पोर्नची चटक

By Admin | Updated: February 26, 2015 20:46 IST2015-02-26T20:46:21+5:302015-02-26T20:46:21+5:30

‘ते-तसलं’ पाहिलं नाही म्हणून चैनच न पडणा:या एका गप्पं-घुम्या जगात ंमहिन्यातून दोनदा रुग्णमित्रंसाठी सेक्स आणि सेक्सअॅलिटी या विषयावर प्रसाद आणि महेंद्र गटचर्चा घेतात हे मी ऐकून होतो.

Porn addict | पोर्नची चटक

पोर्नची चटक

>‘ते-तसलं’ पाहिलं नाही म्हणून चैनच न पडणा:या एका गप्पं-घुम्या जगात ंमहिन्यातून दोनदा रुग्णमित्रंसाठी सेक्स आणि सेक्सअॅलिटी या विषयावर प्रसाद आणि महेंद्र गटचर्चा घेतात हे मी ऐकून होतो. 
तिथं गेलो. जवळपास पन्नास एक रुग्णमित्र होते. चार- पाच ज्येष्ठ नागरिक. तीस मध्यम वयातले, बाकीचे तरुण होते.
प्रसादने पहिलाच प्रश्न केला, तुमच्यापैकी कितीजण अविवाहित आहेत?
त्यात घटस्फोटित धरायचे का? - मागून एक प्रश्न आला, तसा बराच हशा उसळला. पण बंधू भारी माणूस, त्यानं  शांतपणो सांगितलं, अविवाहित म्हणजे सेक्सचा अनुभव नसलेले.
थोडावेळ शांतता पसरली. 
मग बंधूनं पुन्हा विचारले, ‘इतके सारे अविवाहित असताना एकानंही ‘तो’ अनुभव घेतलेला नाही. आमच्यावेळी  म्हणजे वीस वर्षापूर्वी सुद्धा एखाददुसरा कारा भेटायचा. आता स्मार्ट फोनच्या युगात एवढे सारे कारे? पूर्वी आम्ही सारे चोरून ब्ल्यू फिल्म्स पाहायचो. आणि आता तर तुमच्या फोनमधेच ‘तसल्या’ क्लिप्स असतात! सगळं फुकट पाहता येतं, तरी एवढे सगळे कारे?
ते ऐकून एकानं हात वर केला, मग बाकीच्यांनी हळूहळू. 
मग त्यानं विचारलं, तुमच्यापैकी कितीजण मोबाइलवर ब्ल्यू फिल्म्स पाहता?
चारपाच सिनिअर मंडळी सोडली तर बहुतेक सगळ्यांनी हात वर केले.
मीही पाहिलीये, दुस:याच्या फोनवर. थोडावेळ उत्तेजित झालो. पण पाहून काही फार मजा नाही आली. 
मग मला सांगा, तुम्हाला तेच ते पाहून कंटाळा नाही येत?
त्यानं विचारलं.
‘येतो, पण दुधाची तहान ताकावर भागवायची.’
‘त्यात खूप वेगळे प्रकार पहायला मिळतात. ’
‘त्याचं असं असतं, ते पाहिलं ना, की बायकांना नेमकं काय पाहिजे ते कळतं.’
‘पोरी पण बघतात, तसं करतात. चान्स देतात आणि झाल्यावर म्हणतात तू कसला मर्द, दो मिनिट मे पानी’
- एकेकानं अशी उत्तरं दिली. माणसं मोकळेपणानं बोलले तरी. वाटलं जे बोलत नाहीत त्यांचं काय होत असेल.
बंधूनं त्यांना एक तक्ता दिला. मग मीही तो तक्ता उतरवून घेतला.
तो चार्ट ब:याच जणांनी उतरवून घेतला. सिनिअर मंडळीच्या चेह:यावर मात्र एक नकारात्मक भाव होता. ‘काय ही पोरं; आम्ही नाही बुवा अशातले’ असंच काहीतरी म्हणत असावेत. थोडय़ाच वेळात त्यातले दोघे करंगळी दाखवत बाहेर निघून गेले. बंधूने त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही. गट-चर्चा झाल्यावर ‘माणसं अशी मध्येच बाहेर जातात हे तुला बेशिस्तीचं वाटत नाही का? - मी विचारलं. 
तो हसत म्हणाला, ‘हा विषय असा आहे ना, की काही जणांना ङोपत नाही. यात काही ओंगळ, अनैतिक वगैरे वाटतं. आपण त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या भाषेत बोलावं लागतं. फार शास्त्रीय बोललं तर हे मोकळेपणाने बोलत नाहीत. प्रत्येकाची एक डिक्शनरी असते. त्यातले शब्द त्यांना लगेच आपले वाटतात. एक मोकळेपणाचं वातावरण तयार होतं. व्यावसायिकांना ही डिक्शनरी जाणून घ्यायला वेळ लागतो. पण आम्ही रिकव्हरीतले त्यांच्याशी जास्त मोकळेपणो बोलू शकतो. मुक्तांगणमध्ये 7क् टक्क्यांहून अधिक समुपदेशक रिकव्हरीतले का आहेत या प्रश्नाचं उत्तर त्याने देऊन टाकलं होतं.
सगळ्यांचं लिहून झाल्यावर तो म्हणाला,
‘मित्रनो, आपण थोडं शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करूया का? काळजी करू नका. मी बोअर करणार नाही.  एक महत्त्वाचं कारण लक्षात घेऊया.  सर्व नशेबाज लोकांत एक गोष्ट समान असते. मला सदैव सुख पाहिजे आणि नुसतं पाहिजे नव्हे तर पाहिजेच, तेही लगेच. मग त्याला कोणतीही किंमत देण्याची तयारी असते. आता बघाना, निवडणुकीच्या काळात चार-पाच दिवस ड्राय डे होते. पण आपण काहीही करून, जास्त पैसे देऊन मॅनेज केलंच ना?’
सगळ्यांनी उत्स्फूर्तपणो हो म्हणलं.
‘हे बघा, शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मानतं की, प्रत्येक माणसाच्या जीवनात तीन प्रेरणा अगदी नैसर्गिक असतात. भूक, कामवासना आणि हिंसा. या तिन्ही गोष्टीच का तर सुख हवं म्हणून आणि या प्रेरणांना उद्युक्त करणारी गोष्ट म्हणजे सुखाची ऊर्मी. 
इतर सामान्य माणसांनाही या गोष्टी लागू आहेत. फरक इतकाच की आपल्याकडे या प्रेरणा हट्टी, आग्रही आणि समाजाच्या मर्यादा बिनधास्तपणो तोडण्याची तयारी ठेवत असतात. म्हणजे ना आपण एका प्रकाराने व्यसनी झालो की जिथे जिथे मजा असेल तिथे आपोआप आकर्षित होतो. म्हणजे व्यसनाचे प्रकार बदलतात, पण वृत्ती व्यसनीच राहते. 
माझंच उदाहरण सांगतो. माङो व्यसन बंद झाले आणि मला तब्येत कमवायचे व्यसन लागले. आठ-आठ तास मी मेहनत करायचो. जॉन अब्राहमसारखी बॉडी पाहिजे असं म्हणत त्यानं टी-शर्ट वर करून त्याचे सिक्स पॅक्स दाखवले.  
वातावरण थोडं हलकं झालं.
‘मला जिमचं व्यसन लागलं. कारण मजबूत मेहनत घेतल्यावर आपल्या शरीरातले इंडोर्फिन नावाचे रसायनाचे स्त्रवण होते आणि सेम गर्दासारखी किक मिळते यार..’! - तो सांगत होता.
मग म्हणाला, आता अमेरिकन सायकीअॅट्रिस्ट संघटनेने तर असल्या पोर्नोग्राफीच्या उद्योगाला वर्तन विकृती असं नाव दिलंय. आणि त्याकरता उपचार घ्यावेत असं सुचवलं आहे.
आपण सातत्यानं फोनचा वापर पोर्नोग्राफीसाठी करत असू तर त्या सवयीतून मुक्त होण्यासाठी काय करता येईल याचा एक चार्ट मी इथं लावतोय. वाचा, लिहा आणि कृतीत आणा. पुढच्या सत्रत व्यसनमुक्तीनंतरचे कामजीवन या विषयावर बोलणार आहोत. 
सो. अभी मुङो जिम जाने दो बाय.
 
