शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर प्रकाश....मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 03:00 IST

मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं यालाच तर म्हणतात दिवाळी..यंदा आपल्या मनात हा यशाचा दिवा उजळू दे..

Our greatest weakness lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time.” - Thomas Edisonदिव्याचा शोध लावणारा एडिसन. या मुलाला काहीही येत नाही असं लेबल त्याच्या शिक्षकांनी त्याच्यावर चिकटवलं होतं. ‘स्टुपिड’ अशी पदवीच त्याला शाळेनं बहाल केली होती. काहीच धड जमत नाही म्हणून त्याच्या पहिल्या दोन नोकºया गेल्या. कामावरून काढून टाकलं गेलं त्याला. पुढे दिव्याचा शोध लागला. त्यावेळेस त्यानं सांगितलं की, एक हजारवेळा मी हा दिवा उजळवण्याचा प्रयत्न केला; पण काही जमलं नाही. तेव्हा त्याला कुणी विचारलं की म्हणजे तू हजारवेळा अपयशी ठरला होतास?त्यावर एडिसन म्हणाला, हजारवेळा अपयश नाही आलं तर या हजार पद्धतीनं हा दिवा लागत नाही हे मला कळलं..आता सांगा, ज्या जगानं एडिसनला स्टुपिड ठरवलं ते जग, आपल्याला जिनिअस ही पदवी सहज देऊन टाकेल का?आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न.हजारवेळा अपयश येऊनही आपल्याला हवं ते काम करण्याइतपत पेशन्स आपल्यात आहे का?आपण रडतोच फार..किती कारणं सांगतो, हे झालं म्हणून ते झालं आणि ते झालं नाही म्हणून हे झालं नाही..साधं उशिरा पोहचण्याचं उदाहरण घ्या..आपलं अपयशच ते, वेळेवर न पोहचण्याचं..पण आपण पटकन म्हणत नाही की, उशिरा उठलो म्हणून उशीर झाला..आपण फुटकळ कारणं सांगतो, पाऊस होता, गाड्या लेट, ट्राफिक जाम..म्हणजे आपल्या अपयशाचं खापर आपण सतत दुसºयाच्या डोक्यावर फोडायला पाहतो..ज्याला अपयश स्वीकारता येत नाही, तो यश काय स्वीकारणार?म्हणजे पहा..प्रश्न काहीही असो, अपयश कशातूनही येवो आपण त्यासाठी जबाबदार घटकांची यादी घेऊनच फिरतो..असं नाही म्हणत की, चुकलं माझंच काहीतरी, नाही जमलं मला, अंदाज फसला, कुवत कमी पडली, तयारी कमी पडली, क्षमता वाढवायला हवी..हे नाहीच..आपण सतत इतरांकडे बोट दाखवतो..कधी आपले पालक, कधी आर्थिक परिस्थिती, कधी समाज आणि कुणी नाहीच भेटलं तर देव आणि नशीब आहेतच..त्यांना दोष देऊन मोकळं व्हायचं..परिणाम?आपलं अपयश संपत नाही..आणि मग आपण म्हणतो, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही..अपयश म्हणजे काही आपल्यावरचा डाग नव्हे..उलट हारलो म्हणजे निदान आपण त्या खेळात तरी होतो हे सिद्ध होतं..हरणं वाईट नाहीच; पण त्या अपयशातून आपण किती पटकन उभे राहिलो यावर पुढची जित ठरते..धोनी सिनेमात एक प्रसंग आहे..शालेय क्रिकेटच्या काळातला..युवराज सिंगच्या संघाविरोधात हरण्याचा..धोनी सांगतो, पता है हम मॅच कहां हारे? बास्केटबॉल कोर्ट पर?कारण त्याचे सहकारी युवराजचा तामझाम पाहून तिथंच मनोमन पत्करतात की, याच्यापुढे आपला निभाव नाही..हे धोनीला कळलं म्हणून तो हरला नाही आणि हरला तरी संपला कधीच नाही..हे उभं राहणं जमेल आपल्याला?का नाही?दिवाळी हेच तर सांगते..मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणंआणि प्रकाशाची वाट चालणंयालाच तर म्हणतात दिवाळी..यंदा आपल्या मनात हा यशाचादिवा उजळू दे..हीच प्रार्थना..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017