समाजसेवा शिकण्याची संधी

By Admin | Updated: July 25, 2016 13:20 IST2016-07-25T13:18:14+5:302016-07-25T13:20:25+5:30

तुम्ही संवेदनशील आहात का? समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरांमध्ये बदल घडवण्याची तुमची इच्छाशक्ती आहे का? समाजात सकारात्मक बदल घडावा अस तुम्हाला वाटत का?

Opportunity to learn social services | समाजसेवा शिकण्याची संधी

समाजसेवा शिकण्याची संधी

>- प्रवीण दाभोळकर  
तुम्ही संवेदनशील आहात का? समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरांमध्ये बदल घडवण्याची तुमची इच्छाशक्ती आहे का? समाजात सकारात्मक बदल घडावा अस तुम्हाला वाटत का? मग तुमच्यासाठी समाजसेवेचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरु  होतोय.. मास्टर आॅफ सोशल वर्र्क या अभ्यासक्र मातून या सगळ््या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होणार आहे. तज्ज्ञांसोबत प्रत्यक्षात फिल्डवर्कचा अनुभवही त्यांना घेता येणार आहे.
हा दोन वषार्चा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून तो चार सत्रात विभागला गेलेला आहे.यामध्ये चार दिवस अध्यापन व दोन दिवस क्षेत्र कार्य असेल. या अभ्यासक्र माकरिता एकूण ६० जागा उपलब्ध असून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या  उमेदवारांना प्रवेश मिळू शक णार आहे. अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना विशेष अध्यापन सहाय्य पुरविले जाणार आहे. अभ्याक्र मातील विद्यार्थ्यांना शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होऊ शकतात.
कुठे करायची चौकशी?
विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्रातर्फे राबविला जाणार आहे. ३०  जुलै २०१६  पर्यंत प्रवेश अर्ज स्विकारण्यात येणार आहे.

Web Title: Opportunity to learn social services