प्रेम परिकथेतल्यासारखंच नसतं! -करण जोहर

By Admin | Updated: June 30, 2016 12:34 IST2016-06-30T12:34:43+5:302016-06-30T12:34:43+5:30

आपण सर्वजण त्याला ‘कुछ कुछ होता है’चा दिग्दर्शक म्हणून ओळखतो. शाहरुख खानचा सर्वात जवळचा मित्र म्हणूनही त्याची ओळख आहे. तो अवॉर्ड शो होस्ट करतो, तो टीव्ही रिअ‍ॅलिटी शो जज करतो.

Love is not like a parikath! -Christian Johor | प्रेम परिकथेतल्यासारखंच नसतं! -करण जोहर

प्रेम परिकथेतल्यासारखंच नसतं! -करण जोहर

>- मयूर देवकर

आपण सर्वजण त्याला ‘कुछ कुछ होता है’चा दिग्दर्शक म्हणून ओळखतो. शाहरुख खानचा सर्वात जवळचा मित्र म्हणूनही त्याची ओळख आहे. तो अवॉर्ड शो होस्ट करतो, तो टीव्ही रिअ‍ॅलिटी शो जज करतो. तो सिनेमे लिहितो, तो सिनेमे प्रोड्यूस करतो. त्यांच्या लैंगिकतेबद्दल अविरत ‘गॉसिप’ चालते. सगळे सेलिब्रेटी बिनदिक्कत त्याला आपले सगळे ‘सिक्रेट्स’ सांगतात. असा तो करण जोहर. 

मेलोड्रामा, अतिरोमॅण्टिक, अतिश्रीमंत, एनआरआयसाठी बनवलेला अशी विशेषणे लावून त्याच्या सिनेमांना हेटाळले जाते. तरीदेखील ‘धर्मा प्रोडक्शन’चा एक तरी चित्रपट आपल्याला मिळावा म्हणून स्टार्सची धडपड चालू असते. हिंदी चित्रपटसृष्टीत तो आज आघाडीचा दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि कित्येक नवीन कलाकारांचा ‘गॉडफादर’ आहे. पण त्याच्या गुणांची, टॅलेंटची चर्चा होण्यापेक्षा त्याच्या ‘सेक्शुअ‍ॅलिटी’ बद्दलच जास्त बोलले जाते. आज चाळीशीत पोहचलेला करण मात्र याकडे दुर्लक्ष करून त्याला जे हवयं ते करतोय.

आता बहुतेक त्याने त्याच्या ‘विषयी होणाऱ्या ‘चर्चांना’ उत्तर देण्याचे ठरवले आहे, असे वाटतेय. नुकतेच एका वेबसाईटवर त्याने लिहिलेल्या स्तंभात अत्यंत निर्भिड आणि प्रामाणिकपणे त्याच्या सेक्स लाईफबद्दल सांगितले. लहानपणापासून ‘सेक्स’ या शब्दापासून तो कशा प्रकारे अनभिज्ञ होता. मुलासोबत याविषयी बोलताना त्यांच्या वडिलांना संकोच वाटायचा तर, आईकडून याबाबत कळण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. एकुलता एक असल्यामुळे भावंडांकडून समजण्याची शक्यतादेखील नव्हती.

अत्यंत लाजाळू असल्यामुळे त्याला मित्रदेखील नव्हते, जेणेकरून त्यांनी तरी त्याला ‘सेक्स’ विषयी सांगितले असते. मोठेपणी त्याला स्वत:चे शरीर आणि रंग-रुपाबद्दल न्यूनगंड निर्माण झाला. आपल्याकडे कोणी आकर्षित होईल याची त्याला शंका वाटायची. तो प्रांजळपणे कबुल करतो की, वयाच्या २६व्या वर्षी ‘कुछ कुछ होता है’मुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याने आयुष्यात पहिल्यांदा सेक्सचा अनुभव घेतला.

तो म्हणतो, प्रेम आणि सेक्स विषयी असणाऱ्या बऱ्याचशा संकल्पना या चित्रपटांपासून प्रेरित असतात. पण वास्तव त्याहून फार वेगळे असते याची जेव्हा प्रचीती येते तोपर्यंत खूप उशिर झालेला असतो. म्हणून मी आता अशा खुळचट कल्पनांवर विश्वास देत नाही. स्वत:बद्दल ‘सेक्सी’ न वाटण्यात काहीच गैर नाही. प्रेम साधंदेखील असू शकत. ते परिकथेप्रमाणेच असावे असा मी अट्टहास करत नाही. 

आपल्या टीकाकारांना निक्षुन सांगताना तो लिहितो, मी कोण? माझी सेक्शुअ‍ॅलिटी काय? हे जाणून घेणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, माझ्याविषयी गैरसमज पसरविले जातात म्हणून मी काही अपयशी नाही. मी आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आणि स्थानावर आहे तिथे पोहचणे बहुतेकांचे स्वप्न असते.
------------------
 

Web Title: Love is not like a parikath! -Christian Johor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.