उघडे डोळेच फोटो काढणार?
By Admin | Updated: July 5, 2016 13:29 IST2016-07-05T13:26:49+5:302016-07-05T13:29:43+5:30
डोळ्यात ( चष्म्याऐवजी) ज्या लेन्स वापरतो, त्यांनी आता फोटो काढता येऊ शकतात किंवा व्हिडीओ शुटींग करता येऊ शकतं, असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?

उघडे डोळेच फोटो काढणार?
>- स्वप्नील जोशी
डोळ्यात ( चष्म्याऐवजी) ज्या लेन्स वापरतो, त्यांनी आता फोटो काढता येऊ शकतात किंवा व्हिडीओ शुटींग करता येऊ शकतं, असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?
जरा अवघडच आहे हे खरं वाटणं, पण आता हे शक्य आहे. सोनी कंपनीने विकिसत केलेल्या ‘ स्मार्ट लेन्स ’ मुळे डोळ्याची पापणी न लवताही हे सारं करता येऊ शकेल!
या लेन्स मध्ये विशिष्ट तंत्रज्ञान विकिसत करण्यात आले असून यात सेन्सर, प्रोसेसर आणि स्टोअरेज स्पेस विकिसत करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे लेन्स द्वारे काढलेला फोटो कुठे सेव्ह करायचा असा प्रश्न देखील निर्माण होत नाही त्याचप्रमाणे या लेन्सने काढलेले फोटो कंप्युटर, लॅपटॉप किंवा प्रोजेक्टर सारख्या उपकरणांवर सहज बघणं शक्य होणार आहे, अशा उपकरणांवर फोटो किंवा आपण काढलेले व्हिडीओ बघण्यासाठी वायरलेस अॅण्टिनाचीही निर्मिती करण्यात आली आहे.
जाणूनबुजून पापण्यांची उघडझाप केल्यावरच आपण या लेन्स ने चित्रीकरण करू शकतो तसेच झूम इन किंवा झूम आउट साठी देखील डोळे विशिष्ट अंशात वळवावे लागणार आहे आणि या लेन्सचा कॅमेरा फोकस करायचा असेल तर तीन वेळा डोळे मिचकावे लागतील तसेच स्टोअर केलेले फोटो सुद्धा डोळ्यांची हालचाल केल्यावर बघता येणे सहज शक्य होणार आहे.
सोनी कंपनीने या प्रणालीच पेटंट मंजुरीसाठी पाठवलं आहे. आता डोळे हे जुल्मी गडे नव्हे तर रेकॉर्डर गडे असं म्हणावं लागेल!