मिथीला पारकरची फॅशनेबल गाठ! हा कुठला फॅशनचा नवीन ट्रेण्ड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:45 IST2018-08-10T13:44:17+5:302018-08-10T13:45:14+5:30
कपडे तेच, पण त्यात काही स्टाइल हॅक्स केले तर आपला लूक बदलून जातो. करून पाहा.

मिथीला पारकरची फॅशनेबल गाठ! हा कुठला फॅशनचा नवीन ट्रेण्ड?
- श्रुती साठे
फॅशन आणि ट्रेण्ड हे नेहमीच महागडे असतात अशातला काही भाग नाही. काही झटपट ‘स्टाइल हॅक्स’ आपण नेहमीच्या उपलब्ध कपडय़ांमध्ये केले तर ते एक वेगळा, फ्रेश लूक देऊन जातात. आपण स्वतर् काहीतरी वेगळं करायला चाचपडतो; पण तेच आपल्या आवडत्या सेलिब्रिटीने केलं की नक्की ट्राय करावं असं वाटतं.
लूज टी-शर्ट आणि डेनिम हे मुलांचंच काय पण मुलींचंही आवडीचं ‘कम्फी’ कपडे आहेत! लूज टी-शर्टला जरा वेगळा लूक एक छोटीशी गाठ देऊ शकते. समोरच्या बाजूला टी-शर्टचा काठ गोळा करून त्याची गाठ टी-शर्टची लांबी कमी भासवून क्र ॉप टॉप लूक देते. पण हा लूक ट्राय करताना कंबर बांधेसूद असलेली जास्त चांगली दिसते.
आपली अस्सल मराठमोळी यूथ आयकॉन मिथिला पालकर नेहमीच वेगळ्या स्टाइल्स आणि फ्रेश लूकमध्ये दिसते. पांढरा पोल्का डॉट टॉपला दिलेली गाठ बूटकट पॅण्टवर शोभून दिसली. तसेच अनन्या पांडेने मोनोक्र ोम टॉप आणि लेगिंगला वेगळं दाखविण्यासाठी कॉन्ट्रास्ट जॅकेटचा वापर न करता टॉपला गाठ मारून वेगळेपणा आणला.
प्लेन, स्ट्राइप, प्रिण्टेड, बॉक्सी फिट कुठलाही टी-शर्ट वापरून त्याला गाठ मारून नवीन लूक द्या आणि ट्रेण्डी दिसा!