मोबाईल मॅनर्स
By Admin | Updated: June 28, 2016 19:12 IST2016-06-28T18:52:19+5:302016-06-28T19:12:32+5:30
आपण अनेक गॅजेट्स वापरतो. त्यातलं सगळ्या त महत्वाचं आणि मोलाचं म्हणजे आपल्या हातातला स्मार्टफोन.

मोबाईल मॅनर्स
- निशांत महाजन
आपण अनेक गॅजेट्स वापरतो.
त्यातलं सगळ्या त महत्वाचं आणि मोलाचं म्हणजे आपल्या हातातला स्मार्टफोन.
आपल्याला हा स्मार्टफोन वापरता येतो का पण?
तुम्ही म्हणाल काहीही काय?
नक्कीच येतो.
मग ही टेस्ट घ्या आणि ठरवा तुम्ही की तुम्ही मोबाइल योग्य पद्धतीनं वापरता का?
१) तुमच्या मोबाईलची कॉलर ट्यून एखादं ढिच्यॅँक गाणं आहे?
२) कुठंही जा, मोबाईल कर्कश आवाजात वाजतो?
३) तुम्ही गाडी चालवत असताना फोनवर बोलता?
४) कुठंही मोठमोठ्यानं बोलता?
५) कुणी तुमच्याशी बोलत असलं तरी तुम्ही आलेला फोन पटकन उचलता?
या साºया किंवा यापैकी ३ प्रश्नांची उत्तरं जरी ‘हो’ अशी आली तरी त्याचा अर्थ आपल्याला मोबाईल मॅनर्स शिकायची गरज आहे.