पर्यावरणाच्या कामाला नवे हात

By Admin | Updated: May 7, 2015 18:03 IST2015-05-07T18:03:33+5:302015-05-07T18:03:33+5:30

पर्यावरणपूरक काम करण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत आणि त्यातून जन्माला येत आहेत काही नवीन कामं

New hand to environmental work | पर्यावरणाच्या कामाला नवे हात

पर्यावरणाच्या कामाला नवे हात

>सस्टॅनिबिलिटी एक्सपर्ट
हे एक अत्यंत हायप्रोफाइल काम आहे. विकास की पर्यावरण या आजच्या लढाईत शाश्वत विकास आणि पर्यावरणाची जपणूक या दोन्हीचा उत्तम मेळ साधत काम करण्याचं तंत्र सांगणा:या तज्ज्ञांना सस्टॅनिबिलिटी एक्सपर्ट असं म्हणतात. हे तज्ज्ञ बडय़ाबडय़ा मल्टिनॅशनल कंपन्यांसह सरकारबरोबरही काम करतात. ज्यांना पर्यावरणात रस आहे आणि मॅनेजमेण्टही कळतं अशा हुशार माणसांसाठीचं हे नवंकोरं काम आहे.
काम काय?
कुठलाही नवीन प्रोजेक्ट सुरू होत असताना त्या प्रोजेक्टची कास, त्यातून होणारा शाश्वत विकास, त्यासाठी मोजावी लागणारी आर्थिक किंमत, पर्यावरण या सा:याचा मेळ घालत उत्तम प्रोजेक्ट कसा होईल याचं नियोजन करणं.
संधी कुणाला?
एन्व्हायर्नमेण्ट सायन्स आणि बिझनेस मॅनेजमेण्ट यापैकी एक डिग्री किंवा दोन्ही डिग्य्रा कमवणा:यांना या हायप्रोफाइल जॉबची संधी आहे.
 
एपिडेमीऑलॉजिस्ट
हा शब्ददेखील आपल्या कानावरून गेलेला नसतो. पण आपल्या आयुष्यात या कामाचं स्थान आजही आहे. वेगवेगळे व्हायरल रोग, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू यांसारखे आजार. हे सारं पहिल्यांदा कुणाला कळतं? कोण यावर संशोधन करतं तर ते हे एपिडेमीऑलॉजिस्ट. महामारी असं ज्याला मराठीत म्हणतात त्याच शाखेचा हा अभ्यास आणि त्यात काम करणारे हे शास्त्रज्ञ. नव्या जगात असे आजार आणि त्यात काम करणारे तज्ज्ञ यांची मोठी गरज भासणार आहे. अत्यंत हुशार आणि मेहनती माणसांसाठीचं हे एक आव्हानात्मक फिल्ड ठरणार आहे.
काम काय?
या नवनव्या व्हायरसचा शोध लावून, त्यावर संशोधन करून उपचार तयार करणो, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे या प्रोफेशनल्सचं काम असतं. 2क्2क् र्पयत ज्या क्षेत्रत मनुष्यबळ कमी असेल आणि कुशल मनुष्यबळ आणखी कमी असेल त्यातलं हे एक फिल्ड आहे.
संधी कुणाला?
सार्वजनिक आरोग्य या विषयातली डिग्री, एपिडेमीऑलॉजी यातलं स्पेशलायङोशन किंवा मायक्रोबायॉलॉजीतली डिग्री हे यासाठी आवश्यक.
 
गार्बेज डिझायनर
गार्बेज म्हणजे कचरा.आणि तो काय डिझाइन करायचा असा पहिला प्रश्न येईलही तुमच्या मनात. मात्र नव्या जगात जर कच:याचं व्यवस्थापन नीट केलं नाही, पुनर्वापर केला नाही तर मात्र प्रदूषण आणि कचरा सगळ्या जगालाच विळखा मारेल हे उघड आहे. आणि त्याचमुळे या कचरा व्यवस्थापनाची आणि त्याच्या पुनर्वापराची एक व्यवस्था म्हणजे हे गार्बेज डिझायनिंग. कच:यातून कलेचा एक नवा प्रकार.
काम काय?
कचरा रिसायकल करून त्यातून नव्या क्रिएटिव्ह वस्तू बनवणं, त्या वापरायोग्य असणं आणि अनेक लोकांना वापरता येणं हे आव्हान समोर ठेवून हे गार्बेज डिझायनर कच:यातून नव्या वस्तूची आखणी करतात.
संधी कुणाला?
मटेरिअल सायन्सची पदवी किंवा इंजिनिअरिंग, इण्ड्रस्ट्रिअल डिझाइनचा कोर्स यासाठी उपयुक्त.
 
हिप्पोथेरपिस्ट/इकोसायकॉलॉजिस्ट
हॉर्टिकल्चर थेरपीमधला हा एक नवा प्रकार. यालाच इकोसायकॉलॉजी असंही म्हणतात. नावावरून असं वाटेल की हे काय झाडाझुडपांचे सायकॉलॉजिस्ट असतात की काय? पण तसं नाही. मानसिक रुग्णांसाठी एक प्रकारची थेरपी म्हणून या इकोसायकॉलॉजिस्टकडे पाहिलं जातं. झाड लावणं, बागकाम, निसर्ग सहवास यातून ते मानसिक रुग्णांवर उपचार करतात. 
काम काय?
ज्यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे किंवा ज्यांच्यावर प्रचंड तणाव आहे त्यांच्यासाठी बागकाम करवून, झाडांची देखभाल घ्यायला लावून, विविध झाडांच्या वापरानं काही प्रक्रिया करवून हे इकोसायकॉलॉजिस्ट काम करतात. रिहॅबिलिटेशन सेण्टर, तुरुंग, शाळा, हॉस्पिटल इथे या सा:याचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो.
संधी कुणाला?
हॉर्टिकल्चरची डिग्री, सायकॉलॉजीचा कोर्स करणा:यांना यात वाव असू शकतो.
 
रीवाईल्डर
माणसांचं जंगलावर आक्रमण नवीन नाही. जंगल तोडायला खूप माणसं मिळतात. जंगल लावायला?
तशी माणसं मिळावीत म्हणून हे एक नवीन काम तयार होतं आहे, त्याचं नाव आहे रीवाईल्डर. जंगल लावणं हेच या माणसांचं काम.
काम काय?
रस्ता रुंदीकरणात गेलेली झाडं, मोठय़ा प्रकल्पात उजाड होणा:या टेकडय़ा, बोडके डोंगर या सा:या ठिकाणी झाडं लावणं, ती जगवणं आणि वृक्षविविधता कायम राखणं हेच या रीवाईल्डरचं काम.
संधी कुणाला?
या कामासाठी खरंतर पॅशन हवं. त्यासोबत हवं वाइल्डलाइफ मॅनेजमेण्ट, अॅग्रीकल्चर, इन्व्हार्यमेण्टल सायन्स या विषयातली डिग्री आवश्यक.

Web Title: New hand to environmental work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.