प्रयोग करण्याची संधी
By Admin | Updated: July 14, 2016 23:07 IST2016-07-14T23:07:14+5:302016-07-14T23:07:14+5:30
यू-टय़ूबसाठी काहीतरी काम केलं पाहिजे असं गेली चार र्वष वाटत होतं. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर ही मंडळी नियमित भेटणारी. त्यामुळे जेव्हा निपुण

प्रयोग करण्याची संधी
>- विजू माने
यू-टय़ूबसाठी काहीतरी काम केलं पाहिजे असं गेली चार र्वष वाटत होतं. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर ही मंडळी नियमित भेटणारी. त्यामुळे जेव्हा निपुण आणि अमेयने प्रयोग केला तेव्हा वाटलं आता नुसता विचार नको, प्रयोग करून बघू. मग विषय काय यावर चर्चा सुरू झाली. आणि गप्पांच्या ओघात स्ट्रगलर याच कल्पनेला धरून काही लिहावं असं वाटू लागलं. त्यातून ‘स्ट्रगलर साला’ ही वेब सिरिज उभी राहिली. पहिला एपिसोड माङयाच ऑफिसवर शूट केला. तो अपलोड झाल्यानंतर जो काही प्रचंड रिस्पोन्स मिळालाय तो बघून हुरूप आला. खरं तर स्ट्रगलरसारख्या विषयाला माणसं कशी रिअॅक्ट होतील काहीच अंदाज नव्हता. लोकांना विषय आवडेल का याबद्दल मनात शंका होत्या; पण तरीही आम्हाला करावसं वाटत होतं. शेवटी हे माध्यम असं आहे जिथे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणो काम करू शकता. तुम्हाला आतून जे काही व्यक्त व्हावंसं वाटतं ते सांगण्याची संधी हे माध्यम देतं, हीच या माध्यमाची ताकद आहे.
मला वाटतं, या माध्यमाचं जे एक मुक्त स्वरूप आहे त्यामुळेच हे शक्य आहे. इतरवेळी कलाकार म्हणून जी बंधनं असतात त्यातली कुठलीच इथे नाहीत. टीआरपी मिळवण्याची गिमिक्स नाहीत. दुसरं असं की मागची पिढी आणि आताची पिढी यांचे इंटरेस्ट वेगवेगळे आहेत. त्यात टीव्हीवरून दिसणारं मनोरंजन सर्वसमावेशक असतंच असं नाही. ज्यांना टीव्ही भावत नाही किंवा त्याच्याशी रिलेट करता येत नाही असा मोठा प्रेक्षक वर्ग झपाटय़ानं या डिजिटल माध्यमाकडे वळतो आहे. हल्ली तर पिढी जवळपास 3 वर्षातच बदलते. याचा अर्थ आवडी-निवडींचे ट्रेंड्सही झपाटय़ानं बदलतात. ज्यांना टीव्ही आकर्षित करत नाही, त्यांची मनोरंजनाची जागा हे नवीन माध्यम भरून काढतंय असंही म्हणता येऊ शकेल.
मराठीत या माध्यमात काम करणा:यांच्या पहिल्या फळीत आम्ही आहोत. त्यामुळे आज जरी यातून आर्थिकदृष्टय़ा फार काही मिळत नसलं तरी याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे नक्की. मनाप्रमाणो प्रयोग करता येतात आणि प्रेक्षकांना ते आवडतात, याचाच आनंद जास्त आहे.
( लेखक, दिग्दर्शक आणि वेब सिरिअल्सचे निर्माते)