मोबाइलचा सिक्युरिटी गार्ड

By Admin | Updated: September 10, 2015 20:56 IST2015-09-10T20:56:12+5:302015-09-10T20:56:12+5:30

स्मार्टफोनची सुरक्षा हा एक मोठा प्रश्न. हल्लीचे स्मार्टफोन हे बरेच महागडे असतात. त्यामुळे ते चोरी होण्याचे प्रमाणही बरंच वाढलं आहे. चोरी झालेला स्मार्टफोन ट्रेस करणं सोपं असतं हे आपल्याला माहिती आहे

Mobile's Security Guard | मोबाइलचा सिक्युरिटी गार्ड

मोबाइलचा सिक्युरिटी गार्ड

 स्मार्टफोनची सुरक्षा हा एक मोठा प्रश्न. हल्लीचे स्मार्टफोन हे बरेच महागडे असतात. त्यामुळे ते चोरी होण्याचे प्रमाणही बरंच वाढलं आहे. चोरी झालेला स्मार्टफोन ट्रेस करणं सोपं असतं हे आपल्याला माहिती आहे, तसंच ते चोरांनाही माहिती आहेच. मात्र, असे चोरलेले स्मार्टफोन फक्त गेमिंग डिव्हाईस म्हणूनसुद्धा विकत घेणारे अनेक आहेत. म्हणजे त्याचा अनेकजण फोन म्हणून वापर न करता, स्वस्तात मिळणारं गेम खेळण्याचं साधन म्हणून ते घेतात. 

मात्र समजा चोरीच्या स्मार्टफोनमधे सीमकार्ड टाकण्याचा प्रयत्न जर चोरानं केला तर मात्र तुमचा स्मार्टफोन ट्रेस होऊ शकतो. आपला फोन चोरीला गेलाच तर निदान तो ट्रेस करता येईल इतपत तरी खबरदारी आपल्याला घेता येऊच शकते.
मोबाइल ट्रॅकर हे सध्याच्या स्मार्टफोनसाठी अत्यंत आवश्यक असे टूल झाले आहे. पूर्वी मोबाइल ट्रॅकर ही सुविधा फक्त काही मोबाइलमध्ये इनबिल्ट उपलब्ध होती. मोबाइल ट्रॅकर म्हणजे अशी सुविधा, ज्यामधे तुम्ही एखादा मोबाइल नंबर टाकला की, जेव्हा जेव्हा तुमच्या मोबाइलचे सीमकार्ड बदलले जाईल तेव्हा तुम्ही जो मोबाईल नंबर ट्रॅकरमध्ये टाकला आहे त्या नंबरवर एक मेसेज जाईल, म्हणजे त्या मेसेजवरून तुम्हाला कुठल्या नंबरवरून मेसेज आला हे बघून तुमचा मोबाइल शोधू शकता. यासाठी पूर्वी फक्त काही मोबाइल हँडसेटमध्ये ही सुविधा होती. म्हणजे मोबाइल ट्रॅकर ही सुविधा असलेला मोबाइल चोरीला जरी गेला तरी चोरी करणारा जेव्हा हा मोबाइल वापरण्यासाठी त्यामध्ये सीमकार्ड टाकेल तेव्हा लगेच मोबाइल ट्रॅकरमध्ये टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. त्यामुळे तुमचा चोरीला गेलेला मोबाइल परत मिळविण्यासाठी खूप मदत होते. मात्र, अनेक  मोबाइलमध्ये ही सुविधा नसते आणि असली तरी ती कशी वापरावी याबद्दल अनेकांना माहिती नसते. यासाठी एक खूप चांगले सोल्युशन सध्या अॅण्ड्रॉईड अॅपमध्ये उपलब्ध आहे. प्रे नावाचे हे अॅण्ड्रॉईड अॅप खूप चांगले मोबाइल ट्रॅकर म्हणून सिद्ध झाले आहे. त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनच्या मस्ट हॅव अॅपच्या यादीमध्ये ते हवेच.
 
 
प्रे? आहे काय?
 
1) शंभर टक्के मोफत
प्रे या अॅण्टी थेफ्ट अॅपसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. ते शंभर टक्के मोफत आहे. शिवाय एका अकाउंटवर तीन वेगवेगळे डिव्हाइस तुम्ही प्रोटेक्ट करू शकता, म्हणजे स्मार्टफोनची सुरक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि तीही अगदी मोफत होऊ शकते.
2) सीम चेंज डिटेक्शन
प्रेचे सगळ्यात महत्त्वाचे फीचर म्हणजे सीम चेंज डिटेक्शन. म्हणजे जेव्हा तुमचा स्मार्टफोन चोरीला जाईल किंवा हरवून जाईल अशा वेळी चोरी करणारा किंवा ज्याला तुमचा स्मार्टफोन सापडला अशी व्यक्ती जेव्हा एखादे सीमकार्ड तुमच्या स्मार्टफोनमध्ये टाकेल तेव्हा तुम्हाला तुम्ही जो दुसरा मोबाइल नंबर प्रेमध्ये टाकाल त्यावर लगेच एक मेसेज येईल. म्हणजे लगेच तुम्हाला कळेल की कोण तुमचा स्मार्टफोन वापरतंय.
3) जीपीएस आणि वायफाय
प्रेमध्ये असे फीचर आहे की, त्यामुळे तुमचा मोबाइल नेमका कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे त्याचे जिऑग्राफिकल लोकेशन कुठे आहे हे जीपीएस आणि वायफायच्या मदतीने कळू शकेल.
4) एसएमएस अॅक्टिव्हेशन
तुम्ही एसएमएसचा वापर करून तुमचा स्मार्टफोन अॅक्टिव्हेट करू शकता किंवा डी- अॅक्टिव्हेट करू शकता. हेसुद्धा एक चांगले फीचर आहे. त्यासोबतच तुमचे डिव्हाइस लॉकसुद्धा एसएमएसद्वारे करू 
शकता.
5) अनइन्स्टॉल प्रोटेक्शन
याचे अजून एक फीचर म्हणजे तुम्हीच तुमच्या स्मार्टफोनवरील अॅप अनइन्स्टॉल प्रोटेक्ट करू शकता. म्हणजे दुस:या कोणाच्या हातात तुमचा मोबाइल गेला तरी ती व्यक्ती तुमच्या स्मार्टफोनवरील अॅप अनइन्स्टॉल करू शकणार नाही. अनेक वेळा स्मार्टफोन लहान मुलांच्या किंवा ज्याला स्मार्टफोनविषयी फारशी माहिती नाही अशा लोकांच्या हातात गेल्यास अनेक वेळा चुकून अॅप अनइन्स्टॉल होण्याचा धोका असतो. या अॅपमुळे तसे होणार नाही.
 
 
 
 
 

Web Title: Mobile's Security Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.