मेक-अप

By Admin | Updated: July 18, 2014 11:39 IST2014-07-18T11:39:23+5:302014-07-18T11:39:23+5:30

सुंदर दिसणं, हे स्किल आहे, ते शिकायला नको?

Make-up | मेक-अप

मेक-अप

>मेकप? लग्नाबिग्नात करतात? ती काय रोज करायची गोष्ट आहे का? मुळात इंटलेक्चुअल लूक असणार्‍यांनी तर मेकप करायचाच नसतो.
सिम्पल रहायचं? डोळ्यात काजळ, ओठावर लिपस्टिकसुद्धा लावायची नाही.
हे असे समज अनेकांचे असतात. ज्यांना जे आवडतं ते त्यांनी करावं हे तर खरंच. पण जे लोक मेकप करतात. आपण चांगलं दिसावं म्हणून चेहर्‍याची, हातापायांची विशेष काळजी घेतात, ते रिकामटेकडेच असतात.
त्यांना नुसतं ‘दिसणं’च महत्त्वाचं वाटतं हे विचार आता जुनाट झाले.
नव्या काळात मेकप ही लग्नकार्यात आणि सणावारालाच करण्याची गोष्ट उरलेली नाही.
उलट ती रोज आणि नीट समजून उमजून करण्याची, शिकून घेण्याची आणि प्रमाणात करण्याची गोष्ट आहे.
अनेक मुली रोज लिपस्टिक लावतात.
पण लिपस्टिक नेमकी कशी लावतात हेच त्यांना कळत नाही.
तेच फाउंडेशनचं आणि तेच काजळ, पावडरचंही.
आयब्रो पेन्सिलपासून ते लिपलॉसपर्यंत काय आणि कसं लावावं?
केव्हा लावावं?
कसं लावलं नाही तर जास्त चांगलं दिसतं.
कुठल्या कपड्यांवर कसा मेकप केला म्हणजे आपली पर्सनॅलिटी जास्त चांगली दिसेल, चेहरा-डोळे उठून दिसतील, दोष झाकले जातील हे सारं खरंतर शिकून घ्यायला हवं.
तर तसं ते तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठीच हा एक नवा कोरा कॉलम.
मेकपच्याच नाही तर मेकपमागच्या मानसिकतेचा, त्याकडे पाहण्याच्या दृष्टीचा हा एक खास प्रवास.
या प्रवासात तुम्हाला सुंदर दिसण्याच्या अनेक युक्ती नक्की सापडतील.
- धनश्री संखे
ब्युटी एक्स्पर्ट
 
आयलायनर कसं लावायचं इथपासून लिपस्टिक कशी
निवडायची इथपर्यंत मेकपचे बरेच प्रश्न पडतात तुम्हाला.
मग ते आम्हाला नक्की पाठवा.
प्रश्न कुठे पाठवाल?
पत्ता - संयोजक, 'ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंबड, नाशिक -४२२०१०
 

Web Title: Make-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.