शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

पेप्लम आणि रफल : नवरात्रातले नवे स्टायलिश ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 7:20 AM

यंदा सगळ्या गोष्टी सोप्या करून घेण्याकडे कल आहे. त्यामुळेच तर सध्या चर्चा आहे ती पेप्लम कुर्ती आणि ब्लाउजची.

ठळक मुद्देजे वापरलं ते मल्टिकलर असा नियम केला तरी चालेल

- प्राची साठे

नवरात्रीचे दिवस म्हणजे फॅशनप्रेमींसाठी जगून घ्यावेत असे दिवस. या दिवसांत काय घालावं आणि काय नाही हे नेहमीच्या दांडिया-गरबावाल्यांना सांगण्याची काहीच गरज नाही. मात्र ज्यांना दांडिया खेळायला जायचं नाही; पण तो मूड जगून घ्यायचा आहे, किंवा थेट क्लास-कॉलेज-ऑफिसातून गरबा खेळायला जायचं आहे. त्यांच्यासाठी या काही टिप्स.तुम्ही जे कपडे दिवसा कॉलेज-ऑफिसला घालू शकतात, तेच घालून गरबा खेळायला जाऊ शकतात अशी काही कॉम्बिनेशन सध्या चर्चेत आहे. कारण मुळात फॅशन हीच इझी गोअर असते. आपण करू तशी छान सजते.त्यात यंदा सगळ्या गोष्टी सोप्या करून घेण्याकडे कल आहे.त्यामुळेच तर सध्या चर्चा आहे ती पेप्लम कुर्ती आणि  ब्लाउजची.

पेप्लम पेप्लम म्हणतात अशी ही झालरची कुर्ती आहे. ती स्कर्टवर घालताच येते. जिन्सवर वापरता येते. प्लेन रंगात अत्यंत सोबर दिसते. विशेष म्हणजे या पेप्लम कुर्तीवर साडी नेसण्याचा यंदा ट्रेण्ड आहे. छान मोठी अशी ही कुर्ती. तिला झालर आणि त्यावर मोठ्ठे कानातले आणि मोठी लाल रंगाची टिकली एवढं जरी केलं तरी कुणीही गरबा रेडी दिसू शकतं.

रफल स्लिव्हजपेप्लमप्रमाणे रफल स्लिव्हजची सध्या फॅशन आहे. रफल म्हणजे झालरीचे कुर्ते, ब्लाउज. अगदी लेहंगा घागर्‍यावरही या रफल स्लिव्हज कुर्ती छान दिसतात. त्यासोबत ऑक्सडाइजचे मोठ्ठे कानातले, हातात एखादं कडं एवढं जरी असलं तरी लूक पूर्ण होतो.

 

हायनेकहायनेक शर्ट घालून कुणी गरबा खेळतं का? पण सध्या हायनेकची फॅशन आहे. ब्लाउज, कुर्ती आणि स्कर्ट असं कॉम्बिनेशन अनेकजणी वापरताना दिसतात.

मल्टिकलर

जे वापरलं ते मल्टिकलर असा नियम केला तरी चालेल इतका रंगीबेरंगी कॉण्ट्रास्ट सध्या ट्रेण्ड आहे. घागरे, स्कर्ट, बांगडय़ा, गळ्यातले हे सारं मल्टिकलर सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे जे वापराल ते कलरफुल एवढं जरी केलं तरी ते छान दिसेल.

केसांत मोठ्ठं फुलहातभर बांगडय़ा 

हा खरं तर रेट्रो म्हणजे सत्तरच्या दशकातला ट्रेण्ड आहे. मात्र मोठ्ठं टपोरं फुल केसात माळणं हा सध्या नवा गर्लीश ट्रेण्ड आहे. त्याला जोड म्हणून हातभर बांगडय़ा घातल्या की झालाच ट्रॅडिशनल लूक तयार!

मोठ्ठी टिकली

टिकली न लावण्याचा ट्रेण्ड जाऊन पुन्हा मोठी ठसठशीत टिकली लावण्याचा सध्या ट्रेण्ड आहे. घागरे, स्कर्ट, साडी यावर ही टिकली छान दिसते. टिकली लावली की कानात मोठ्ठे कानातले, गळ्यात मात्र काही नाही असा हा ट्रेण्ड आहे.