- रोहित नाइक
‘भावा, टेन्शन नही लेने का.. अपना गेम कोरिअन है.. चील मार, नही बॅन होगा’‘यस ब्रो, काय नाय बॅनबिन होत. बिनधास्त खेळू आपण.’- हा जो काही भारीचा कॉन्फिडन्स होता ना पबजी सैनिकांचा, त्याच कॉन्फिडन्सला सरकारने ‘हेडशॉट’ दिलाय. तोपण ‘पट्ट से.!’पबजी.. म्हणजेच प्लेअर अननोन बॅटलग्राउण्ड्स. या एका मोबाइल गेमने आख्ख्या जगाला वेड लावलं. तरुणच नाही तर शालेय विद्यार्थीही पबजी खेळताना दिसत. त्याला आवड म्हणा, नाहीतर अॅडिक्शन. बहुतांश पोरं, ‘विनर विनर चिकन डीनर’ म्हणत सुटली होती.आणि फटक्यात पबजी बॅन झालं, तर अनेकजण हतबल झाले. रडले. त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. लॉकडाऊनने पकलेले पबजी गेल्यानं पार हरवून गेले. त्यात पबजी प्लेअर्सपैकी 24 टक्के प्लेअर्स एकटय़ा भारतात आहेत. त्यात पुन्हा मुलगेच नाही तर मुलीही हा गेम मोठय़ा प्रमाणात खेळत. म्हणायला हा गेम खुनशी. जिंकण्यासाठी दुसर्याला मारलंच पाहिजे, हे आपोआप इथं डोक्यात रुजायला लागतं.आता प्रश्न पडतो की, तरी यामध्ये एक्सायटिंग किंवा चॅलेंजिंग असं काय होतं. काय होतं नेमकं, की पोरांना जेवायला, पाणी प्यायला इतकंच काय वेळेचंही भान राहायचं नाही. सगळ्यात मोठं होतं, खेळणार्या 100 लोकांमध्ये अखेर्पयत जिवंत राहण्याचं आव्हान. गेम मोबाइलवर असला तरी ते प्रत्यक्षात घडतंय, आपण घडवतोय असं वाटायचं. लपून छपून राहत, कोणाच्याही दृष्टीस न पडता, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आखून जिवंत राहायचं. बरं जर कोणी नकळत आपल्याला शूट केलं ना, तर त्यानंतर होणारा संताप, खुन्नस खरीच होती. झिंग होती पबजीची.खेळणारा पबजी सैनिक. पटकन ओरडायचा, मार उसको. छोड मत.. नेड फेक. स्कोप करके मार. स्मोक कर.. रिव्हाव्ह दे. अॅमो दे.. लोक वेडी व्हायची. बरं हे आवाज दिवसा-दुपारी असायचे असे नाही, तर मध्यरात्रीसुद्धा अशी बोंबाबोंब सुरू राहायची..
****
भारतात सर्वाधिक प्लेअर्स2008 साली लाँच झालेल्या पबजी गेमचे 2020 सालार्पयत सर्वाधिक यूजर्स भारतात झाले होते. भारतात जवळपास 17 कोटींहून अधिक पबजी यूजर्सची संख्या होती आणि यापैकी सुमारे पाच कोटी यूजर्स दररोज गेम खेळायचे. संपूर्ण जगाचा विचार करता एकटय़ा भारतात 24 टक्के पबजी यूजर्स होते. त्याचवेळी चीनमध्ये पबजी यूजर्सची संख्या 16 टक्के एवढी आहे.
(रोहित लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)