वन वे तिकीट - छोटीसी बात

By Admin | Updated: January 26, 2017 02:18 IST2017-01-26T02:18:31+5:302017-01-26T02:18:31+5:30

अगदी बरोबर ठरवून आजचा मुहूर्त साधलाय सगळ्यांनी. स्वयंपाकवाल्या काकूंना आजच सुटी हवी होती.

One way ticket - little thing | वन वे तिकीट - छोटीसी बात

वन वे तिकीट - छोटीसी बात

  - प्रसाद सांडभोर 

बकाबका
अगदी बरोबर ठरवून आजचा मुहूर्त साधलाय सगळ्यांनी. स्वयंपाकवाल्या काकूंना आजच सुटी हवी होती. रूममेट महाशयांना आजच घरी निघून जायचं होतं आणि बाकी मित्रमंडळींना पण आजच बिझी असायचं होतं... 
 
भुकेच्या नादात अजिबात विचार केला नाही. तडक हे रेस्टॉरण्ट गाठलं. थांबायला हवं होतं जरा. घरीच आॅर्डर करता आलं असतं जेवण. असं एकटं बसून नसतं खावं लागलं. घरी बनवता पण आलं असतं की काहीबाही. आरामात. घरच्या कपड्यांत. ऐसपैस बसून पुस्तक वाचत नाहीतर लॅपटॉपवर पिक्चर बघत खाता आलं असतं नेहमीसारखं. श्या! ही भूक ना अजिबात सारासार विचार करू देत नाही मेली! असो. पटपट खाणं संपवूया.
 
इथे चारजणांच्या टेबलावर एकट्याला बसायला कसलं आॅड वाटतंय. समोर टीव्ही आहे तसा टाइमपास म्हणून. पण कसलं बोअर गाण्यांचं चॅनेल लावून ठेवलंय. खाणं संपेपर्यंत फोनमधले जुने फोटो पहावेत का? श्या! नको. फोन काढायच्या भानगडीत हे दही दाढीला लागलं वाटतं. कुठे बरं आहे नक्की. दिसणार कसं? पण इथे ओळखतंय कोण आपल्याला.हसलं कुणी तरी काय जातंय! हा! हा!!
 
त्या कोपऱ्यात बसलेल्या तीन मुली इकडे का बघताहेत? त्यांना दिसतंय का दही? की त्या विचार करताहेत, एवढ्या बकाबका का खातोय हा मुलगा? खरंच, कशाला म्हणून घाई? छान, चविष्ट, आवडीचं आहे सगळं मग आपली मजा करण्यात काय हरकत आहे? दरवेळी का हवेत मित्र? घरचे? ओळखीचे लोक? एकट्यानं सुद्धा मजा करता आली पाहिजे. ठीकंय, जेवण संपलंच आहे आॅलमोस्ट. निघूया इथून. पण घरी जाण्याआधी टपरी से एक चॉकलेट आईस्क्र ीम तो बनती है आज.
सिर्फ खुद के वास्ते :)


 xprsway@gmail.com

Web Title: One way ticket - little thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.