नाकात रिंग, रिंगवाला फोटो

By Admin | Updated: April 5, 2017 17:45 IST2017-04-05T16:09:23+5:302017-04-05T17:45:16+5:30

गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या एफबी आणि इन्स्टा अकाउंटवर एक लाट आलीय. नाकात नथ...

Nose ring, Ringwall photo | नाकात रिंग, रिंगवाला फोटो

नाकात रिंग, रिंगवाला फोटो

- भक्ती सोमण
 
गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या एफबी आणि इन्स्टा अकाउंटवर एक लाट आलीय. 
नाकात नथ... 
म्हणजे काय तर नोज रिंग घातल्यावर काढलेल्या फोटोंची ही लाट आहे. आता नथ आम्हाला माहितेय! पण, हे नोज रिंग काय भानगड आहे?
तर ही नोज रिंग म्हणजे नथीचा आधुनिक अवतार. 
नथ म्हटलं की मोती आणि सोन्याची पारंपरिक नथ. 
ही साडीवर तर आणखी खुलून दिसते हे आपल्याला घरातून अगदी चांगलं माहिती असतं. किंबहुना आपण आपल्या आई-आजीचं नथीवरचं प्रेम बघितलेलं असतं. पण ट्रेण्ड वो बदलता है बॉस...
तर आता ट्रेंड आहे तो नोज रिंग घालण्याचा. ही रिंग साडीवरच नाही तर अगदी ड्रेस, जीन्स सगळ्यावर उठून दिसते. यात सोन्यापेक्षा जास्त चलती आहे ती सिल्व्हर किंवा आॅक्सिडाईज रिंगची. जरा गुगललं की तुम्हाला या नोज रिंगचे असंख्य आणि अफलातून प्रकार पाहायला मिळतील. त्यात तुमचं नाक टोचलं असेल तर ठीक. नसेल तर नुसत्या चापाच्या नथीचेही भरपूर पर्याय दिसतात. लग्नकार्यात घालतो ती नथही आॅक्सिडाईजमध्ये उपलब्ध आहे. या रिंगला फॅशन स्टेटमेण्ट मिळतं आहे. 
म्हणून तर नथ घालून फोटो टाकण्याचा जमाना आलाय..
 
 

 

Web Title: Nose ring, Ringwall photo