लाईफ पुरुषोत्तमवालं...
By Admin | Updated: September 25, 2014 17:23 IST2014-09-25T17:23:59+5:302014-09-25T17:23:59+5:30
जल्लोष, सळसळता उत्साह, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, आणि मेहनत हे सारं म्हणजे ‘पुरूषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धा. तरुणाईचा तोच उत्साह जेव्हा पुण्यातल्या भरत नाट्यमंदिराच्या रंगमंचावर साकारतो तेव्हा जमलेली सारी तरुण गर्दी ‘वेडी’च होते. ४0-४५ मिनीटांच्या एकांकिकेसाठी ही मुलं अक्षरश: रंगमंचावर जीव काढून ठेवतात.

लाईफ पुरुषोत्तमवालं...
>- धनश्री भावसार
जल्लोष, सळसळता उत्साह, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, आणि मेहनत हे सारं म्हणजे ‘पुरूषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धा. तरुणाईचा तोच उत्साह जेव्हा पुण्यातल्या भरत नाट्यमंदिराच्या रंगमंचावर साकारतो तेव्हा जमलेली सारी तरुण गर्दी ‘वेडी’च होते. ४0-४५ मिनीटांच्या एकांकिकेसाठी ही मुलं अक्षरश: रंगमंचावर जीव काढून ठेवतात. यंदा या स्पर्धेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. नेहमीच्या मातब्बर कॉलेजची जिंकण्याची परंपरा खंडित करुन नव्याच महाविद्यालयाच्या मुलांनी यंदा हा करंडक जिंकला.
त्या विजेत्या संघाच्या लेखक-दिग्दर्शकांची ही खास ‘ऑक्सिजन’साठी एक मैफल. पुरुषोत्तम ते जगले कसे हे सांगणारे काही आठवणीतले क्षणच.
चिठ्ठी
आयएलएस विधी महाविद्यालय
लेखक-दिग्दर्शक: अपूर्वा भिल्लारे
सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकरांची ही मूळ कथा तशी अगदी लहानशी आणि साधी, परंतु तिची एकांकिकेसाठी निवड केल्यानंतर त्याचे संहिता लेखन व दिग्दर्शन अपूर्वाने केले. खेडे गावातील एक कुटुंब. प्रौढ साक्षरता योजनेसाठी त्या घरचा प्रमुख काम करत असतो. मात्र त्याची बायको अशिक्षित. एकदा मात्र तिच्या हाती एक चिठ्ठी लागते आणि आपल्या पतीला एका शिकलेल्या बाईने काय चिठ्ठी दिली आहे, हे ईर्षेने वाचण्यासाठी ती कशी शिकते, यावर ही कथा रंगलेली आहे.
चिठ्ठी लिहिणारी अपूर्वा
पुरुषोत्तम करायचं म्हणून आमच्या संघानं बर्याच कथा वाचल्या होत्या; परंतु ही अगदी साधी सोपी आणि शेवटी चेहर्यावर एक गोड ‘स्माइल’ आणणारी कथा आम्हाला आवडली. प्रौढ साक्षरता हा विषय आता शहरात तेवढा तीव्र वाटत नाही, मात्र खेड्यात आजही ती समस्या आहे. गंभीरही आहेच. त्यामुळे काय काय अडचणी येतात, कशा गंमती जमती घडतात हे आम्ही यातून मांडायचं ठरविलं.
आमच्या आजूबाजूला बहुतांश शिकलेलीच लोकं होती. त्यामुळे असाक्षरतेने येणार्या अडचणी काय, त्यांची तीव्रता नेमकी लक्षात येत नव्हती. मग त्यावर काम सुरू केले. ही योजना काय? ती कशी राविली जात होती? त्या काळातील शिक्षकांशी, जेथे राबवली गेली तेथील गावकर्यांना भेटलो, बोललो. आठवडाभर आम्ही हे सारं समजून घेत फिरलो होतो.
