यार, क्यूं इतना सोचते हो?

By Admin | Updated: November 5, 2015 21:49 IST2015-11-05T21:49:05+5:302015-11-05T21:49:05+5:30

कल कुछ नहीं होता.. मी ‘उद्या’चा विचार कधीच करत नाही! मुळात मी अतीविचारच करत नाही; ओव्हरथिंकिंग नाही, सेकंड थॉट नाही, काही नाही..

Man, why do you think so? | यार, क्यूं इतना सोचते हो?

यार, क्यूं इतना सोचते हो?

>कल कुछ नहीं होता..
मी ‘उद्या’चा विचार कधीच करत नाही!
मुळात मी अतीविचारच करत नाही; ओव्हरथिंकिंग नाही, सेकंड थॉट नाही, काही नाही..
त्या क्षणी जे मला वाटेल, त्याच्या भरवशावर -  माङया इन्स्टिंक्टवर निर्णय घेतो मी. त्यावर भरवसा ठेवतो. जे मनात येतं ते त्याक्षणी करून मोकळा होतो.
मी असेच निर्णय घेतो, त्यावर ठाम राहतो.
सगळेच निर्णय शंभर टक्के बरोबर ठरतात असं काही नाही. काही चुकतात, काही हरतात, काही लटपटतात आणि काही जन्मभराची ताकद देतात.
इट्स लाईक अ लाईफ.
सगळंच कसं तुमच्या मनासारखं होईल? समोर जी परिस्थिती असेल तिचा विचार करून तुम्ही निर्णय घेता, जी निवड केली ती निभावता. मी फक्त या प्रक्रियेत माङया विचारांपेक्षा माङया इन्स्टिंक्टवर थोडा जास्त भरवसा ठेवतो आणि एकदा निर्णय घेतला की मग पूर्ण ताकदीनिशी त्यावर ठाम राहतो. 
शंभर टक्के ट्रॅक रेकॉर्ड नाही माझंही यशाचं, सगळेच निर्णय काही पथ्यावर पडले नाहीत. फटके बसले, आपटलो, सगळं झालं. पण ओव्हरऑल आजर्पयत एकूण वाटचाल तरी चांगली झाली म्हणायची. त्याचं सूत्र एकच, डोक्यात जे जे आलं, त्या क्षणी ते ते करून टाकलं! 
अर्थात या सा:याला मी इन्स्टिंक्ट म्हणत असलो तरी बाकीच्या लोकांना तो उतावीळपणा वाटतो. घिसाडघाई वाटते. मी माझा हा इम्पलसिव्हनेस कमी केला तर कदाचित मी अजून कुणीतरी भारी, गेट्रबिट बनू शकेन असं त्यांना वाटतं!
होईलही तसं कदाचित, पण मुळात आज जे मिळालंय तेच आपल्याला कधी मिळेल याचा तरी मी कुठं विचारबिचार केलेला होता?
आपण करतोय त्यात रिस्क काय, परिणाम काय, असले पुचाट प्रश्न मी स्वत:ला विचारत बसलो नाही. मला वाटतंय ना, अमुक केल्यानं बरं वाटेल, उत्तम होईल, संपला विषय!
मग मी तेच केलं, मला वाटलं तसेच कपडे घातले, जे मनात येईल ते मीडियासमोरही खुलेपणानं बोललो. ज्या जाहिराती करायला आवडल्या त्या केल्या, जे रोल पटले ते निवडले, वाटेल तसा नाचलो, जीव ओतून काम केलं, मनापासून एकेक भूमिका जगलो.
पर्वाच केली नाही की, जे करतोय ते कुणाला आवडतंय का? कुणी काही म्हणतंय का?
कुणाला आवडो न आवडो, आपल्याला आवडतंय ना? फिल्मी नियमात बसो ना बसो, ते काम करताना मजा येतेय ना, मेरे लिए काफी था!
आणि गंमत पहा, हे सारं करताना माझा आत्मविश्वासही वाढत गेला. प्रत्येक गोष्ट माङया स्टाईलनं होऊ लागली. यश मिळायला लागलं.
आणि जे मी करतो तेच किती ‘अनकन्व्हेन्शनल’ आहे याची लोक चर्चा करू लागले. त्याचं कौतुक व्हायला लागलं. पारंपरिक पठडीतल्या गोष्टींना फाटा देऊन मी कसं ‘वेगळंच’ आणि ‘मॅजिकल’ असं काही करतो, असं लोक म्हणू लागले. 
आपल्या मनाप्रमाणो जगणं, हा खरा तर नियम असायला हवा ना, ते अनकन्व्हेशनल कसं?
धोका पत्करण्याची क्षमता, तयारी ही एक ताकद आहे असं मला नेहमी वाटतं. इतरांनी देवो ना देवो तुम्ही धोके पत्करुन आहे नाही ते पणाला लावण्याची ताकद स्वत:ला द्यायलाच हवी. मग कितीही फटके बसले तरी ती ताकद तुम्हाला जगवत राहते, वेगळं काहीतरी दाखवते, चाकोरी सोडून भलताच विचार करायला लावते. रिस्कच घ्यायची नसेल आणि खाल मानेनं दुनियेच्या नियमावरच चालायचं असेल तर पाहिजे कशाला आपल्या जगण्याची ही भानगड?
आपल्या पुढय़ात काहीतरी फॅसिनेटिंग येतं, ते आपल्याला चॅलेंज करतं आणि आपण रिस्क किती, याचा विचार करत प्लॅनिंगबिनिंग करतोय याचं मला हसूच येतं!
माझा नियम एकच, जस्ट गेट इन टू इट!!
 
(पण हे असं सारखं आपल्या मनासारखं वागताना त्रस नाही होत? आणि मनाविरुद्धच होत राहातं सगळं, तेव्हा?- त्यावरही रणवीरकडे एक सोल्यूशन आहे. कोणतं?- वाचा यावर्षीच्या ‘दीपोत्सव’मध्ये)
कंगणा आणि रणवीर.
दोघंही रुळलेल्या वाटांवरून, ठरलेल्या चाकोरीतून,
मळलेल्या वाटांवरून चालत आलेले प्रवासी कधीच नव्हते.
ते कायमच ‘वेगळे’!
रूढार्थानं त्यांना कुणी सुंदर मानत नव्हतं,
‘फिल्मी’ मानत नव्हतं
आणि ते ही हटून बसलेले,
आपण जसे आहोत, तसे आहोत म्हणत
स्वत:सारखं जगणारे!
जे मनात येईल ते करून मोकळे होणारे,
कुणाला ते उर्मट वाटले, कुणाला विचित्र!
पण कुणाला काय वाटलं, याची चिंताबिंता न करता
त्यांनी आपली वाट आणि आपला थाट काही सोडला नाही,
म्हणून तर आज त्यांच्या ‘वेगळेपणाची’
अर्थात अनकन्व्हेन्शल असण्याचे चर्चेत आहेत.
कसं जमलं हे त्यांना?
त्याचीच एक गोष्ट त्यांनी ‘लोकमत दीपोत्सव’ या दिवाळी अंकात सांगितली आहे.
त्याचीच ही एक छोटीशी झलक!
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Man, why do you think so?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.