NO बेकंबे

By Admin | Updated: October 15, 2015 18:04 IST2015-10-15T18:04:04+5:302015-10-15T18:04:04+5:30

ठरलेल्या प्रश्नांना, ठरवलेल्या उत्तरांना, मळलेल्या वाटांना, घिशापिटय़ा जगण्याला ठाम नकार!

NO bakamba | NO बेकंबे

NO बेकंबे

>माणूस चंद्रावर जाईल नि
मंगळावर पाणी शोधेल,
आकाशात उडेल आणि हजारो किलोमीटरवर बसलेल्या
माणसांशी थेट बोलू शकेल
असं कोणो एकेकाळी जर कुणी म्हणालं असतं तर
लोकांनी त्याला वेडय़ात नसतं काढलं?
- काढलंच असेल!!
पण तरीही काही माणसांच्याच डोक्यात या आयडिया आल्या ना, की उडून पाहू.
पृथ्वीच्या बाहेर जाऊन आपली पृथ्वी कशी दिसते ते पाहू?
एका डबीसारख्या दिसणा:या वस्तूला नुस्तं टच केलं तरी
दूरदेशी राहणा:यांशी बोलू, त्यांना पाहू, गप्पा मारू.
हे सारं ‘सुचलं’ तो क्षण कसा असेल?
कशातून आला असेल याचा नुस्ता विचार करून पहा!
‘शक्यच नाही’ असं म्हणत ही माणसं हातावर हात धरून बसली असती तर आजचं जग दिसलंच नसतं..
जगाच्या दृष्टीनं अतार्किक, इल्लॉजिक, बे सिर पैर की बात करणा:या आणि आहे त्या प्रश्नात भलतंच काहीतरी उत्तर शोधणा:या या माणसांच्या भन्नाट कल्पनाशक्तीची कृपा म्हणून आपल्या वाटय़ाला आजचे दिवस आलेत!
वेगळ्या अर्थानं ही क्रिएटिव्हीटी बंधनच तोडत होती,
सीमाच ओलांडत होती माणूस म्हणून असलेल्या मर्यादांच्या!
या माणसांनी सगळ्याच सीमा नाकारल्या, 
समाजाच्याच नाही तर स्वत:च्याही! विचारांच्या, कल्पनेच्या आणि अगदी स्वत:च्या मनाच्याही!
आणि सोबत म्हणून अगदी आपली सावलीही नको म्हणत नवीनच वाटा हुडकल्या आणि नव्याच नजरेनं जग पाहिलं!
असं नव्या नजरेचं जग आपल्याला पाहता येईल.
बेकंब बे करण्यापेक्षा दुस:या पद्धतीनं गणित सोडवता येईल? मान्य करता येईल की तीन वजा एकही दोन असू शकतात आणि 1 अधिक 1 ही दोनच असतात. 
मनाचा हा मोकळेपणा आणि निवांतपणा मात्र त्यासाठी हवा!
तो असेल तर झाडावरून पडलेलं सफरचंद दिसेल, ते वरून खालीच का आलं वर का नाही गेलं असा प्रश्न मनात पडेल..
आणि मग कुणातरी न्यूटनला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय याचा उलगडा होईल!!
पण इतपत कुतूहल, विचार करण्याची ताकद, वेगळं काही पाहणारी नजर आणि त्यातून वेगळं उत्तर शोधण्याची कल्पक बुद्धी हे सारं एका जागी एकवटायला मात्र हवं.
ते कसं जमेल?
तर त्याचं उत्तर एकच, स्वत:ला मोकळं सोडा!
करा भन्नाट विचार, जरा हसून पहा प्रश्नांकडे आणि उत्तर म्हणून भलतीच रिअॅक्शन देत चकवता येतंय का पहा त्या प्रश्नांना.
असंच स्वत:सह इतरांनाही चकवत निघालेले काही दोस्त या अंकात भेटतील..
त्यातली एक आहे सीमापारची ङोनिथ.
पाकिस्तानातली, सगळा देश पहायचा म्हणून ती एकटीच बाईक घेऊन पाकिस्तानात फिरतेय. एकटय़ा मुलीनं ‘असं’ फिरणं तिथं ङोपत नाहीये कुणालाच, पण ङोनिथचं म्हणणं एकच, मला माझा देश पहायचाय, मी जाणारच!
तसाच एक अक्रम. तो तेलंगणाचा. सायकल घेऊन देशभर भटकतोय. त्याचं स्वपAय बॉर्डरलेस वर्ल्डच. तो म्हणतोय. माणसांना देशांच्या सीमा बांधणार नाहीत अशा जगाचं स्वपA मी पाहतोय. म्हणून फिरतोय.
आणि इयत्ता आठवीतला आर्यमन, तो शोधतोय की मनाला पंख फुटले आणि विचारांत नव्या नजरेची जादू भरली तर जग किती वेगळं दिसतं ते ही.
त्यांच्यासोबत आहेत राज्यातल्या खेडय़ापाडय़ात असा वेगळा विचार घेऊन काम करणारे, स्वत:च्याच मर्यादा तोडणारे तीन मित्र. 
आणि ड्रायव्हरची गरजच नसलेल्या कारचं स्वप्न पाहणा:या अशाच एका वेडय़ा स्वपAाचं प्रत्यक्षात येणं.
या अंकाचा हा प्रवास.
आणि हे मित्र तुम्हालाही कदाचित विचारतील की.
त्याच त्या रेघोटय़ा ओढाल की,
नव्या वाटा हुडकत मस्त मनमोकळं,
नवंकोरं जगाल?
उत्तर शोधायचंय.
उलटा पान.
 
- ऑक्सिजन टीम
 

Web Title: NO bakamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.