जिंदगी है चॉकलेटी?
By Admin | Updated: October 22, 2015 21:52 IST2015-10-22T21:52:53+5:302015-10-22T21:52:53+5:30
तरुण जगण्याचं एक्सप्रेशनच बदलून टाकणा:या आणि कडवट लागता लागता तोंड ‘गोड’ करणा:या चॉकलेटी दुनियेची भन्नाट सैर!

जिंदगी है चॉकलेटी?
- अनघा पाठक
तरुण जगण्याचं एक्सप्रेशनच बदलून टाकणा:या
आणि कडवट लागता लागता तोंड ‘गोड’ करणा:या
चॉकलेटी दुनियेची भन्नाट सैर!
मागच्या आठवडय़ात जगभरातल्या चॉकलेटवेडय़ांना आपण इंग्लंडमधे का राहत नाही याचं दु:ख होत होतं.
कारण जे चॉकलेटी सुख गेल्या आठवडय़ात लंडनच्या रस्त्यांवर होतं, त्यातला मॅडनेस त्यालाच कळू शकतो,
ज्यांचं चॉकलेटवर जिवापाड प्रेम आहे.
नॅशनल चॉकलेट वीक.
आठवडाभर फक्त चॉकलेटचं सेलिब्रेशन झालं..
जे चॉकलेट खातात, बनवतात, विकतात, टेस्ट करतात, भेटी देतात अशा अनेक ‘तज्ज्ञांची’ भाषणं चॉकलेटच्या दुकानात रंगली होती.
भेटींसाठी चॉकलेटचे कारखाने खुले होते. गिफ्ट म्हणून चॉकलेटवेडय़ांनी एकमेकांना दुर्मीळ, महागडी, वेगळी, डिझायनर चॉकलेट्स भेट दिली.
अनेक रेस्त्रॉँनी तर स्पेशल चॉकलेट मील म्हणजेच चॉकलेट मुख्य मेन्यू असेल असे जेवण प्लॅन केले होते. चॉकलेट फेशियल ते चॉकलेट स्पा ते चॉकलेट नाईट्स अशा अनेक कल्पना या काळात अक्षरश: चॉकलेटी झाल्या.
हे असं सारं आणि एवढं बाकी जगाच्या वाटय़ाला येत नाही; फार्फार तर एक चॉकलेट डे साजरा होतो कॉलेजात आणि एखादी कॅडबरी एकमेकांना देत केवळ फॉर्मलिटी होते त्या दिवसाची!!
**
मात्र ज्यांचं चॉकलेटप्रेम असं एका दिवसापुरतं नसतं आणि चॉकलेटची किक ज्यांना दुनिया विसरायला भाग पाडते.
त्यांच्या जगात एरवीही चॉकलेटचं महत्त्व अपार असतं! इतकं की, सध्या मार्केटिंगचे उस्तादही तेच सांगताहेत. सध्याची कुठलीही गाजणारी चॉकलेटची जाहिरात आठवून पाहा.
त्यांचं म्हणणं एकच, जर तुम्ही चॉकलेट खात असाल तरच तुम्ही वय विसरून, जगाची काळजीबिळजी सोडून मस्त स्वत:च्या आनंदात नाचाल आणि जगालही!!
दोन चॉकलेटवेडय़ा भावांपासून ते भर रस्त्यात नाचणा:या सासूसुनांर्पयत आणि पास होणा:या पप्पूपासून लालच को उमर नहीं म्हणण्यार्पयत, सगळ्यांचं म्हणणं एकच, चॉकलेट खाणं म्हणजे तरुण असणं, आपल्या नियमानं जगणं, जग गेलं उडत!
चॉकलेटनं असा तरुण असण्यालाच नवा आयाम दिला आहे.
ब्रेकप झालेल्या अनेकजणी एकामागून एक चॉकलेट खाताना दिसतात. स्वत:ला फील गुड करवतात.
परीक्षेचं टेन्शन, मित्रंशी भांडण, एक सॉरी, एक प्रपोज, थोडीशी गंमत, राखीचं गिफ्ट, बर्थडेचं गिफ्ट, छोटीशी ट्रीट असं काहीही असो.
चॉकलेट साथ करतंच.
असं काय आहे या चॉकलेटमधे जे तरुण मुलांच्या जगण्याचा भाग नव्हे, तर तरुण जगण्याचीच परिभाषा बनतं आहे.?
कशाच्या जोरावर तमाम पारंपरिक मिठायांना मागे टाकत दिवाळीचं गिफ्ट म्हणून चॉकलेटचे बॉक्स सजताहेत.
कशासाठी आता पुन्हा होममेड नी हॅण्डमेड चॉकलेटची क्रेझ वाढतेय?
आणि काय म्हणून स्वत:च्याच प्रेमात पडत पुन्हा पुन्हा कडसर चॉकलेटची गोडूस चव जगण्याला गुलाबीसर चॉकलेटी शेड देतेय.?
याच सा:या चॉकलेटी प्रवासाची
आणि त्यातल्या आपलीच एक खास भेट
पान 4-5वर
कुछ खास है
जिंदगी में!