फोटोगिरी ते हॉबीगिरी...!
By Admin | Updated: July 6, 2016 17:29 IST2016-07-06T17:18:52+5:302016-07-06T17:29:53+5:30
माझा आवडता छंद’ या निबंधातून शाळकरी दिवसात प्रत्येकाच्या आयुष्यात छंद डोकावतो. तेव्हापासून तिकिट जमा करणं, फोटो काढणं याची सुरुवात होतेच.

फोटोगिरी ते हॉबीगिरी...!
>- स्नेहा मोरे
‘माझा आवडता छंद’ या निबंधातून शाळकरी दिवसात प्रत्येकाच्या आयुष्यात छंद डोकावतो. तेव्हापासून तिकिट जमा करणं, फोटो काढणं याची सुरुवात होतेच. पण मग सो कॉल्ड् ‘मोठे’ झालो की यापासून आपण काहीसे दुरावतो. फ्रेंड्स, कलिग्स आणि कॉर्पोरेट्सच्या जाळ्यात आपण स्वत:पासून दूर जातो. पण आता आपल्या आवडत्या छंदाशी कनेक्ट होणं सोप्प होणार आहे.
आपल्या सारख्याच काही अवलियाने ‘हॉबीगिरी डॉट कॉम’ सुरु केले आहे. या ‘बिझी’ असणाऱ्या यंगस्टर्सना एनर्जी गेन करण्यासाठी आपल्या छंदाकडे परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वसईच्या विनय निहलानी या तरुणाने ‘हॉबीगिरी’ सुरु केलीय. या वेबवर फोटोग्राफी, सायकलिंग , फुटबॉल, गिर्यारोहण ते अगदी गेमिंगपर्यंत अशा अनेक छंदांचा यात समावेश आहे. प्रत्येक हॉबीशी रिलेटेड अनेक गोष्टी या वेबवर अगदी सहज उपलब्ध होतात. बिझी शेड्यूल्डमुळे बऱ्याचदा एखाद्या वीकेंडला आपल्याला छंदाला वेळ द्यावासा वाटला, तरी पटकन त्याच्यासाठी वस्तूंची जुळवाजुळव करण्यातच वेळ निघून जातो. याच विचारातून ‘हॉबीगिरी’चा जन्म झाल्याचे विनयने सांगितले.
हॉबीक्रेझी यंगस्टर्ससाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. क्रिकेट, क्विलिंग, डान्स,क्राफ्टींग, गार्डनिंग, स्पिरिच्युअॅलिटी ते अगदी डेटींगपर्यंतचे अनेक छंदांविषयीचे साहित्य या ठिकाणी सहज मिळेल. एकाच उत्पादनचे वेगवेगळे पयार्यही इथे आहेत. आपल्या बजेटचं गणित सांभाळून छंदाशी कनेक्ट राहता येईल याचीही काळजी घेतली आहे.
अशी झाली सुरुवात...
मॅनेजमेंटचा अभ्यास केल्यानंतर मार्केटींगमध्ये एमबीए केलं, त्यानंतर काही कंपन्यांमध्ये जॉब केला. घरी काहीसे बिझनेसचेच वातावरण आहे. मला फोटोग्राफीचा छंद आहे, शाळेपासून फोटोस् काढतो. काहीशी फोटोग्राफी शिकलीसुद्धा आहे, पण या फिल्डमध्ये खूप हार्ड कॉम्पिटीशन आहे. मग फोटोग्राफी करता-करता त्याचे साहित्य विकण्याची कल्पना सुचली ती प्रत्यक्षातही आणली. काही दिवसांनी ‘फोटोग्राफी डॉट कॉम’ म्हणून वेब सुरु केलं. आणि बघता-बघता अवघ्या दिड महिन्यात खूप साहित्य विकलं गेलं. त्यामुळे मग इतर छंदांसाठीही असाच प्रयत्न करायचं मनातं आलं. त्यातूनच १० छंदांसाठी लागणाºया साहित्याने सुरुवात झाली, आता याच व्यासपीठावर ५०-६० छंदांचा समावेश असल्याचे विनयने सांगितले.