लाईफस्टाईलचा बट्टय़ाबोळ

By Admin | Updated: October 1, 2015 17:44 IST2015-10-01T17:44:17+5:302015-10-01T17:44:17+5:30

खरंतर कुणालाही वाटेल की, पोर्न पाहण्याचा आणि लाईफस्टाईलचा काय संबंध? पण तो आहे.

Lifestyle ring | लाईफस्टाईलचा बट्टय़ाबोळ

लाईफस्टाईलचा बट्टय़ाबोळ

>खरंतर कुणालाही वाटेल की, पोर्न पाहण्याचा आणि लाईफस्टाईलचा काय संबंध?
पण तो आहे.
1)एकतर पोर्नसाईट्स पाहणारे ते सारं चोरी छुपे रात्री पाहतात. मग मध्यरात्र उलटून जाते, पहाट होते तरी अनेकजण जागेच.
त्यासा:याचा मनावरच नाही तर शरीरावरही ताण येतोच. त्यातून मग निद्रानाश ते अॅसिडीटी असे अनेक आजार छळू लागतात.
2)अॅसिडीटी, त्यातून होणारे पोटाचे विकास, चिडचिड, नैराश्य हे सारं अनेकांना घेरतं. मात्र आपल्या यासा:या विकारांचा संबंध आपल्या रात्री जागण्याशी आहे, हे कुणी मान्य करत नाही.
3)पुरेशा झोपेअभावी दिवसभर थकवा, चित्त एकाग्र न होणं, डिस्ट्रॅक्शन, कामावरचा फोकस हलणं, मग त्यासाठी चहा अती पिणं, सिगारेटचं प्रमाण वाढणं अशी एकातून एक चुकीच्या गोष्टींची मालिकाच सुरू होते.
4)जेवणाच्या वेळा बदलतात, उशीरा उठल्यानं व्यायामाला सुट्टीच, त्यातून वजन वाढतं, आणि रोजचा हा ताण सहन न झाल्यानं अनेकांना रक्तदाबाचाही त्रस बळावतो.
5)व्यक्तिगत आयुष्यात लोकांशी प्रत्यक्ष संवाद कमी होतो आणि त्यामुळे एकटेपणा घेरू लागतो. त्यातून गैरसमज आणि संशय बळावतात.
6)एकातून एक अनेक गोष्टी घडत राहतात आणि त्याला जबाबदार आपलं रात्री ‘तसलं काही’ पाहण्याचं अॅडिक्शन आहे हे अनेकांच्या लक्षातही येत नाही.

Web Title: Lifestyle ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.