शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

रोबोट टीव्ही अ‍ॅँकर झाला, तर आजचे अ‍ॅँकर काय करतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:31 IST

चीनमध्ये एक अ‍ॅँकर तयार झालाय. डिजिटल अ‍ॅँकर. आता तो टीव्हीवर तासन्तास न कंटाळता अचूक बातम्या देऊ शकतो. आपल्या अपेक्षेपेक्षा वेगानं कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून यंत्रं काम करू लागतील, हा बदल इतिहास होण्यापूर्वी आपण समजून घ्यायला हवा.

ठळक मुद्दे ‘आजचा दिवस काय वेगाने ‘इतिहास’ बनेल याची ही फक्त झलक आहे.

-डॉ. भूषण केळकर

मागच्या आठवडय़ातील लेख वाचून अनेकांनी विचारलं की, मग नोकर्‍यांचं काय होणार?  या इंडस्ट्री 4.0 आणि एआयच्या जमान्यात नव्या  रोजगारांच्या संधी पाहता भारतातलं चित्र काय असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आणि त्याचं उत्तरही. अमेरिकेचं दरडोई उत्पन्न 45 हजार डॉलर्स आहे व भारताचं आहे 1500 डॉलर्स. अमेरिकेच्या तुलनेत भारताचं उत्पन्नाचं वितरणही खूप विषम आहे. म्हणजेच बघा ना, भारतीय लोकांच्या 50 टक्के कामगार हे फक्त 11 टक्के जीडीपी निर्माण करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की, इंडस्ट्री 4.0 मुळे नोकर्‍या बदलतील, स्वरूप बदलेल हे खरं असलं तरी भारतामध्ये त्याचा परिणाम वेगाने किंवा प्रचंड मोठय़ा प्रमाणात घडेल असं नाही. इंडस्ट्री 4.0 साठी सर्वात महत्त्वाचा भाग असेल तो म्हणजे जास्त पैसे भरून मशीन्सकडून कामं करून घ्यायची की अनेक कामगार त्यापेक्षा कमी दरात उपलब्ध असताना थोडी कमी कार्यक्षमता ‘चालवून’ घ्यायची. अजून काही वर्षे तरी त्या गणितामुळेच नोकर्‍यांवर भारतात सरसकट गदा येईल अशी चिन्हं नाहीत.परंतु म्हणून आपण बेफिकीर आणि बेसावध राहणं हे विलक्षण आत्मघातकी ठरेल हे ही नक्की!परवा बातमी होती की, विमानतळावर स्वागत करण्यासाठी आता रोबोट्सचा वापर होणार आहे. अजून एक बातमी तुम्ही वाचली असेल की, ‘ािस्तीज’ या लिलावासाठी प्रसिद्ध असणार्‍या संस्थेनं एआयने चितारलेल्या ‘एडमंड डी बेसामी’ या काल्पनिक व्यक्तीचं पोट्रेट (जे अस्पष्ट दिसतं असं मला तरी वाटले!) हे 4 लाखांपेक्षा जास्त डॉलर्सना विकलं (मूळ अपेक्षित लिलाव 7-8 हजार डॉलर्सचा असताना). ‘शियाओल्स’ नावाच्या मायक्रोसॉफ्टच्या एआय आधारित प्रणालीनं चार महिन्यात दहा हजार कविता ‘लिहिल्या’. त्यात एकटेपणा, आनंद, प्रतीक्षा इ. मानवी भावना मांडल्या आहेत. डॉ. अरुणाताई ढेरे यांची आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी परवाच एकमुखी निवड झाली तेव्हा त्यांच्याच कवितेतल्या ओळी आठवल्या..‘‘माझे पाणी बदलले आहे, माझे जाणे आणि गाणेही बदलले आहे’’हे बदलणं आता असं इंडस्ट्री 4.0 र्पयत पोहचलेलं आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्याशी बोलताना, तंत्रज्ञानाचा साहित्य निर्मितीवरचा प्रभाव व अंतर्भाव याबद्दल त्या बोलल्या होत्या तेही आठवलं. प्रतिभा ही विलक्षण गोष्ट आहे!मॉडेलिंग क्षेत्रात म्हणाल तर मार्गो, शुडू आणि झी नावाचे पूर्णतर्‍ एआयवर आधारित मॉडेल्स खूप लोकप्रिय झालीसुद्धा!भोवताली या सर्व गोष्टी घडत असताना आपण हे लक्षात ठेवू की प्रगत देश आणि भारत यात मूलभूत फरक आहे तो तुलनेनं खूपच कमी खर्चात उपलब्ध असणार्‍या प्रचंड मनुष्यबळाचा! त्याचमुळे कार्यक्षमतेत थोडी घट पत्करून, मशीन्सऐवजी माणसांकडून कामं करून घेणं अजून बरीच वर्षे भारतीय व्यावसायिकांना अधिक परवडणार आहे आणि बव्हंशी भारतीय ग्राहक हा गुणवत्तेपेक्षा किमतीबाबत अधिक ‘जागरूक’ आहे तोर्पयत व्यवसायाचं गणित हे असंच राहणार. परंतु त्याचबरोबर गुणवत्तेत बदल करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘नीती आयोगानं’ बर्‍याच ठिकाणी इंडस्ट्री 4.0 चा अंतर्भाव करण्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे आपण आपल्या करिअरसाठी त्यावर लक्ष द्यायलाच हवं.प्रत्यक्षानुव, सातत्यानं निरंतर शिक्षण, अनेक विषयातील ज्ञान मिळवणं व ते उपयोजित असणं, योग्य क्षेत्र निवडणं हे महत्त्वाचं ठरेल. उदाहणार्थ ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, डाटा सायन्स अशी क्षेत्रं.  जिथं मानवी सृजनशीलता व मानवी परस्परसंबंध कळीचे मुद्दे ठरतात अशा एका तरी क्षेत्रात प्रयत्नपूर्वक काम करणं हे उपाय करिअरला उत्तम ठरतील.झिन्हुआ या चीनमधील वृत्तसंस्थेने एआय वापरून वृत्तपत्रनिवेदनाचं काम एका डिजिटल अ‍ॅँकरला दिलं. न थकता, न कंटाळता, चुका न करता काम करणारा डिजिटल अँकर त्यांनी तयार केलाय. आजच्या ताज्या बातम्या देणार्‍या टीव्हीवरच्या अ‍ॅँकरचं हे काम उद्या रोबोट करू लागले तर वृत्तनिवेदक काय करतील? ‘आजचा दिवस काय वेगाने ‘इतिहास’ बनेल याची ही फक्त झलक आहे.( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)