अशीही एक फेसबुक दिंडी

By Admin | Updated: July 5, 2016 13:31 IST2016-07-05T13:25:06+5:302016-07-05T13:31:23+5:30

गेली सहा वर्षे फेसबुकवर एक फेसबुक दिंडीच काढणारे काही दोस्त. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचवणारी ही फेसबुक दिंडी.

One such Facebook Dindi | अशीही एक फेसबुक दिंडी

अशीही एक फेसबुक दिंडी

>- प्रवीण दाभोळकर
गेली सहा वर्षे फेसबुकवर एक फेसबुक दिंडीच काढणारे काही दोस्त. संत  तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचवणारी ही फेसबुक दिंडी. यावर्षी या दींडीनं एक अनोखं पाऊल उचललं आहे. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जमा होणारा निधी जलसंधारणाच्या कामासाठी वापरायचं असं या  फेसबुक दिंडी टिमच्यावतीनं जाहीर करण्यात आलं. जलसंधारणाचं काम करणाºया सामाजिक संस्थेस हा निधी उपलब्ध करु न दिला जाणार आहे. 
जाहली गर्दी दरबारात,
लोटला महापूर भक्तांचा. . .
उधळतो भंडारा चहूदिशानी,
होतो नामघोष मल्हारीचा. . . 
अशा नामघोषात भरपावसातही भाविक पालखीसोहळ्याचा आनंद घेत आहेत. वारी, वारकरी संप्रदाय, पालखी सोहळा याविषयीचे तरुणांच्या मनातील कुतूहल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकट होताना दिसत आहे. काही कारणामुळे प्रत्यक्षात दिंडीत सहभागी न होणाया मंडळींसाठी फेसबुक दिंडी ही पवर्णीच ठरली आहे. २०११ साली स्वप्नील मोरे या तरु णाने प्रत्यक्षात आणलेल्या संकल्पनेला आता प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  आज हजारो नेटकरी अप्रयक्षरीत्या या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत.  तुकाराम महाराजांच्या पालखीला असलेल्या जीपीएस यंत्रणेद्वारे पालखीचे वास्तव्य कुठे आहे, रिंगण, याची माहीतीही येत्या काळात मिळू शकणार आहे. पोलीस प्रशसनालाही या यंत्रणेचा फायदा होणार आहे. 
 श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाच्या सहकार्याने व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती’ यांच्यातर्फे पालखी सोहळयाया काळात ‘फेसबुक दिंडीला’ लाईक/जॉईन करणाया प्रत्येक ई वारकºयामागे एक रु पया अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. सोबतच आॅनलाईन तसेच वारीत चालणासोबतच आॅनलाईन तसेच वारीत चालणाया वारकरी शेतकरी मित्रांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 
फेसबुक दिंडीमुळे जगभरातील व्हर्च्युअल दिंडीला भेट देणाºया भाविकांच्या संखेत लक्षणीय वाढ होत आहे. भाविकांना  लाईव्ह दिंडीचा  व्हर्चुअल अनुभव घरबसल्या घेता येतो.  सध्या स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमीत कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर या टीममध्ये कार्यरत आहेत.  राज्यातील टंचाईची तीव्रता विचारात घेता यंदा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती संगोपन आणि जनजागृती मोहीम सोबतच काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने फेसबुक दिंडी टीमचा प्रस्ताव मान्य झाल्याचे स्वप्नील मोरे यांनी सांगतो.

Web Title: One such Facebook Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.