त्यानंतर आमचे संहितेचे काम सुरू झाले. कथेच्या सादरीकरणात अधिक खूसखूशीतपणा यावा म्हणून काही प्रसंग बदलले. हे बदलतानापण आधी प्रयोग म्हणून करून बघितले. त्यामुळे अधिक मजा येतेय असं वाटल्यावरच ते बदल कायम ठेवले. खरे तर ही एकांकिका अभिनयावर खूप जास्त अवलंबून होती. त्यामुळे संवादापेक्षा अभिनयानेच यात जास्त मजा आणली. मात्र ती मजा आली आम्ही गावात जाऊन केलेल्या निरीक्षणामुळेच. ही मजा निरीक्षणामुळे आली. म्हणजे खेड्यातल्या बायकांची देहबोली कशी असते, काहीजणी बोलता बोलता भसकन एका विषयावरून दुसर्याच विषयावर टुणकन उडी मारतात, त्यांच्या बोलण्याची, चालण्याची लकब, आवाजाची पट्टी हे सारं ‘पाहिलं’ म्हणून अभिनयात उतरवता आलं. दोन महिने आम्ही ‘चिठ्ठी’वालेच झालो होतो. तोच विचार करायचो. आपण जिंकूच असं वाटलं नव्हतं, पण टफ फाईट द्यायच्या इराद्यानं उतरलो.आणि जिंकलोच !
- अपूर्वा भिल्लारे
करावं तेवढं कौतुककमीच !
१५-१८ वर्षांपूर्वी मी पुरुषोत्तम केलं होतं.
पुरुषोत्तम करणं काय असतं हे मला माहितीये,
त्यानंतर आता डायरेक्ट परीक्षक म्हणूनच मी पुन्हा ‘पुरुषोत्तम’ला गेले.
कॉलेजात शिकणारी ही मुलं त्यांच्या कामाचं, कष्टाचं कौतुक करायलाच हवं. मात्र मला महत्त्वाचं काय वाटतं, या मुलांना क्लासिक आणि सद्याच्या काळात जे घडतंय ते ‘इक्वली’ चांगल्या पद्धतीनं कळतं. आजूबाजूला जे घडतंय ते समजून त्यावर भाष्य करण्याची ताकद त्यांच्यात आहे, हे मला फार लक्षणीय वाटतं. त्यांचं वाणीवर प्रभूत्व आहे, बॉडी लॅँग्वेज कळते, संहिता उत्तम समजते. मुख्य म्हणजे फोकस कळतो. काही एकांकिका पाहताना तर मला वाटलंही की विसरून जावं मी परीक्षक आहे, आणि धावत जाऊन या मुलांना मिठय़ा माराव्या. आयुष्याबद्दलचं त्याचं आकलन फार चांगलं आहे. काही कथा किंवा कॅरेक्टर्स अनेक एकांकिकात कमजोर होते, तांत्रिक गिमिक करण्याचा प्रयत्नही कुणी कुणी केला. पण संहिता, अभिनय, दिग्दर्शन आधी तांत्रिक भाग दुय्यमच असतो, याची समज अनेकांना होती. मला तरी खूपच कौतुक वाटले या मुलांचे, अत्यंत टॅलेण्टेड मुलं आहेत ही सारी !
- सोनाली कुलकर्णी
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि यंदाच्या
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या परीक्षक
जन्मभराची दोस्ती झाली
लेखक एक चौकट आणि रस्ता आखून देतो. त्या चौकटीत आपण हवे तसे खेळू शकतो. फक्त ठरलेल्या मुक्कामाला पोहचणे आवश्यक. मला संहिता मिळाली की, ती कलाकारांना समजावून सांगायची आणि मग अभिनय करायचा असे चालायचे. सीन समजवून सांगितला की सगळे जण चर्चा करत. त्यात काय छान करता येइल याचा विचार होत. मग ते करून बघायचे. आवडलं तर कायम ठेवायचं नाहीतर काढून टाकायचं. खरं तर आधी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असंच आम्ही म्हणत होतो. कारण सगळेच पहिल्यांदाच रंगमंचावर उतरणारे होते. आम्ही इंजिनिअरिंगची मुले. पण पुरूषोत्तमच आमचा मुख्य अभ्यासक्रम आणि अभ्यास हे एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टीव्हीटी असं झालं होतं. त्यात काही मुलींच्या घरून फोन मग त्यांच्या आई-वडिलांना समजावायचं, करू द्या तिला काम असं बटर लावायचं. या सगळ्यात खूप छान नातं, एक वेगळंच बाँडिंग तयार झालं. जे आता जन्मभर पुरेल !
