आनंदाची चिवडा मिसळ
By Admin | Updated: October 30, 2014 20:22 IST2014-10-30T20:22:51+5:302014-10-30T20:22:51+5:30
हाय फ्रेण्ड्स. अजून नाही ना उतरला हॅँगओव्हर, दिवाळीचा? दिवाळीतलं जोरदार सेलिब्रेशन झालं, सुट्टी संपली, रुटीन सुरू झालं तरी मन मात्र सुस्ती सोडत नाहीच.

आनंदाची चिवडा मिसळ
>हाय फ्रेण्ड्स.
अजून नाही ना उतरला हॅँगओव्हर, दिवाळीचा?
दिवाळीतलं जोरदार सेलिब्रेशन झालं, सुट्टी संपली, रुटीन सुरू झालं तरी मन मात्र सुस्ती सोडत नाहीच.
कामाचा मूड लागत नाही.
असं वाटतं नको ते कॉलेज नि ऑफिस, मस्त द्यावी ताणून.
अजून उरलंसुरलं फराळ आहेच डब्यात, ते टाकावं येता-जाता तोंडात. आणि पार डब्याच्या तळाशी गेलेला चिवडा.?
तेल निथळून पोहे फदक फदक करतात त्याच्यात, पण त्या चिवडय़ाची जी काय चव लागते ना.?
त्यात मस्त मित्र घरी बोलवायचे, मिसळ बनवायची आणि तो उरसुर चिवडा-शेव-चकलीचे तुटकेमुटके तुकडे मस्त घालायचे त्या मिसळीत.
- अशी मिसळ कुठल्याच हॉटेलात मिळत नाही!
-तिला म्हणायचं चिवडा मिसळ.
तोंडी लावायला मित्रंचा कल्ला. नुस्ता धांगडधिंग, पोटभर गप्पा आणि हसून हसून दुखणारं पोट.
-लाईफ इससे जादा और क्या खुबसुरत होगी?
*****
असं नाही वाटत की, आपण उगाच नाही त्या गोष्टींच्या मागे धावत सुटतो.
छोटछोटय़ा गोष्टींचे इगो इश्यू
आणि प्रेस्टिज पॉइण्ट्स बनवतो.
नसते लाईफस्टाईल स्टॅण्डर्ड सेट करत बसतो.
पण खरी गंमत तर ‘उरसुर चिवडय़ात’च आहे.
हे कळतं आपल्याला.?
मग ती गंमत पुरेपूर अनुभवणं.
जगून घेणं हे आपल्याच हातात असतं.
पण आपण नाकारतो हा आयुष्यातला खमंगपणा.?
कशासाठी??
*****
ठरवता येईल, आपल्याला की कुढणं-चिडणं, अकारण कुरकूर करणं बंद आणि भन्नाट जगणं सुरू. सुस्ती सोडा, फेसबुक-व्हॉट्सअॅपवरचा एकेकटा उदास कंटाळा बाजूला ठेवा.
आणि द्या झोकून स्वत:ला जगण्यात.
जे सोपंय ते करू ना आपण.!!
----------------------------------
TTMM म्हणजे टेन्शन-टेंगळं-मस्ती-मॅजिक. म्हणजे काय?
तर तेच जे जे तुमच्या मनात, जगण्यात, बोलण्यात, कट्टय़ावर धुमाकूळ घालतं, ते ते सारंच !
म्हणजे तेच सारं, जे तुमच्या डोक्यात वळवळलं, तुम्हाला छळायला लागलं की वाटतं, लिहावं, आणि पाठवून द्यावं ‘ऑक्सिजन’कडे! मग वाट कसली पाहता.? लिहा बिंधास्त. आणि पाठवून द्या ‘ऑक्सिजन’कडे. आम्ही वाट पाहू. आणि तुम्ही लिहिलेलं एकदम ‘कडक’ असेल तर ते तुम्हाला या पानावर नक्की वाचायला मिळेल.
पत्ता?
ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-3, एमआयडीसी अंबड, नाशिक, 422010