मानवी देहावरचं चित्र

By Admin | Updated: September 17, 2015 22:27 IST2015-09-17T22:27:08+5:302015-09-17T22:27:08+5:30

टॅटू ही एक कला आहे हे मान्य करण्यार्पयत आपला समाज पोहचला हाच एक मोठा बदल आहे. नाहीतर कला म्हणून त्याचा विचार पूर्वी कुणी केला नसता.

Picture of human body | मानवी देहावरचं चित्र

मानवी देहावरचं चित्र

 - भूपेंद्र धरोलिया

 
 टॅटू ही एक कला आहे हे मान्य करण्यार्पयत आपला समाज पोहचला हाच एक मोठा बदल आहे. नाहीतर कला म्हणून त्याचा विचार पूर्वी कुणी केला नसता.
पण आता दिवस बदलले आणि टॅटूची क्रेझ वाढली. बॉलिवूड-हॉलिवूडचे काही स्टार्स, त्यांचे टॅटू, क्रिकेटपटूंचे टॅटू यांच्यामुळे ही कला जनसामान्यांर्पयत पोहचली.
माझी स्वत:ची टॅटूशी ओळख झाली तीही अशीच, वेगळ्याच वळणानं! मला लहानपणापासूनच स्केचेस करण्याची, चित्रकलेची आवड होती. त्यामुळे अभ्यासात मन कधी लागलेच नाही. बारावीर्पयतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर पुढे शिकायचे नाही असं ठरवून टाकलं आणि घरच्यांना तसं सांगूनही टाकलं. पण त्यांनीही शिकणार नाही तर पुढे काय, कसे होईल म्हणून मला कधीही टोमणो मारले नाहीत हे महत्त्वाचं!  दरम्यान, माझी बहीण लगA झाल्यानंतर गोव्यात शिफ्ट झाली होती. तिचे गोव्यात बॅग्ज, लगेज यांचे दुकान आहे. गोव्यात वर्षभर विदेशी पर्यटक, कलाकार यांची वर्दळ असते. यातूनच तिचाही काही विदेशी मित्र-मैत्रिणींचा ग्रुप जमला होता. यातील काही टॅटू आर्टिस्ट होते. गोव्यात गेल्यावर नेहमी या टॅटूजबद्दल माहिती घ्यायचो. या मित्रंबरोबर वेळ घालवायचो. आणि तेथेच मग टॅटू हेच आपल्या कलेचे माध्यम आहे हे मनोमन जाणवलं.  इंग्लंड, कॅनडा अशा देशांतून आलेल्या या टॅटू आर्टिस्टकडूनच ही कला मी आत्मसात केली. माझा जन्म मुंबईचा. वडील बीएसएनएलमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यामुळे नाशिकला स्थायिक झालो होतो. गोव्यात राहूनच आम्ही स्टुडिओ सुरू केला. तेथे आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला. नाशिकमधे आठ वर्षापासून मी आता काम करतोय. ऑक्टोबर ते एप्रिल असे वर्षातील सहा ते सात महिने मी गोव्यात काम करतो.
माझा मोठा भाऊ भरत धरोलिया आणि तीन आर्टिस्ट माङयाबरोबर सध्या काम करताहेत. आमच्या या कलेसाठी अत्याधुनिक साधनसामग्री आम्हाला लागते. जसे की मशीन, सुई, नोङोल हे सर्व साहित्य आम्ही अमेरिकेतून मागवतो. भारतातही हे साहित्य उपलब्ध आहे, मात्र ते चायनामेड असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही. मानवी त्वचा संवेदनशील, नाजूक असते. ही बाब लक्षात घेऊनच टॅटूजसाठी ऑर्गनिक, नैसर्गिक  रंगच आम्ही वापरतो. 
टॅटूच्या क्रेझमुळे आज या क्षेत्रत प्रचंड पैसा दिसतो म्हणून अनेकजण येतात. झटपट टॅटू काढून देतात. काहीवेळेस त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे करताना ते या कलेचा अनादर करताहेत असं मला वाटतं. या प्रकारांमुळे टॅटू कलेविषयी गैरसमज निर्माण होतात. मला वाटते की टॅटू कलेचा प्रसार योग्यरीतीने करायला हवा आहे. 
 

Web Title: Picture of human body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.