शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील शास्त्रज्ञांचा शोध

By admin | Updated: April 4, 2017 17:23 IST

जागतिक हेरीटेज दर्जा असलेल्या सह्याद्रीमध्ये प्राण्यांची भरपूर विविधता आहे. परंतू सातत्याने सह्याद्री मध्ये होत असलेली जंगलतोड, विविध प्रकल्पांमुळे अधिवासांचा नाश, चोरटी शिकार इत्यादी विविध बाबींमुळेही प्राण्यांची विविधता धोक्यात आली आहे.

- सह्याद्रीच्या हाकेला तरुणांचा ‘अत्याधुनिक’ प्रतिसादजागतिक हेरीटेज दर्जा असलेल्या सह्याद्रीमध्ये प्राण्यांची भरपूर विविधता आहे. परंतू सातत्याने सह्याद्री मध्ये होत असलेली जंगलतोड, विविध प्रकल्पांमुळे अधिवासांचा नाश, चोरटी शिकार इत्यादी विविध बाबींमुळेही प्राण्यांची विविधता धोक्यात आली आहे.या सर्व विषयाबाबत नविन पिढीला माहिती व्हावी, सह्याद्री मधे प्राण्यांची काय विविधता आहे हे जावळून पाहता यावे, त्यांना असलेल्या धोक्याची कल्पना यावी तसेच एकूणच त्यांचे निसर्ग साखळीतील महत्व व संवर्धनाची गरज या सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध संस्थांच्या प्रयत्नातून आकाराला येत आहे. ‘ई-मॅमल सीटीझन सायन्स’ असे या प्रकल्पाचे नाव आहे.आयसीआयसीआय बँकेने पुरस्कृत केलेला व सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या वतीने नॉर्थ कॅरोलिना म्युझयिम आॅफ नॅचरल सायन्स, अमेरिका यांच्या सहकार्याने शाळाशाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यातील शास्त्रज्ञ बनवण्याचा हा एक प्रकल्प आहे. ई-मॅमल सीटीझन सायन्स प्रकल्प हा आपल्या गावात व आजूबाजूला असणा-या सस्तन प्राण्यांच्या अभ्यासाचा प्रकल्प असून त्यामध्ये सह्याद्रीतील सात जिल्ह्यातील २० शाळांतील आठवी व नववीचे विद्यार्थी आधुनिक ट्रॅप कॅमेरे, लॅपटॉप यांच्या वापरातून निरीक्षणे करणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, सातारा व कोल्हापूर या सात जिल्ह्यातील २० शाळांची निवड या प्रकल्पात करण्यात आली आहे. सह्याद्री निसर्ग मित्र व बी.एन.एच.एस.चे कार्यकर्ते सातत्याने दोन वर्ष या शाळामध्ये भेट देतील. प्रत्येक शाळेला अत्याधुनिक स्वयंचलीत व रात्रीच्या अंधारात प्राण्यांची हालचाल होताच फोटो काढणारे तीन कॅमेरे, लॅपटॉप व प्रोजेक्टर पुरवण्यात आले असून ते चालवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. हे विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या आजुबाजूला तसेच गावात विविध ठिकाणी हे कॅमेरे बसवतील. दर पंधरा दिवसानंतर त्यामध्ये येणारे फोटो हे लॅपटॉपच्या माध्यमातून ई-मॅमल या अमेरिकन अलायन्स आॅफ म्युझयिम्स, अमेरिका यांनी चालवलेल्या वेबसाईट्वर अपलोड करण्यात येतील. हा प्रकल्प सद्ध्या १९ देशांमध्ये राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातून आपल्या भागात कोणकोणते प्राणी दिसतात हे समजून येईल व त्याबाबत इंटरनेटच्या माध्यमातून हे विद्यार्थी जिल्ह्यातील २० शाळांना संपर्क करू शकतील तसेच जगभरात चालू असलेल्या या प्रकल्पातील विविध विद्यार्थी गटाशी संपर्क करू शकतील. दोन वर्ष चालणा-या या प्रकल्पात दोन वेळा यामध्ये आलेल्या फोटोंचे प्रदर्शन मांडण्यात येणार असुन सर्व शाळांमध्ये निसर्ग सहली, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक पातळीवर पोचण्याची संधी या प्रकल्पातून प्राप्त झाली आहे.