फक्त 5 गोष्टी
By Admin | Updated: September 17, 2015 22:09 IST2015-09-17T22:09:59+5:302015-09-17T22:09:59+5:30
बाप्पा आले, उत्साह दाटला.

फक्त 5 गोष्टी
>बाप्पा आले,
उत्साह दाटला.
मात्र तरुण मंडळांना
करता आणि टाळता येतील
अशा काही गोष्टी
त्याच उत्साहानं केल्या तर?
या गणोशोत्सवात किमान एवढी सेवा
रुजू करता येईल का, बाप्पाच्या चरणी?
काल बाप्पा वाजतगाजत आले.
आज दुसराच दिवस.
पुढचे दहा दिवस बाप्पा आपल्यासोबत आपल्या मंडळात, आपल्या घरात राहणार! जी करू ती सेवा गोड मानून घेणार, दरवर्षीप्रमाणोच!
पण म्हणून तरुण मंडळांनी दरवर्षीच त्यांना आणि अवतीभोवतीच्या माणसांना चिक्कार त्रस होईल असं वागायलाच पाहिजे असा काही नियम नाही.
ज्या विधायक भावनेतून गणोशोत्सव लोकमान्यांनी सुरू केला, निदान त्या भावनेला स्मरून तरी आपण काही चांगल्या, विधायक म्हणजेच आपल्या भाषेत ‘पॉङिाटिव्ह’ गोष्टी करू शकू का?
निदान प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?
1) लाऊडस्पीकर बंद?
गणोशोत्सवात लाऊडस्पीकर लावलाच नाही तर नाही का चालणार? एरवी ध्वनिप्रदूषणावर बोलायचं आणि गणोशोत्सवात लाऊडस्पीकरवर हिंदी सिनेमातले आयटम सॉँग लावायचे याला काही अर्थ आहे का? त्यामुळे आजूबाजूला राहणा:या लोकांना किती त्रस होत असेल, याचाही विचार करू! त्यामुळे आपलं मंडळ असेल तर आपण लाऊडस्पीकरवर बंदीच घालायची असा निर्णय घेता येईल का? आणि फारच जड गेलं समजा हे तर निदान कमीत कमी आवाजात श्रवणीय गाणी लावता येतील का? तीही अगदी थोडय़ाच वेळ? प्रयत्न करून पाहू.
2) ओला/कोरडा कचरा वेगळा
गायन-वादन सेवा होते मंडळात. भक्तिभावानं सत्यनारायणंही घातली जातात. पण पर्यावरण सेवा होते का? बाकी काही जमलं नाही तरी निदान मंडळातला ओला-सुका कचरा आपण वेगवेगळा ठेवू शकतो. शक्यतो थर्माकॉल वापरायचंच नाही. प्लॅस्टिकचे चहाचे कप, प्लेट्स यांना सुट्टी. ते वापरायचे नाही. आणि वापरलेच तर रियुजेबल वापरायचे. मंडळातला कचरा उघडय़ावर टाकायचा नाही. स्वच्छतेचा हात अजिबात सोडायचा नाही.
3) मूर्तिदान/निर्माल्यदान
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळांनीही लहानच मूर्ती आणायला हवी. आणि ती विसर्जित करण्यापेक्षा दान केली तर पाण्याचं प्रदूषण आपण कितीतरी पटींनी वाचवू शकू. तेच निर्माल्याचंही. पाण्याचं प्रदूषण टाळण्याचं काम आपणच करू शकतो. ते करता येईल का?
4) पैसा ‘मदत’ म्हणून द्याल?
वर्गणीचा वायफळ खर्च टाळता येईल? महाराष्ट्रात दुष्काळ आहे, लोक पाण्यासाठी वणवणताहेत. अशा भीषण परिस्थितीत आपण सण-उत्सवांवर किती अनाठायी खर्च करणार? त्यामुळेच तुम्ही जमवलेल्या वर्गणीतून दुष्काळग्रस्तांना काही मदत करता येईल का? काही शाळांतील मुलांचा शैक्षणिक वर्षाचा खर्च देता येईल? कुठं वृक्षारोपण? गरजूंना मदत? पाणीपुरवठा योजनेसाठी मदत? शोधले तर कितीतरी पर्याय, संस्था आणि माणसं सापडतील, ज्यांच्या माध्यमातून आपला पैसा योग्य कारणासाठी वापरता येईल.यंदाच्या गणोशोत्सवात असे काही पर्याय शोधले तर?
5) व्यसनांना नो एण्ट्री
गणोशोत्सव काळातही काही उत्साही कार्यकर्ते दारू-गुटखा यांना जवळ करणं काही सोडत नाही. काही मंडळात तर रात्री तीन पत्तीचे डावही रंगतात. हे सारं टाळता नाही का येणार? जो व्यसन करेल त्याला मंडळात एण्ट्री नाही असा नियमच केला तर? निदान उत्तम आरोग्याचा तरी आशीर्वाद मागू बाप्पाकडे.