शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

बराक ओबामा सांगतात कोरोनाकाळात जगण्याची 3 सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 3:31 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सांगतात. यांनी तरुण मुलांशी ऑनलाइन संवाद साधला.

ठळक मुद्देते सल्ले बघा, तुम्हालाही उपयोगी पडतात का?

गौरी पटवर्धन

यंदा शेवटच्या वर्षाच्या परीक्षा कधी होणार, रिझल्ट कधी लागणार याविषयी लास्ट इयरवाल्यांना काळजी वाटत असणं साहजिक आहे.मात्र कोरोना महामारी हीच एक अभूतपूर्व गोष्ट असल्यानं सारं जगच या अनिश्चिततेच्या भोव:यात आहे.मात्र  डिग्री मिळणं हा बहुतेक तरुण मुलांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. आपण ग्रॅज्युएट झालो, एक टप्पा संपला याचा तो आनंद असतो.डिग्री मिळाल्यानंतर नोकरी मिळणार असते. त्या नोकरीवर त्यांची खूप स्वप्न अवलंबून असतात. एकतर आपण स्वावलंबी, आत्मनिर्भर होणार यापुढे याचा आनंद असतो.दुसरीकडे अनेकांना वाटतं की, आता शेतात कष्ट करणा:या वडिलांना आराम देऊ, दिवसरात्न काम करणा:या आईला सुखात ठेवू. धाकटय़ा भावंडांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करायची असते. बहिणीसाठी चांगलं स्थळ आलं, तर तिचं लग्न करण्यासाठी आपलाही हातभार लागावा अशी इच्छा असते. आयुष्यभर भाडय़ाच्या घरात किंवा वस्तीत राहिलेल्या कोणाला स्वत:च्या मालकीचं घर घ्यायचं असतं, तर कोणाला टू व्हिलर किंवा फोर व्हिलर घ्यायची असते. गहाण टाकलेलं शेत सोडवून घ्यायचं असतं. त्या एका डिग्रीच्या कागदाच्या जिवावर स्वप्नांची इंद्रधनुष्य रंगवलेली असतात. काहींना अजून शिक्षणाचा पुढचा छोटा दोन वर्षाचा टप्पा दिसतो, मग लगेच मोठी भरारी असंही वाटतं.ही सारी स्वप्नं असतात. वास्तवात कुणीकुणी म्हणतंही की, नुसत्या डिग्रीचा काही उपयोग नाही.पण आपली पहिली डिग्री ही स्वप्नं पहायला मदत करतेच. आणि या मुलांनी ती स्वप्नं का बघू नयेत?इथवर येण्याचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. अनेक जणांनी अनेक अडचणींना तोंड दिलेलं असतं. फी भरायला पैशांची जमवाजमव केलेली असते. मुलींना घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी कैक वेळा दिव्य करावी लागलेली असतात.  गावाकडून शहरात येऊन राहणारे मुलगे कशा परिस्थितीत राहत असतात ते त्यांचं त्यांना माहिती असतं.  डबा शेअर करून, पार्ट टाइम नोकरी करून, जुन्या पुस्तकांवर अभ्यास करून, सुट्टीत घरी गेल्यावर शेतात राबून, पैसे उभे करून ते इथवर पोचलेले असतात.  गावातून असणा:या एकाच एसटीला लटकून नको नको ते स्पर्श सहन करत कॉलेजर्पयत प्रवास केलेला असतो. कैक वेळा हे सगळं सोडून द्यावं असं वाटलं तरी त्या डिग्रीकडे नजर लावून दिवस ढकललेले असतात. अशा शेकडो-हजारो मुलांचं स्वप्न पूर्ण व्हायला काही दिवस उरले, आणि कोविड-19 नावाच्या जागतिक साथीने सगळं जगणं उलटं पालटं करून टाकलं.हातातोंडाशी करिअर आलेल्या मुलांचं भवितव्य या कोविडमुळे अचानक अनिश्चित दिसायला लागलं. इतके दिवस नसलेल्या अडचणींचे डोंगर त्यांच्यासमोर उभे राहिले. आत्ताच इतक्या लोकांच्या नोक:या जाण्याच्या बातम्या ऐकू येतायत, त्यात या नवीन ग्रॅज्युएट्सना नोकरी कोण देणार? दिली तरी पगार काय मिळणार?  मुळात कोविड-19 ने सगळं जग उलटंपालटं केल्यानंतर भविष्यात कुठल्या करिअरला स्कोप असेल? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आज तरुण मुलांच्या समोर नाही. इतकंच नाही, तर ज्यांच्याकडे सगळी उत्तरं आहेत असं वाटत होतं, त्या  सिनिअर्सकडेही फारशी उत्तरं नाहीयेत. कारण आज निर्माण झालेले प्रश्नच नवीन आहेत.आजवर हा प्रश्न असा सोडवला जायचा, असं केलं की प्रॉब्लेम सुटतो असल्या विधानांना काही अर्थ उरलेला नाहीये. सगळं जग सैरभैर होऊन एकेमकांकडे बघतंय. अशा वेळी तरु ण मुलांनी कुठे बघावं? - तर त्याची उत्तरं शोधयला मदत करणारा एक संवाद अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तरु ण मुलांशी साधला होता. ग्रॅज्युएशन-2क्2क्, या तरुण मुलांच्या ग्रॅज्युएशन सोहळ्यात ऑनलाइन त्यांनी भाषण केलं. पदवी मिळणं किती खास असतं हे सांगितलं.त्यात ते जे सांगतात ते फार महत्त्वाचं आहे.

