नेटपॅक मारा यार.

By Admin | Updated: December 11, 2014 20:46 IST2014-12-11T20:46:52+5:302014-12-11T20:46:52+5:30

या देशात ना म्हणे आता तरुण मुलांचे सरळ दोन भाग पडतात. एक- ज्यांनी आपल्या मोबाइलवर नेट पॅक मारलेले आहेत असा वर्ग.

Netpac hit man | नेटपॅक मारा यार.

नेटपॅक मारा यार.

>या देशात ना म्हणे आता तरुण मुलांचे सरळ दोन भाग पडतात.
एक- ज्यांनी आपल्या मोबाइलवर नेट पॅक मारलेले आहेत असा वर्ग.
दोन- ज्यांनी आजवर आपला मोबाइल गाणी ऐकण्यापलीकडे कशासाठीही वापरलेला नाही असा दुसरा वर्ग. या वर्गातले बहुतेकजण मोबाइलचा वापर गाणी ऐकण्यासाठीच करतात, 
मेमरी कार्ड भरून आणायचं आणि ऐकत सुटायची गाणी.
तसे वरवर पाहता, हे दोनच गट दिसत असले तरी एक मधला तिसरा वर्गही आहे. ज्यांनी आजवर कधी आपल्या फोनवर नेट पॅक मारलेलं नाही. पण व्हॉट्स अँप हा शब्द ऐकून ऐकून त्यांना आता प्रचंड न्यूनगंड छळू लागला आहे.
‘तू व्हॉट्स अँपवर ये ना यार, ’ अशा मित्रमैत्रिणींच्या सूचना आणि तिथल्या ग्रुपवर पडीक राहून तिथं ते करत असलेली मजा ऐकून बाकीच्यांना आपण म्हणजे अगदीच जुनाट आहोत असं वाटायला लागतं.
शंभर रुपयाचं का होईना कधी एकदा आपण नेटपॅक मारतो असं होऊन, चायनामेड का होईना फोन घेऊन व्हॉट्सअँपतो असं त्यांना होऊन जातंय.
 
नेमकी अशी काय जादू आहे ही?
नेटपॅक मारल्यानं आणि ‘कनेक्ट’ झाल्यानं लाइफ बदलूनच जातं असं खरंच वाटतं का तुम्हाला?
 
तुमचा अनुभव काय सांगतो,
आठवून आठवून खरं खरं सांगा. आपल्या मोबाइलवर नेटपॅक मारलाच पाहिजे असं का वाटलं होतं तुम्हाला?
तसं जेव्हा वाटलं, त्यासाठी काही निमित्त घडलं का?
ते निमित्त, कुणाचा एखादा टोमणा, किंवा कुणीतरी पटवून दिलं महत्त्व मोबाइलनेटचं, ते सारं आजही आठवतं का तुम्हाला?
आपल्या हातात मोबाइल आहे, त्याच्यावर नेट आहे आणि जगात कायपण घडलं तरी आपल्याला लगेच कळतं, आता आपण कुणावर डिपेण्ड नाही असं वाटायला लागलं का?
एकदम मित्रमैत्रिणींमधे भाव वधारला, एकमेकांच्या ‘टच’मधे पूर्वीपेक्षा जास्त राहता येऊ लागलं, असं काही वाटायला लागलं का?
 
नेमकं काय होतं हे 
‘टच’वालं फिलिंग?
१) नेटपॅक मारलं आणि यार आपलं लाइफच बदलून गेलं, असं खरंच वाटतं का तुम्हाला?
२) ते बदललं म्हणजे काय बदललं?
आपण एकदम फॉरवर्ड आहोत, जगात काय पण चाललं तरी कळतं, असा कॉन्फिडन्स आला?
३) आपण कुठं राहतो, गावात की खेड्यात याला काही महत्त्व उरलं नाही, आपल्या हातातला फोन आपल्याला नव्या जगाशी जोडतोच, असं वाटतं का?
४) या नेटपॅकमुळे, कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला खूप फायदा झाला असा एखादा तुमचा अनुभव आहे का?
 
असतील तर नक्की लिहा.
नेटपॅक मारल्यानं एकदम पॉवरपॅक झालेल्या तुमच्या आयुष्याची.
तुमच्या अनुभवाची, त्यासाठी आईबाबांशी भांडून मिळवलेल्या परवानगीची आणि पैशांचीही.
नेटपूर्वीचं जगणं आणि आताचं जगणं यातल्या फरकाची.
 
लिहा बिंधास्त, करा मन मोकळं.
आणि नक्की सांगा,
एक नेट पॅक मारल्यानं
लाइफ बदलल्याची तुमची गोष्ट.
अंतिम मुदत- १९ डिसेंबर २0१४
पत्ता - शेवटच्या पानावर तळाशी
पाकिटावर ‘नेटपॅक मारा यार.’ 
असा उल्लेख करायला विसरू नका.

Web Title: Netpac hit man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.