चाय में बारीश की मिलावट!
By Admin | Updated: July 6, 2016 17:27 IST2016-07-06T17:25:08+5:302016-07-06T17:27:11+5:30
आज आॅफिसमधून जरा लवकर बाहेर पडलो, आजची संध्याकाळ थोडी जरा वेगळीच वाटली. पावसची रीमझिम सुरु झाली होती.

चाय में बारीश की मिलावट!
>- सुयोग काळे
आज आॅफिसमधून जरा लवकर बाहेर पडलो, आजची संध्याकाळ थोडी जरा वेगळीच वाटली. पावसची रीमझिम सुरु झाली होती. लोकांची घरी जायची लगबग दिसत होती. मी ही नेहमी प्रमाणे बस स्टॉपकडे वळलो. पण मन काही घरी जायच्या बेतात दिसत नव्हतं.
काय हे रोजचं झालाय मशीन प्रमाणे आपण जगतोय. ठरलेल्या वेळेत आॅफिसला पोहचायचं आणि उशिरापर्यंत काम करून घरी परतायचं.
पण आज नाही, आज थोडे थांबायचं. आज थोडावेळ का होईना स्वत:चं लाईफ जगायचं.
मागे वळलो , समोर बरीस्ता दिसलं. वाटलं जावं आणि एक कॉफी मागवावी. पण तिथं पैशाच्या साºया दिखाव्यापुढे मन रमायचं नाही, असं वाटलं. मग पलीकडे तिकडे चहाची टपरी दिसली, चला तिकडे पोचलो.
वाटलं मित्रांना फोन करावा, पाहू कोण येतंय का?? नको तीच परत ठरलेली कारणं!
‘नाही रे अजून आॅफिसमध्येच आहे, खूप काम आहे!’
एक चहा चा कप उचलला, खिशात वाजणारी चिल्लर शांत केली. साडेपाच फुटाचा माणूस पाावसापासून वाचेन एवढ्या आडोश्याला जायून उभा राहिलो. पण तरीही मला हरवायचं असं काय त्या पावसानं ठरवलं होतं. पावसाचा एक थेंब चहाच्या कपात. त्यानंतर अजून एक- दोन थेंब. मी ही हसलो, वा चाय में बारीश की मिलावट!
मनही हसलं , का रे आज तुला मित्रांची आठवण नाही का येत? मी ही थोडा सावरतच, असं अचानक याला काय झालं? मित्र तर असतातच, त्यांची आठवणही येतेच. पण आता पहिल्यासारखं नाही जमत सारखं मित्र मित्र करायला. प्रत्येकाला स्वप्नाचं आकाश आहे, ते मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या पंखांत धडपड आहे. मग कशाला कुणाला आडवायचे.
खरंतर चार पावलं मागे गेलं कुणाला आवडणार नाही. ते बालपण आणि कालचे कॉलेज लाईफ, कट्यावरची भांडण. पण असं मागे जाता येत नाही, कधीच!
विचारात असं हरवून, पावसातला चहा पिऊनही झाला.
शेजारी बस स्टॉपवर बस उभी होती. बास झालं, ही शेवटची बस आहे. निघायलाच हवं. बसमध्ये चढलो, परत मी एकटा माझ्या एकट्या मनाबरोबर, माझ्या रोजच्या आयुष्यात परतलो!