लॉँग कुर्ता आणि पलाझो

By Admin | Updated: September 3, 2015 19:47 IST2015-09-03T19:47:59+5:302015-09-03T19:47:59+5:30

सध्याचा सगळ्यात हॉट ट्रेण्ड कुठला? जास्त डोकं चालवूच नका. सरळ दीपिकाकडे पाहा!

Long Kurta and Palazzo | लॉँग कुर्ता आणि पलाझो

लॉँग कुर्ता आणि पलाझो

>- श्रवणी बॅनर्जी
 
सध्याचा सगळ्यात हॉट ट्रेण्ड कुठला?
जास्त डोकं चालवूच नका.
सरळ दीपिकाकडे पाहा!
तिचा पिकू लूक हा ट्रेण्डी दिसण्याचा सगळ्यात भारी फॉम्यरुला. तुमच्या नेहमीच्या पंजाबी ड्रेसलाही तुम्ही तसा लूक देऊ शकता.
त्यासाठीच या काही गोष्टी लक्षात घेऊन पुढचे तुमचे ड्रेस शिवायला टाका.
आणि दिसा ट्रेण्डी!
 
1) शॉर्ट टॉप्स, छोटय़ा सिल्व्हज विसरा. थ्री फोर्थ सिल्व्हजचे कुर्ते शिवा.
2) तेही लॉँग कुर्ते. नी लेंथच्या खाली.
3) शक्यतो पाकिस्तानी स्टाईलचे पंजाबी ड्रेस शिवा. त्यात तुम्ही उंच दिसू शकता.
4)  लॉँग कुर्ता, त्यावर पलाझो, मोकळे केस. हा लूक एकदम सोपा. एकदम ट्रेण्डी.
5) दुपट्टा, स्टोल ही गोष्ट पुन्हा इन झाली आहे, त्यामुळे जुने दुपट्टे शोधा. वापरा. लेटेस्ट लूक तयार!

Web Title: Long Kurta and Palazzo