शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

झिरो ते हीरो बनण्याचा बंडखोर प्रवास करणारे रॅपर्स कोण असतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 6:45 AM

कमी कपडय़ातील मुली, चकाचक गाडय़ा, दारूच्या बाटल्या म्हणजे रॅप नव्हे! रॅप म्हणजे झिरो ते हीरो बनण्याचा प्रवास, संघर्षाचा आणि जिंकण्याचा बंडखोर आवाज.

ठळक मुद्दे* भारतातही आता रॅप आणि हिपहॉप तरुण मुलांना आवडू लागलं आहे, हा बदलही महत्त्वाचा आहे.

- अमित इंगोले

अपना टाइम आएगा.. स्ट्रगल करणार्‍या किंवा करावा लागलेल्या प्रत्येकाला ही ओळ आपली वाटतेय. ज्यांच्या मनात खूप काही साचलेलं असतं किंवा ज्यांना काही वेगळं करायचं, ज्यांच्या आत काहीतरी सतत पेटत असतं, ज्यांना लगेच संधी मिळत नाही ते सारेच ‘राइट टाइम’ येण्याची वाट पाहत असतात. ज्यांच्यात काहीतरी क्रिएटिव्ह सतत धडका देत असतं, त्यांना तर वाटतंच की, अपना टाइम आएगा.सध्या तेच झालंय रॅप संगीताचं. गल्ली बॉय सिनेमानंतर सोशल मीडिया आणि गूगलवर अनेकजण गूगलून पाहू लागलेत की, हे ‘रॅप’ काय आहे? रॅप  आधीही बॉलिवूडमध्ये होताच. पण त्याचं फारच विलासी आणि भडक रूप आपल्यासमोर आतार्पयत आलंय. या सिनेमातला मुराद मात्र एक वेगळी गोष्ट सांगताना दिसला. त्यातून समोर आलं रॅपचं खरं रूप. रॅपची रिअ‍ॅलिटी. रॅप.भारतीय संगीत विश्वात संगीताला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची पद्धत आपण पाश्चिमात्य देशांकडून अंगीकारली. तेसुद्धा फार पूर्वीपासून. त्यात रॅपिंग हासुद्धा एक प्रकार आहे. रॅपिंग किंवा हिपहॉप डोक्यावर घेऊन फिरणारी एक मोठी पिढी भारतात आहे. पण रॅपिंगचं जे रूप आतार्पयत बॉलिवूडमधून समोर आलं ते फारच बीभत्स आणि खोटं आहे. कमी कपडय़ातील मुली, लक्झरी कार्स, दारू, फॅशन हेच हनी सिंह आणि बादशाहच्या रॅपमधील मुद्दे आहेत. पण खरा रॅप म्हणजे ते नाही. रॅपिंगचा मूळ उद्देश किंवा वापर हा एखादी गोष्ट, कविता किंवा जीवनातील घटनांना मोकळी वाट करून देण्यासाठी केला जातो. रॅपिंगची सुरुवात पाहिलं तर अफ्रो-अमेरिकन आणि अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय हे सारं बेधडक सांगण्याची रॅपचा वापर केला गेला. एकॉन, केन वेस्ट ही त्याची उदाहरणं.दुर्लक्षित, प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या लोकांच्या माध्यमातूनच रॅपची सुरुवात झाली. कृष्णवर्णीय लोकांचा असमानतेविरोधातील आवाज ठरला तो हा रॅप. केवळ आपली कला दाखवायची म्हणून किंवा कलाकार म्हणून पुढे जायचं म्हणून रॅपर तयार झाले नाहीत. ज्यांना समाजाची झळ पोहोचली, यातना सहन कराव्या लागल्या, समाजानं नाकारलं, कमी लेखलं त्यातून रॅपर झाले.रॅपरचं जगणं, त्यांचं व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणं हे सारं रॅपच्या माध्यमातून झालं. जसजसा काळ पुढे सरकत गेला, लोकांची मानसिकता आणि विचारधारा बदलली. तेव्हा रॅपर्सनीसुद्धा नव्या गोष्टी आत्मसात केल्या. रॅपर्सनी त्यांचा झिरो ते हीरो बनण्याचा प्रवास, त्यात येणार्‍या अडचणी आणि हसत हसत त्या अडचणींशी दोन हात करणं, जीवनातील एकदा निघून गेलेली वेळ परत येणार नाही हे सांगणं, भविष्याची स्वप्न  हे सारं या रॅपमध्ये उतरत गेलं.न हरता लढा हेच सांगतात रॅपर्स. मग परिस्थिती कोणतीही असो. रॅप म्युझिकही तेच सांगतं. आणि तरुणांच्या  संघर्षाचा आणि जिंकण्याचा आवाज बनतं.ती त्या संगीताची ताकद आहे आणि जादूही !

**** सत्तरच्या दशकातील जमैकाच्या संगीतात  हिपहॉप संगीताच्या उत्पत्तीची माहिती मिळते. हिपहॉप किंवा त्याचाच प्रकार असलेला रॅप राजकीय, आर्थिक, सामाजिक अवहेलना आणि गुलामीला वाचा फोडण्यासाठी समोर आला.* रॅप हा संगीतप्रकार हा कृष्णवर्णीय संगीताच्या इतिहासाचा भाग आहे. अत्याचार, असमानता या विरोधात उठणारा तो आवाज म्हणजे रॅप. त्याची भाषा तितकीच धारदार आहे. हे परिवर्तनाकडे टाकलं जाणारं पाऊल आहे. * मुळात त्याची सुरुवातच अमेरिका आणि आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांकडून झाली. कारण त्यांनी यातूनच त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. त्यांच्यावर झालेले अत्याचार यातूनच त्यांनी समोर आणले होते, त्यांचं जगणं अधोरेखित केलं होतं. * रॅप केवळ संगीत नसून क्र ांतीचं, मनातील घालमेल, अत्याचार व्यक्त करण्याचं ते एक शस्र आहे.