शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत नवीन मोबाइल घ्यायचा विचार करताय ? -check  this 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 07:25 IST

नवीन स्मार्टफोन घेण्याआधी नक्की कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा?

ठळक मुद्देआपलं बजेट आणि आपल्या गरजा यांची योग्य सांगड घालूनच मोबाइलची खरेदी करावी.

- प्रसाद ताम्हनकर

सध्याच्या काळात अन्न, वस्र आणि निवारा यांच्या जोडीला स्मार्टफोनदेखील आला आहे असे गमतीनं म्हणलं जातं. पण खरं सांगायचं तर आता मोबाइल हा हळूहळू जीवनाचा अपरिहार्य असा घटक बनू पाहतो आहे. तेव्हा मोबाइलसारखा जोडीदार निवडताना काही गोष्टी खास विचारात घ्यायलाच हव्यात. त्यात आता दिवाळीत नवा मोबाइल घेणार असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.1) सगळ्यात आधी विविध स्मार्टफोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेणं आणि आपल्यासाठी योग्य असलेल्या सिस्टिमचा फोन निवडणं.

2) आपल्याला नक्की कोणत्या कोणत्या कामांसाठी मोबाइलची विशेष आवश्यकता भासणार आहे, त्याचा विचार करून मोबाइलच्या स्क्रीनचा साइज निवडणं.3) आपल्या कामांची गरज, त्यासाठी आवश्यक असणारा मोबाइलचा वेग, आपल्याला फाइल्स, फोटो इतर महत्त्वाची कागदपत्रे साठवण्यासाठी लागणारी जागा याचा विचार करून मोबाइलच्या स्टोरेजची निवड करणं.4) आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी कोणती कोणती अ‍ॅप्लिकेशन्स, जसं की ईमेल्स, फोटो एडिटर, व्हिडीओ कटर इ. वापरावी लागणार आहेत याचा पूर्ण अभ्यास करून, आपण निवडत असलेल्या मोबाइलमध्ये ती पूर्ण कार्यक्षमतेने काम करून शकणार आहोत का नाही, याची नीट खात्री करून घेणं.5) ज्या कंपनीचा मोबाइल आपण घेत आहोत, त्याचे गॅरंटी किंवा वॉरंटी नक्की कशाकशासाठी आहे, कोणत्या नुकसानीसाठी काय भरपाई आहे, सदर मोबाइल कंपनीचे सव्र्हिस स्टेशन आपल्या जवळच्या भागात आहेत का नाही, किंवा आपल्या शहरात सदर कंपनीची एकूण किती सव्र्हिस स्टेशन उपलब्ध आहेत याची निश्चित माहिती घ्यावी.6) एखादे मॉडेल नक्की केल्यानंतर मित्रांशी चर्चा करून, तसेच इंटरनेटवरती जाऊन सदर मॉडेल खरेदी केलेल्या ग्राहकांची मतं काय आहेत, त्यांना काही तक्रारी असल्यास त्या नक्की काय आहेत, त्या कंपनीकडून व्यवस्थित सोडवल्या जात आहेत का नाहीत याचीदेखील माहिती घ्यावी.7) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बजेट आणि आपल्या गरजा यांची योग्य सांगड घालूनच मोबाइलची खरेदी करावी.