- पलाश हासे
हिय्या
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय लेखक- संदी दंडवते, दिग्दर्शक-दीपक बाविस्कर
रोजच्या जगण्यात अनेकांना आपण पाहत असतो, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये टिपत असतो; परंतु त्याचा आपल्या आयुष्याशी काही संबंध आहे याची जाणीवच नसते. ते जग असतं पण आपल्याला दिसूनही दिसतच नाही. तशाच कामगारा विश्वातली ही कहाणी. नेमून दिलेले काम करायचे, फारसा डोक्याला ताण घ्यायचा नाही. अशाच पठडीतील पोल उभारणार्या कामगारांची ही कहाणी आहे. एक साधं पोल उभारण्याचं काम, पण ते कसं होतं, त्यात काय नाट्य घडतं. हे दाखविण्याचा आणि आपल्या अवतीभोवती जे घडतंय ते आपल्याला ‘दाखविण्याचा’ हिय्या हा एक अत्यंत सुंदर अनुभव आहे.
उचललाच जड खांब
ंलघुपटाच्या धावपळीत असल्यानं मी खरंतर पुरुषोत्तम करणार नव्हतो. यापूर्वी तीन वेळा पुरुषोत्तम केले आहे. पण पुरुषोत्तम करण्याची गंमत माहिती होती. त्यामुळे शेवटी न राहवून अर्ज भरलाच. मागच्या वर्षीच्या टीम पैकी फक्तचार जणच माझ्या यंदाच्या टीममध्ये सहभागी झाले. बाकी संपूर्ण टीम नवीन होती. त्यामुळे विशेष मेहनत घ्यावी लागणार हे माहितच होते. ऑडीशन घ्यायचं ठरलं. ३९ मुलं-मुली आली. दुसर्या दिवशी त्यातले फक्त २६ उरले. माझा मित्र किंवा मैत्रिण आली म्हणून मी आलो/आली असं म्हणून येणारेच बहुतेक होते. आधी आम्ही कुणाला सांगितलंच नाही की मीच डिरेक्टर आहे, मी फक्त त्यांचं निरीक्षण करत होतो. या काळात मी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, मूळ स्वभाव, बोलण्या-वागण्याची पद्धत या गोष्टी जाणून घेतल्या. ज्याचा मला एक एक पात्र निवडण्यात फार फायदा झाला. ही एकांकिका कामगारांच्या रोजच्या जीवनावर आधारित अत्यंत साधी गोष्ट होती. त्यामुळे त्या पात्रांशी साधम्र्य असणारी मुलं मला निवडणं फार महत्त्वाचं होतं.
परंतु एवढय़ावरच थांबून चालणार नव्हतं. जिथे कामगार काम करतात, तिथं या मुलांना नेलं. तुमच्या पात्राच्या मिळतजुळतं माणूस शोधा, त्याच्या वागण्याबोलण्याचं निरीक्षण करा, असं सांगितलं. ते त्यांनी केलं, त्याचा फार उपयोग झाला. सुमारे दीड महिना या आम्ही पुरूषोत्तम वातावरणात होतो. काही प्रसंग हे माइमपद्धतीने साकारण्यात आले. त्यातील एक म्हणजे पोल उचलून आणण्याचा प्रसंग होता. जड खांब उचलल्यावर चेहर्यावरील भाव, हाताला पडलेला पिळ, दिसणार्या शिरा यावर खूप काम केले. प्रत्यक्षात हातात जड खांब नसताना तसे भाव आणणे हे खरेतर कठीण होतं. पण ते आम्हाला जमलं.
