शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लायफाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:27 IST

वायफायपेक्षा जलद असणारं एक नवीन तंत्रज्ञान

बटन दाबलं आणि तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाउनलोड !हे शक्य आहे का? तर आहे. कारण आता वाय-फायची जागा लाय-फाय हे तंत्रज्ञान घेणार असून, त्याचा वेग वाय-फायपेक्षा १०० पट अधिक आहे. या माध्यमातून एक जीबी डाटा ट्रान्समिट करण्यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागतो. या तंत्राचं नाव लाय-फाय (लाइट फिडॅलिटी) आहे. या तंत्राच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गॅजेटला इंटरनेट अ‍ॅक्सेस देणं शक्य आहे.स्लो नेट हे जगभरातलं केवढं मोठं दु:ख. किती ती पेशन्सची परीक्षा. त्यावर पर्याय म्हणून लाय फाय विकसित झालंय. लाय-फायची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘लाय-फाय’द्वारे कम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये एक जीबी डेटा ट्रान्समिट करणं शक्य होणार आहे. म्हणजे एक सिनेमा अवघ्या एका सेकंदात डाउनलोड करता येणार आहे. २०११ मध्ये स्कॉटलॅण्डमधील एडीनबर्ग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लाय-फायचं संशोधन केलं आहे.वाय-फायच्या तुलनेत शंभरपट वेगवान असलेल्या लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड या देशांमध्ये केला जात आहे. वाय-फायच्या तुलनेत लाय-फायचा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाहीत. कारण प्रकाश हेच माहिती वहनाचे साधन असल्यानं प्रकाश चोरणं हॅकर्सलाही शक्य नाही. हे वाय-फायपेक्षा खूप सुरक्षित आहे कारण त्याची रेंज भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मोठ्या कार्यालयांसाठी माहितीचे वहन करणं सोपं होईल. महत्त्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे. आता वाचायला थोडं अजब वाटत असलं तरी भविष्यात हे लायफाय वापरलं जाईल, तो भविष्यकाळ फार काही लांब नाही.- प्रा. योगेश हांडगे(लेखक पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

टॅग्स :Socialसामाजिक