शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लूकिंग जपान टॉकिंग चायना, परदेशी भाषा शिकण्याचं नवं स्किल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 07:00 IST

भाषा शिक्षणाला महत्त्व आहेच, तुमची डिग्री कोणतीही असो तुमच्याकडे चिनी-जपानीसह एखादी परकीय भाषेचं ज्ञान असेल तर नव्या काळात तुम्हाला संधी जास्त आहे.

ठळक मुद्देपरकीय भाषा शिकणं हे अत्यंत उपयुक्त ठरते.

- डॉ. भूषण केळकर

फ्रान्समध्ये गेल्यानंतर"Bon jouv  म्हणून सुरुवात केलीत आणि पुढचं सर्व संभाषण इंग्रजीमध्ये केलंत तरी फ्रेंच लोकं तुम्हाला प्रेमानेच वागवतील’’, असा सल्ला तुम्हाला अनेक तज्ज्ञ व जाणकार लोक देतील आणि त्यात सत्यता आहेच. मला तर पुढं जाऊन वाटतं की, "Bon jouv नी सुरुवात केली आणि नंतर हसून मराठीत बोललो तरीही फ्रेंच लोक प्रेमाने वागवतील. विनोदाचा भाग सोडा; पण भाषेमध्ये जोडण्याची ताकद आहे तर खरंच !मागील एका लेखमालेत आणि मागील आठवडय़ातील लेखात भाषाप्रभुत्व यातला आपण संवाद केला. त्याला उत्तम प्रतिसादपण होता आणि अनेक विद्याथ्र्याचे काही प्रतिनिधिक प्रश्नपण होते म्हणून तोच भाषाप्रभुत्व हा विषय आजच्या संवादला जरा पुढे नेऊ.त्यानिमित्ताने मला तुम्हाला दोन घटना सांगू देत, की ज्यामुळे विशेषतर्‍ विद्यार्थीवर्गाला हे लक्षात येईल की, परकीय भाषा शिकणं हे अत्यंत उपयुक्त ठरते.माझा एक मित्र कॉमर्सला होता आणि बराच वेळ मोकळा असतो. म्हणून जपानी भाषा शिकला आणि ती भाषा खूप आवडली म्हणून त्याने बर्‍याच पातळ्या पार केल्या आणि केवळ बी.कॉम. झालेला हा माझा मित्र अमेरिकन कंपन्यांच्या जपान व सिंगापूरच्या ऑफिसेसमध्ये महत्त्वाची पदं भूषवतो आहे.पुण्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील एक मुलगी इंजिनिअरिंगमध्ये खूप विशेष प्रगती नव्हती; पण सेकंड क्लास नीट मिळाला होता. वर्गात साधारण समजली जात असल्यानं कॅम्प्समध्ये तिची निवड झाली नाही. परंतु तिने इंजिनिअरिंगच्याच पहिल्या वर्षापासून JLPTची म्हणजे जपानी भाषेची तयारी केली होती व त्यातील N3' या पातळीर्पयत पोहोचल्यामुळे तिला थेट जपानमधील क्योतो या शहरात नोकरी मिळाली आहे आणि तिच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींच्या चौपट पगार तिला सहज मिळणार आहे !माझं तुम्हाला सांगणं आहे की, यापुढच्या काळात जर्मन व फ्रेंच या बरोबर किंवा मी तर म्हणीन काकणभर अधिकच म्हणून चिनी वा/आणि जपानी भाषा तुम्ही शिकावीत. तुम्हीच विचार करा की, तुमच्या आजूबाजूला जर्मन-स्पॅनिश फ्रेंच भाषा येणारे किती आहेत आणि चिनी-जपानी येणारे किती आहेत ! तुमच्या लक्षात येईल की जर्मन-फ्रेंचपेक्षा तुम्हाला चिनी भाषेचा प्रभाव वाढता आहे आणि जपानी भाषा येत असेल तर जपानमध्ये नोकर्‍या उत्तमरीतीने उपलब्ध आहेत. मागणी आणि पुरवठा यांच्या गणितात चिनी-जपानी भाषेची बाजू भरभक्कम होत जाणार आहे असं वाटतं.अगदी ‘इंडस्ट्री 4.0’च्या म्हणजे तंत्रज्ञान वेगात बदलत असणार्‍या काळातसुद्धा अगदी गूगल ट्रान्सलेट किंवा NLP च्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातसुद्धा भाषाप्रभुत्व उपयुक्त ठरेलचं. 

तंत्रज्ञानाचा वापर - विशेषतर्‍ ज्याला अ‍ॅलमेंटेड रियालिटी- व्हच्यरुअल रिअ‍ॅलिटी व मिक्स्ड रिअ‍ॅलिटी म्हणतात त्याने आमूलाग्र बदल होतील याची जाणीवपण ठेवू. एका महिलेची हुबेहुब ँholographic प्रतिमा; तिला माहिती नसणार्‍या जपानी भाषेत तिचे भाषण कसे सादर करते आहे आणि जग कुठे चालले आहे. हे तुम्ही बघून ठेवणेपण आवश्यक आहे.

चिनी भाषा शिकणं महागडं आहे हे मला मान्य आहे; परंतु तुम्ही  HSK3 व  HSK34 या पातळ्यांर्पयतPeking University चा  Coursera.org  या वेबसाइटवरील विनामूल्य शिक्षणाचा लाभ घेऊ शकता, जगात कुठंही राहून हे करता येणं शक्य आहे.