पिटुकला पीडी
By Admin | Updated: April 16, 2015 16:52 IST2015-04-16T16:52:12+5:302015-04-16T16:52:12+5:30
जे हवं ते आपण पेनड्राईव्हमधे सेव्ह करतो, आपली बरीच सिक्रेटही त्यात दडपतो, तो पेनड्राईव्ह खराब झाला तर?

पिटुकला पीडी
>त्याची काळजी कशी घ्याल?
आजची टेक्नोसॅव्ही पिढी ज्याला ‘पीडी’ या लाडक्या नावाने संबोधते तो पेन ड्राईव्ह. एकेकाळी फ्लॉपीचा जमाना होता. या फ्लॉपीला सीडीने रिप्लेस केले. पुढे सीडी, डीव्हीडीचा जमाना आला. आता मात्र एक पिटुकलं या सर्वावर मात करीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय. (काही अति टेक्नोसॅव्ही गळ्यातील चेनला पेन ड्राईव्ह अडकवतात, काहींचं पेंडण्ट हाच एक पेनड्राईव्ह असतो.)
हे पिटुकलं आता दोन जीबीपासून तर एक टिबी (एक हजार चोवीस जीबी) र्पयतच्या क्षमतेचं झालं आहे. सध्या ओटीजी पेन ड्राईव्ह हा पीडीचा एक नवीन प्रकार तरुणांमध्ये लोकप्रिय होतो आहे. पूर्वी पेन ड्राईव्ह स्मार्टफोनला जोडायचा असल्यास त्यासाठी ओटीजी केबल लागायची. आता मात्र या ओटीजी पेन ड्राईव्हमुळे तुम्ही ओटीजी केबल न वापरता थेट हा पेन ड्राईव्हच डायरेक्ट स्मार्टफोनच्या मायक्रो यूएसबी पोर्टला लावू शकता. कारण या ओटीजी पेन ड्राईव्हच्या एका बाजूला युएसबी कनेक्टर असते, तर दुस:या बाजूला मायक्रो युएसबी कनेक्टर असते.
आता हा एवढा कामाचा आणि इतका मोठा डाटा स्टोअर करुन ठेवणारा लाख मोलाचा ऐवज जपायलही हवा. पेनड्राईव्ह हरवला, दुस:यानं त्यात नाक खूपसलं तर कसं चालेल?
अनेकांचा अनुभव असाही की पेनड्राईव्ह अगदी कालर्पयत व्यवस्थित काम करीत होता. कालच प्रेङोंटेशन त्यामध्ये कॉपी केलं होतं मात्र आज पेन ड्राईव्ह डिटेक्टच होत नाही. ऐनवेळी पेन ड्राईव्ह चालत नाही आणि प्रेङोंटेशन तर त्यातच आहे मग काय करणार?
पेनड्राईव्हची नीट काळजी घेतली तर आपल्यावर अशी परिस्थिती ओढावणार नाही!
1) पीडी खिशात
किंवा पाकिटात ठेऊ नका
अनेकांना पेनड्राईव्ह खिशात किंवा आपल्या वॉलेटमध्ये ठेवण्याची सवय असते, त्यामुळे होते काय की जर खिशात पेनड्राईव्ह ठेवला तर आपल्या शरीराच्या तापमानामुळे पेनड्राईव्हच्या इलेक्ट्रॉनिक्स कांपोनंटला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे पेन ड्राईव्ह शक्यतो खिशात ठेऊ नका. पेनड्राईव्ह वॉलेटमध्ये देखील ठेऊ नका, कारण वॉलेटमध्ये इतरही काही वस्तू असल्यामुळे पेनड्राईव्हवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे नाजूक इलेक्ट्रॉनिक सर्किटला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि पेन ड्राईव्ह खराब होतो.
2) जास्तवेळ विनाकारण कॉम्प्युटरला कनेक्टेड ठेवू नका
काहीजण एकदा पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडला की काम झाले तरी दिवसभर पेनड्राईव्ह कॉम्प्युटरलाच लावून ठेवता, त्यामुळे होते काय की, कॉम्प्युटरच्या युएसबी पोर्टला पॉवर सर्ज (पावर कमी-जास्त) झाल्यास पेनड्राईव्ह डॅमेज होण्याची शक्यता असते,त्यामुळे काम झाले की, पेनड्राईव्ह व्यवस्थित काढून ठेवा.
3) पेन ड्राईव्हवरून सॉफ्टवेअर चालवू नका
हल्ली अनेक सॉफ्टवेअर हे पेनड्राईव्हवरून देखील चालतात, त्यामुळे पेनड्राईव्हवरून सॉफ्टवेअर अनेकजण वापरतात. मात्र यामुळे होतं काय की, पेनड्राईव्हची रिड/राईट/डिलिट सायकल लवकर संपते. म्हणजेच प्रत्येक पेनड्राईव्हचे लाईफ अर्थात कितीवेळा रिड, राईट किंवा डिलिट करायचे ही संख्या फिक्स असते. वेगवेगळ्या कंपन्यानुसार पेन ड्राईव्हचे लाईफ कमी जास्त असते. म्हणजे पेनड्राईव्हवरून सॉफ्टवेअर वापरल्यानं जास्त रिड, राईट सायकल वापरल्या जातात.
4) बॅकअप ठेवाच
पेनड्राईव्ह हे इलेक्ट्रॉनिक कांपोनंट असलेले स्टोरेज माध्यम आहे. त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी ते कधी खराब होईल याची गॅरंटी नाही, त्यामुळे पेन ड्राईव्हचा एक डेटा बॅकअप हा तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि तो नियमित घ्यायला पाहिजे.
- अनिल भापकर