 
.हे तातडीनं कराच!
 
1) व्यसन जसं पदार्थाचं असतं तसं ते आपल्या वर्तनाचंही असतं.
2) तुम्ही रोज पोर्नोग्राफिक क्लिप्स पाहत असाल किंवा क्लिप पाहिली नाही तर तुम्हाला शरीरसंबंधात काही रस वाटत नसेल तर तुम्ही नक्कीच पोर्नोग्राफी पाहण्याचे किंवा तसे साहित्य वाचण्याचे गुलाम आहात.
3) तातडीचा उपाय म्हणून तुम्ही विकत घेतलेली 3जी / 2जी सुविधा बंद करा किंवा कार्यालयीन वेळानंतर फोन बंद करा.
4) सप्ताहातील कोणताही एक दिवस - चोवीस तास सेलफोन वापराचा उपवास करा. तो उपवास घडावा म्हणून सेलफोनची बॅटरी बाहेर काढून विश्वासू माणसाच्या ताब्यात द्या.
 
समजा, तुम्हाला व्यसन लागलंय!
1) ‘तसल्या’ वेबसाइट पाहून तुमच्या फोनमधे असंख्य व्हायरस येतात. 
2) तशा साइट्स पाहिल्याशिवाय तुम्ही उत्तेजित होत नसाल तर ते पाहणं तुमच्या नैसर्गिक प्रेरणाच बोथट करत आहेत असं समजा.
3) ते पाहून तशी अपेक्षा जोडीदाराकडून ठेवली तर तुमचं कामजीवन उद्धवस्त होऊ शकतं.
4)  ते पाहिलं नाही तर अस्वस्थ होत असाल तर त्याचं व्यसन लागलं आहे, असं खुशाल समजा.
5) त्या गोष्टी सतत डाऊनलोड करून पाठवण्याचंही व्यसन लागतं, तसं तुमचं होतंय का?

Web Title: Porn addict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.