किमान कौशल्यांची कमाल

By Admin | Updated: May 22, 2014 16:08 IST2014-05-22T16:08:22+5:302014-05-22T16:08:22+5:30

राज्य सरकारनं विविध महाविद्यालयांमध्ये किमान कौशल्यावर आधारित (एमसीव्हीसी) व्होकेशनल कोर्सेस (उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभाग) सुरू केले आहेत.

The maximum of minimal skills | किमान कौशल्यांची कमाल

किमान कौशल्यांची कमाल

>कॉलेजातले ‘हटके’ कोर्सेसही दाखवतील स्वयंरोजगाराची वाट
 
ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं नाही किंवा ज्यांना छोटा, मोठा उद्योग सुरू करून अथवा सेवा व्यवसाय करून लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे, अशांसाठी राज्य सरकारनं विविध महाविद्यालयांमध्ये किमान कौशल्यावर आधारित (एमसीव्हीसी) व्होकेशनल कोर्सेस (उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभाग) सुरू केले आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये ‘व्होकेशनल’ विभाग आहे अशा सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावीच्या स्तरावर असे कोर्सेस चालवले जातात.
अनेक विद्यार्थी असे असतात, ज्यांना इच्छा असूनही काही कारणानं आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवता येणं अशक्य असतं, शिवाय चरितार्थाची जबाबदारीही त्यांच्याकडे असते, अशा विद्यार्थ्यांना लवकर स्वत:च्या पायावर उभे राहता यावं यासाठी अशा कोर्सेसची सोय राज्य शासनानं केली आहे.
विशेषत: दहावी उत्तीर्ण झाल्यावर या कोर्सेसना प्रवेश घेता येतो. 
मुख्यत: तीन टप्प्यांत हे कोर्सेस विभागले गेलेले आहेत.
यंदाच्या वर्षीपासून अभ्यासक्रमात थोडे बदल झालेले आहेत. काहींची नावं बदलली आहेत, काही अभ्यासक्रम एकत्र केलेले आहेत, काहींचा ढाचा बदललेला आहे, मात्र त्यांच्या मूळ स्वरूपात फार मोठा बदल झालेला नाही.
- प्रा. लक्ष्मीकांत भट
 
वाणिज्य शाखेतील कोर्सेस
वाणिज्य शाखेशी संबंधित कोर्सेस यात शिकवले जातात.
१) मार्केटिंग अँण्ड सेल्समनशिप २) ऑफिस मॅनेजमेण्ट
३) बॅँकिंग ४) पर्चेसिंग अँण्ड स्टोअर किपिंग ५) अकाऊंटिंग अँण्ड ऑडिटिंग ६) लघुउद्योग आणि स्वयंरोजगार
यातील ‘लघुउद्योग आणि स्वयंरोजगार’ या अभ्यासक्रमात स्वत:चा उद्योग जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल, कर्ज हवं असेल तर त्यासाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा यासंदर्भाची सगळी माहिती तर दिली जातेच, पण कामाच्या अनुभवापासून अनेक गोष्टी त्यांच्याकडून करवूनही घेतल्या जातात. लहान-मोठय़ा उद्योगांना भेटी देण्यापासून तर मोठमोठय़ा कंपन्यांत ‘अँप्रेन्टिस’ म्हणून अनुभवही घेता येतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकारनं अनेक मोठय़ा कंपन्यांना या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘अँप्रेन्टिस’ म्हणून प्रशिक्षणासाठी घेणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये अँप्रेन्टिसची जागा रिकामी असल्यास या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते. हाच अनुभव भविष्यात त्यांना चांगला उपयोगी पडू शकतो.
 
महिलांसाठीचे कोर्सेस
महिलांना उपयोगी पडतील असे काही कोर्सेस महिला महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांमध्ये हे कोर्सेस चालवले जातात.
१) कुकरी 
२) बेकरी अँण्ड कन्फेक्शनरी 
३) ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम
 
विज्ञान शाखेतील कोर्सेस
विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्यांसाठी या शाखेत साधारणपणे पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.
१) इलेक्ट्रॉनिक्स
२) इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स अँण्ड रिपेअरिग
३) डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (डीएमएलटी)
४) ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम

Web Title: The maximum of minimal skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.