लव्ह-लाइफच्या नावाखाली नुस्ता राडा झालाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 07:20 IST2020-01-02T07:20:00+5:302020-01-02T07:20:05+5:30
‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020 ! विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध

लव्ह-लाइफच्या नावाखाली नुस्ता राडा झालाय!
-आशय निगडे
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
सध्या माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आणि भारी गोष्ट विद्याथ्र्यामध्ये असलेली राजकीय जागृती आहे. ज्या प्रमाणात सोशल मीडियावर, कट्टय़ा-कट्टय़ावर, चहाच्या टपरीवर किंवा अगदी हॉटेलमध्ये विद्यार्थी, नुकतेच डिग्री घेतलेले ज्या हिरिरीने राजकारणाबद्दल बोलत आहेत ती गोष्ट मला खूप आनंद देते. मग त्यांचे दृष्टिकोन कोणतेही असोत.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
मला सगळ्यात जास्त स्ट्रेस सध्या माझ्या जानेवारीत असलेल्या परीक्षेचा आहे.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
हे वेळोवेळी बदलत राहातं. मी या गोष्टीत खूश आहे की जर मला स्पेस हवी असेल तर माझी मित्रमंडळी ते समजून घेतात आणि एका कॉलवर धावूनही येतात.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
आमच्या आईबाबांची पिढी ही गंडलेली जनरेशन आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांशी कनेक्टच करता येत नाही.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
लव्ह-लाइफच्या नावाखाली माझ्या जनरेशनने सगळाच नुस्ता राडा घालून ठेवलाय, कारण नसताना!
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
पुढे काय करायचं हे काही प्रमाणात ठरलं आहे. सर्वशक्तीसह एकतर राजकारणात उतरायचं किंवा स्वतर्ची वकिली सुरू करायची आहे. हे दोन्ही एकमेकांना पूरक असू शकतं, त्यामुळे मला त्याचा स्ट्रेस नाहीये फार.
7. संधी मिळाली तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन ! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?
संधी मिळाली तर मला परदेशात शिकायला नक्की आवडेल, आता मला त्याचा काहीच अनुभव नसल्याने तिथेच राहीन की नाही हे सांगता येत नाही; पण मला भारताच्या भविष्यावर विश्वास आहे, त्यामुळे 99 % परतच येईन.
8. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?
मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की बर्याच कमी वेळात आपण खूप प्रगती केली, विविध क्षेत्रात.
संताप याचा वाटतो की 21 व्या शतकातही मला धर्माधपणा, जातीवाद, अंधश्रद्धा या गोष्टी दिसतात.