‘कुरकुर’ गोळे

By Admin | Updated: November 13, 2014 21:24 IST2014-11-13T21:24:44+5:302014-11-13T21:24:44+5:30

हाय. चला, आज थेट डायरेक्ट मुद्दय़ाचंच बोलूया. बाकीच्या जगाचे प्रश्न, प्रॉब्लेम्स, कटकटी जरा ठेवू बाजूला.

'Murmur' balls | ‘कुरकुर’ गोळे

‘कुरकुर’ गोळे

 

- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
हाय. चला, आज थेट डायरेक्ट मुद्दय़ाचंच बोलूया.
बाकीच्या जगाचे प्रश्न, प्रॉब्लेम्स, कटकटी जरा ठेवू बाजूला.
आणि जरा थेट स्वत:कडे पाहू.?
दोन किलोमीटर धावत जायची ताकद नाही आपल्यात, आपण काय मोठेमोठे स्वपA पाहतो?
तब्येत काय आपली?
‘यू आर, व्हॉय यू इट’.
असं इंग्रजीत एक सुभाषित आहे.
म्हणजे काय तर तुम्ही जे खाता, तुमचे विचार, तुमचं व्यक्तिमत्त्वही तसंच बनत जातं.
आणि आपण काय खातो?
वडापाव? समोसा? पाववडा? कुरकुरे? भेळ, रगडा आणि पाणीपुरी?
पितो काय?
सतत कोल्ड्रिंक?
आणि रात्री अजूनही काहीबाही?
- ‘कुरकुर’ नाही करणार आपली तब्येत तर दुसरं काय?
सतत काही ना काही दुखतं खुपतं?
कुणाचं वजन प्रचंड वाढून नुस्ता कणकेचा गोळा झालाय?
तर कुणी एकदम सुकडा बोंबील?
जरा अभ्यासाला जास्तवेळ बसलं की दुखलीच पाठ? डोकं तर काय नेहमीच दुखतं.
मूड तर काय सतत जातात?
आणि जेवण?
ते आपण करतो कुठं?
आणि केलं तरी टीव्ही चालूच.
तोंडात काय भरतो आणि भाजीची चव कशी लागते, आपल्याला काय माहिती?
जर आपलं पोषणच असं इतकं भुसभुशीत असेल, तर काय आपण मोठी कामगिरी करणार? काय स्वपA पाहणार नि काय पूर्ण करणार?
-विचार करून पहा.
बी सिरियस!
जरा काळजी घ्या स्वत:ची.
चांगलंचुंगलं खा. जरा व्यायाम करा.
आणि स्वत:वर प्रेम करा.
प्लीज टेक केअर.!
 
 

Web Title: 'Murmur' balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.