बराक ओबामा तरुणांना सांगताहेत...

बराक ओबामा म्हणाले की मी सिनिअर पिढीचा प्रतिनिधी असल्यामुळे आजच्या तरुण मुलांनी काय करावं हे मी सांगायला जाणार नाही. पण त्याबद्दल मी तीन सल्ले नक्की देईन. ते सल्ले बघा, तुम्हालाही उपयोगी पडतात का?

1. घाबरू नकासमोर आत्ता कुठलंही चित्न स्पष्ट दिसत नसलं तरी त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपल्या जगाने यापूर्वी याहून भयंकर संकटांना तोंड दिलेलं आहे. दोन महायुद्ध, प्लेगसारखे भयानक साथीचे रोग, दुष्काळ, पूर, 193क् सालासारखी महाबेरोजगारी अशी अनेक संकटं जगाने आजवर पचवलेली आहेत आणि त्या प्रत्येक संकटातून जग पुन्हा उभं राहिलं आहे.  त्यामागचं प्रमुख कारण हे आहे, की त्या प्रत्येक वेळी त्यावेळची तरुण पिढी त्यांच्या नवीन जगाबद्दलच्या कल्पना घेऊन नेतृत्व करायला पुढे आली.त्यांनी त्या त्या वेळच्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे घाबरू नका. 

2. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा

आत्ताच्या जगासमोरचे प्रश्न इतके नवीन आणि जटिल आहेत, की ते सोडवायला जुनी उत्तरं उपयोगी ठरणार नाहीत. त्यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं त्याचा विचार करा. तुम्हाला कुठली तत्त्वं महत्त्वाची वाटतात? प्रामाणिकपणा, न्याय्य वागणूक, समानता, लिंगभेदभाव न करणं अशा तुम्हाला महत्त्वाच्या वाटणा:या गोष्टी ठरवा. तुमच्या तत्त्वांशी तडजोड न करता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक असाल, तर तुमचा प्रवास नक्की योग्य दिशेने होईल.

3. समूह / समाजगट बनवातुम्हाला जे योग्य वाटतं, ते करण्यासाठी समविचारी लोकांचा समूह बनवा. कारण आजवर आपण बघितलं तर लक्षात येतं, की कुठलंही मोठं काम एकटय़ा दुकटय़ाने उभं राहत नाही. आत्ताच्या काळात, चारही बाजूंनी संकट आलेलं असताना आपल्यापुरतं बघण्याची इच्छा होणं नैसर्गिक आहे. पण हीच वेळ आहे एकमेकांना धरून राहण्याची. कारण या आलेल्या संकटानेच आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, की आपल्या आजूबाजूची माणसं जर भुकेली असतील, तर मी एकटा / एकटी किती कमावतो / कमावते याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे माणसं जोडा. त्यांच्यासह वाटचाल करण्याचा प्रयत्न करा.

( गौरी मुक्त पत्रकार आहे.)