अनेकांसाठी लव्ह-लाइफ ही एक कटकट होऊन बसते.. हे मी पाहिलं आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 06:15 IST2020-01-02T06:15:00+5:302020-01-02T06:15:02+5:30
‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.

अनेकांसाठी लव्ह-लाइफ ही एक कटकट होऊन बसते.. हे मी पाहिलं आहे.
नचिकेत देशमुख
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
2020 मधली सर्वात चांगली गोष्ट ही की नुकतंच ग्रॅज्युएशन सुरू झालंय. स्वतर्ची बाईक घेऊन पॉकेटमनीमधून पैसे वाचवून शनिवार-रविवार मस्त आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जायचं. आणखी काय हवं? घरच्यांकडून मिळणारी मोकळीक याचा आनंद तो काही वेगळाच आहे.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
कधीही वेळेत पूर्ण न होणारी सबमिशन्स, मित्रांबरोबरची क्षुल्लक भांडणं आणि विद्यापीठाचा गचाळ कारभार- सगळ्यात मोठ्ठा स्ट्रेस आहे. कुणालाही विचारा!
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
खूप मित्रांमुळे मी नक्कीच मजेत आहे; पण या सर्व मित्रांच्या गर्दीतले असे काही निवडक भामटे, जे प्रत्येक गोष्टीत सोबत असतात ते महत्त्वाचे आहेत!
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
सगळा घोळ सोशल मीडियाने घातलेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मुलांच्या मनात/जगात काय चालू आहे हे आई-वडिलांना बरोब्बर कळतं. या आधी बरं चाललं होतं की!
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
सगळ्यांसाठी नाही, पण अनेकांसाठी लव्ह-लाइफ ही एक कटकट होऊन बसते.. हे मी पाहिलं आहे.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेतली आहे, पण आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे नक्की माहिती नाही/ ठरवलेलं नाही.