- दीपक बाविस्कर
मळभ
एमआयटी सीईओ लेखक- हृषिकेश दातार दिग्दर्शक-पलाश हासे
लघुपटाच्या धावपळीत असल्यानं मी खरंतर पुरुषोत्तम करणार नव्हतो. यापूर्वी तीन वेळा पुरुषोत्तम केले आहे. पण पुरुषोत्तम करण्याची गंमत माहिती होती. त्यामुळे शेवटी न राहवून अर्ज भरलाच. मागच्या वर्षीच्या टीम पैकी फक्तचार जणच माझ्या यंदाच्या टीममध्ये सहभागी झाले. बाकी संपूर्ण टीम नवीन होती. त्यामुळे विशेष मेहनत घ्यावी लागणार हे माहितच होते. ऑडीशन घ्यायचं ठरलं. ३९ मुलं-मुली आली. दुसर्या दिवशी त्यातले फक्त २६ उरले. माझा मित्र किंवा मैत्रिण आली म्हणून मी आलो/आली असं म्हणून येणारेच बहुतेक होते. आधी आम्ही कुणाला सांगितलंच नाही की मीच डिरेक्टर आहे, मी फक्त त्यांचं निरीक्षण करत होतो. या काळात मी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, मूळ स्वभाव, बोलण्या-वागण्याची पद्धत या गोष्टी जाणून घेतल्या. ज्याचा मला एक एक पात्र निवडण्यात फार फायदा झाला. ही एकांकिका कामगारांच्या रोजच्या जीवनावर आधारित अत्यंत साधी गोष्ट होती. त्यामुळे त्या पात्रांशी साधम्र्य असणारी मुलं मला निवडणं फार महत्त्वाचं होतं.
परंतु एवढय़ावरच थांबून चालणार नव्हतं. जिथे कामगार काम करतात, तिथं या मुलांना नेलं. तुमच्या पात्राच्या मिळतजुळतं माणूस शोधा, त्याच्या वागण्याबोलण्याचं निरीक्षण करा, असं सांगितलं. ते त्यांनी केलं, त्याचा फार उपयोग झाला. सुमारे दीड महिना या आम्ही पुरूषोत्तम वातावरणात होतो. काही प्रसंग हे माइमपद्धतीने साकारण्यात आले. त्यातील एक म्हणजे पोल उचलून आणण्याचा प्रसंग होता. जड खांब उचलल्यावर चेहर्यावरील भाव, हाताला पडलेला पिळ, दिसणार्या शिरा यावर खूप काम केले. प्रत्यक्षात हातात जड खांब नसताना तसे भाव आणणे हे खरेतर कठीण होतं. पण ते आम्हाला जमलं.
- दीपक बाविस्कर
वास्तव हेच नाटक
कोणत्याही विचारावर, कल्पनेवर नाटक होऊ शकते. परंतु ते प्रभावी कसे होइल हे महत्त्वाचे. यासाठी आमची सगळी टीम एकत्र बसली. महिनाभर विचार केला, पण कथा काही आवडे ना. कथा खूप वास्तव दश्री असावी हे नक्की होतं. उगाचच नाटकीपणा किंवा लार्जर दॅन लाइफकाही दाखवायचं नव्हतं. कथेशी प्रेक्षक जोडले जायला हवे. त्यांना प्रसंग आणि त्यातील विचार पटायला हवा होता. तसं करायचं एवढाच प्रयत्न मी केला.!
- हृषिकेश दातारएक जोडपं एका अनधिकृत सोसायटीत राहत असतात. ते घर त्यांना सोडावंच लागणार असतं. सोबत त्याचा मतीमंद भाऊ. ज्याला ते बाळासारखे सांभाळत असतात. त्यामुळे यांना स्वत:चं मुलबाळही नसतं. अशा परिस्थितीत त्या भावाला तिथेच सोडून निघून जायचे का? की घेऊन जायचं? मग आपल्या आयुष्याचं काय या सार्या भावनांचा संघर्ष म्हणजे हे मळभ.