असणारे स्ट्रिमर तर अक्षरशर्‍ उद्ध्वस्त होऊन समाजमाध्यमांद्वारे आपली हतबलता व्यक्त करत आहेत. काहींनी तर कुटुंबीयांशी बंड करून हा खेळ खेळण्यासाठी घर सोडलं होतं. पाश्र्वभूमीवर सातारा तालुक्यातील करंजे गावचा सुमित काळभोर, पबजी तोही खेळायचा. लॉकडाऊन काळात सकाळी 9 र्पयत उठून आवरून 11 ते 1 या वेळेत तो वॉर्मअप मॅच खेळायचा. दुपारी 2 ते सायंकाळी 6 असं चार तास मुख्य गेम खेळली जायची. त्यानंतर डोळ्यांना विश्रांती आणि मोबाइल चाजिर्गच्या निमित्ताने गेम बंद ठेवली जायची. सायंकाळी सातनंतर लॅपटॉपवर सोशल मीडियाद्वारे ‘स्ट्रिमर ट्रीक्स’ बघण्यात तास दीडतास सहज जायचा. घराल्यांबरोबर रात्रीचं जेवण झालं की दहा ते अकरा वॉर्मअप गेम व्हायची. साडेअकरा नंतर पुढं किमान चार तास स्ट्रॅटजी करून ही गेम पहाटेर्पयत असं अनेकांचं रूटीन होतं.

आता मात्र अनेकांनी रात्री लवकर झोपणं स्वीकारलं आहे किंवा नव्या खेळांचा शोधही सुरू केला आहे. त्यात अनेक स्ट्रिमरची क्रेझ असते ती वेगळीच. बॉलिवूडच्या तार्‍यांपेक्षाही अधिक फॅन फॉलोईंग स्ट्रिमर मुलांची असते हे तरुणाईच्या विश्वातलं वास्तव आहे. सध्या स्ट्रिमर कॉल ऑफ डय़ूटी (सीओडी), ह्युमन फॉल फ्लॅट नावाचे नवे गेमही तरुणांच्या हाती दिसू लागलेत. ‘फौजी’ गेमची चर्चाही सुरू झाली आहे.त्यात एक वाक्य अनेकजण ऐकवतात.  ‘तसलं’ बघण्यापेक्षा पब्जी बरं!लॉकडाऊनच्या काळात होस्टेलमधून घरी आलेल्या अनेक मुलांना एकटं वाटत होतं. म्हणून त्यांनी या गेमचा आधार घेतला. सोशल मीडियावर वाट्टेल ते बघण्यापेक्षा ही गेम खेळणं कधीही सरस असा युक्तिवाद या तरुणाईचा आहे. विशेष म्हणजे जगभरात अनेक वयोगटांमध्ये पॉर्न व्हिडिओ बघण्याचे प्रमाण अधिक आहे. आपण तसलं तर काही पाहत नव्हतो ना, असंही अनेकजण सांगतात.एक गेम काय बॅन झाला.जगण्याचं रिकामपणही असं जगजाहीर झालं. 

(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे)