शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विद्यापीठाच्या  रिकाम्या  कॅम्पस  मध्ये  जेव्हा  लॉक डाऊन भेटतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:32 IST

शिवाजी विद्यापीठाचं कॅम्पस तसं रिकामं झालं. सगळे गावी गेले; पण काहीजण मागे राहिले, त्यांची एक आनंदी गोष्ट.

ठळक मुद्देछायाचित्रं - नसीर अत्तार

-प्रदीप शिंदे

कोल्हापूच्या शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांमधील वर्गाना सुट्टी दिल्याने वसतिगृहांमधील बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी आपापल्या गावी, घरी निघून गेले. सारं सुनं सुनं झालं. मात्र काही विद्यार्थी प्रोजेक्ट करायचा असल्याने थांबले. काही निवांतपणो अभ्यास करता येईल म्हणून थांबले. गावी जाऊन करायचे काय, म्हणून काहीजण थांबले. तर काही विद्याथ्र्याकडे घरी जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून ते थांबले.काहीजणांना वाटलं, घरं लहान तिथं जाऊन काय अभ्यास होणार आहे. आहे तेच बरं आहे.अशा या ना त्या कारणाने ते वसतिगृहात थांबले.त्यात देशात लॉकडाउन केल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी भवन व तंत्रज्ञान अधिविभागातील 24 विद्यार्थी-विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. बाहेरील परिस्थिती बिकट होत असताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सर्वाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.  आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय सर्वानी घेतला. शिवाजी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी भवन येथे कर्नाटकातील चिक्कोडी, सांगली, पालघर, सोलापूर, शिरोळ या गावांतील सहा विद्यार्थी थांबले आहेत.  एम. ए., नाटय़शास्त्र विभाग तर काही एम. एस्सी. करतात. 

कोरोनामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवून स्वतंत्र खोलीत राहाणो पसंत केले आहे. काहीजण सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, काहींनी योग करून दिवसाची सुरुवात असं रुटीन लावलं. त्यांच्या जेवण्याची सोय मुलींच्या वसतिगृहात केली आहे, मुलं त्या ठिकाणी जातात. जेवण करून पुन्हा विद्यार्थी भवन येथे येतात.  शिवाजी विद्यापीठ परिसरातील शुकशुकाट त्यांना प्रारंभी खात होता. आता मात्र त्याची त्यांना सवय होते आहे. पूर्वी विद्यापीठ परिसरात मोर नागरिकांना बघून घाबरून जात होते. तेसुद्धा या रस्त्यांवर आता बिनधास्तपणो वावरताना त्यांना दिसत आहेत, असं ते सांगतात.  दुपारी थोडी झोप घेऊन काही मुले अवांतर वाचन करण्यासह अभ्यास करताना दिसतात. पुन्हा सायंकाळी सात वाजता जेवण करण्यासाठी सगळे एकत्र जातात. त्यानंतर रात्री पुन्हा गप्पांचा फड रंगतो. मात्र हे सर्व करीत असताना ते ठरावीक अंतर ठेवूनच बसतात, असं या मुलांनी आवजरून सांगितलं.मुलींच्या वसतिगृहामध्ये पुणो, बार्शी, मिरज, दौंड, निगवे खालसा येथील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील चार व वसतिगृहातील एक अशा पाच मुली राहातात. सकाळी लवकर उठून सर्वाच्या जेवणाची तयारी करणं, दुपारी जेवण झाल्यावर अवांतर वाचन, गाणी ऐकणो किंवा अभ्यास करणं, त्यानंतर संध्याकाळी काही वेळ गप्पा मारणो, बॅटमिंटन खेळणं, त्यानंतर पुन्हा जेवणाची तयारी सुरू होते. असं या मुलींचे रुटीन झालं आहे. प्रशासनाने एक महिला वॉर्डन व महिला सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात केले आहेत. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात औरंगाबाद, जालना, मुंबई, पुणो यासह परराज्यातील बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, नागपूर येथील 12 विद्यार्थी रहातात. मुलींचं वसतिगृह लांब असल्यानं आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ते या ठिकाणीच बाहेरून डबा आणून जेवतात.येथील काही मुलं या परिस्थितीकडे संधी म्हणून सकारात्मकपणो पाहत आहेत. कॉलेज नाही, अभ्यास नाही; त्यामुळे निवांत उशिरा उठणं पसंत करतात. दुपारी जेवण, थोडा वेळ लॅपटॉप, मोबाइलवर बातम्या पाहणो, पिक्चर पाहण्यात वेळ घालवतात. काहीजणांनी स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवलं आहे, मात्र प्रत्येकाने स्वतंत्र खोलीमध्ये राहाणो पसंत केलं आहे. बाहेरील परिस्थिती पाहता कॅम्पसमधून बाहेरील कोणी आत येत नाही, आतील कोणी बाहेर जात नाही; त्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत, असं ही मुले  आवजरून सांगतात. सध्या तरी त्यांचं एकेकटं आयुष्य तसं इथं आनंदात चाललं आहे. रिकाम्या कॅम्पसमधले हे दोस्त, वेट अॅण्ड वॉचवरच आहेत.

 

.............  मला सायकल चालवता येत नव्हती. बुद्धिबळ खेळता येत नव्हतं, आता मी तेही वेळात वेळ काढून शिकते आहे. - माधुरी मोहिते, (अंबक,  जि. सांगली) नॅनो सायन्स, द्वितीय वर्ष----------------------------------अभ्यास व्हावा या उद्देशाने मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. मी या ठिकाणीच सुरक्षित असल्याने घरच्या लोकांची चिंता मिटली आहे. दिवसातून किमान तीन वेळा तरी घरातून व्हिडीओ कॉल येतो.  - निकिता बाबर, मिरज; एम.एस्सी. झूलॉजी-----------------------------माझी इंटर्नशिप चालू असल्यानं मी थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. गावी लाइट व इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे गावी जाऊन करायचे काय, हा प्रश्न माङयासमोर होता.  - योगेश घाडेकर, संगणकशास्त्र विभाग, एम. एस्सी. ( तिसरे वर्ष) ------------------------------------------ घरचे वारंवार फोन करून कसा आहेस, याची विचारणा करतात. मात्र या ठिकाणीच खूप सुरक्षित वाटते. - मुझमिल नजार, जम्मू-काश्मीर, बी. टेक. तिसरे वर्ष ------------------------------------------माझा 24 मार्चर्पयत प्रोजेक्ट होता. त्यानंतर मी गावी जाणार होतो, मात्र आता गावी जाणं शक्य नसल्याने मी याकडे संधी म्हणून पाहतो. मी यू.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असल्यानं मला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. - सत्यवान कोळेकर, पुणो; बी. टेक. तिसरे वर्ष-----------------------------------------

( प्रदीप लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.).

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या