पॅण्ट साडी! साडीचा कुठला प्रकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:06 IST2018-12-06T15:05:45+5:302018-12-06T15:06:10+5:30
साडीचा हा कुठला नवीन प्रकार? याला म्हणतात, फ्युजन. ते ही बिंधास्त!

पॅण्ट साडी! साडीचा कुठला प्रकार?
- श्रुती साठे
साडी नेसावी असं तर वाटते, पण साडी सांभाळणं मुश्कील, असं अनेकींना वाटतं. तुम्हाला साडी नेसता येत नाही, साडीत नीट वावरता येत नाही यावरून घरचे चिडवतही असतील. तर साडी आवडणार्या पण नेसता न येणार्या, ती सावरणं न जमणार्या अनेकींसाठी एक खुशखबर आहे. गुड न्यूज.
इकडून परकर दिसतोय मग साडी खाली ओढा असं काहीही करण्याची गरज नाही. टिपिकल घट्ट ब्लाउजला फाटा देऊन मस्त आवडत्या क्र ॉप टॉप सोबतही ही साडी नसलेला साडी मिरवता येईल!
त्याला म्हणायचं पॅण्ट साडी.
बरोबर वाचलं नाव. सध्या आपल्याकडे अनेक सेलिब्रिटींनी या साडीला अक्षरशर् डोक्यावर घेतलेलं आहे.
पारंपरिक साडी आणि वेस्टर्न कपडे याचं एक सुंदर फ्युजन म्हणजे ही पॅण्ड साडी. निर्या, पदर यामुळे तर आपल्या साडीचं सौंदर्य उठून दिसतं. त्याचं भान ठेऊन डिझायनर्सनी पॅण्ट साडीमध्ये निर्या, पदर यांचाही उत्तम वापर केला आहे. लाउंज पॅण्ट आणि क्र ॉप टॉप किंवा मॉडर्न ब्लाउज यांनाही यात स्थान आहे.
अमृता खानविलकर नुकतीच अशाच एका सुंदर पॅण्ट साडीमध्ये दिसली. डिझायनर सोनम लुथरिया यांनी डिझाइन केलेली ही पॅण्ट साडी अमृतावर खुलून दिसली. थ्रेड आणि टॅसल्स ही थीम पकडून बनवलेली पॅण्ट साडी. त्यावरील धाग्यांची आणि गोंडय़ांची झालर खास.
सोहा अली खानसुद्धा अशाच एका पॅण्ट साडीमध्ये छान दिसली. ही हॅण्डलूम साडी त्याच्या वरील फुलांच्या साध्या एम्ब्रॉयडरीमुळे सोज्वळ दिसते. या साडीवर सोहाने ब्लाउज म्हणून वापरलेला पांढरा लूज शर्ट आणि पलाझो पॅण्ट कम्फर्टेबल लूक देते.
आवडले हे दोन्ही लूक? तर मग नक्की ट्राय करून पाहा! ही आगळी-वेगळी सुटसुटीत पॅण्ट साडी!