शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

त्या विषयांवर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:03 PM

एकीकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव, दुसरीकडे निवडीचं-नकाराचं स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि लैंगिक कलाचा स्वीकार हे सारं तरुण मुला-मुलींर्पयत पोहोचवण्याचा एक प्रयत्न

ठळक मुद्दे लेट्स टॉक सेक्शुअ‍ॅलिटी- शास्त्रीय माहिती पुरवण्याचा एक प्रयत्न

 मिनाज लाटकर 

आपल्या भारतीय समाजात लैंगिकता हा विषय अत्यंत खासगी विषय समजला जातो. लैंगिक शिक्षणाची चर्चा होते; पण आजही शाळा-कॉलेजात त्याचं स्थान गेस्ट लेक्चर आणि एक्स्ट्रा लेक्चर पुरतं मर्यादित आहे. खरं तर आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दलचं अज्ञान, अंधश्रद्धा पाहता लैंगिक शिक्षण हा विषय सक्तीचा हवा; पण तो त्याविषयी बोलणं टाळणं हाच सर्वत्र एककलमी कार्यक्रम दिसतो. लैंगिक शिक्षण म्हणजे सेक्स, असं नाही. आपलं शरीर, जनेंद्रिय, वयात येताना होणारे बदल, हे बदल होत असताना होणारे परिणाम, गर्भधारणा, मासिक पाळी अशा अनेक बाबींचा समावेश त्यात होतो. मात्र शास्त्रीय माहितीचा अभाव असतो. कुणी शास्त्रीय माहिती मोकळेपणानं देत नाही. सगळ्यांनाच सगळं कळतं असं मानून चालतात. मात्र तसं नसतं, वयात येणार्‍याच काय पण तरुण मुला-मुलींनाही अनेक प्रश्न असतात. कुणाशी तरी बोलायचं असतं. पण तशी व्यक्ती उपलब्ध नसते, मग आताशा त्यांच्या हाती नवीन उपकरण आलं आहे. माहिती हवी असली की कर गुगल. मात्र नेटवर माहिती शोधताना फक्त शास्त्रीय आणि आरोग्यहिताचीच माहिती मिळेल असं काही नाही. तिथं सगळाच सताड उघडा मामला. एकीकडे लैंगिकतेविषयी काहीच शिक्षण नाही आणि दुसरीकडे इंटरनेटनर काय आणि कसं शोधावं, याला कोणतेच नियम नाही. अशा वेळेत योग्य माहितीऐवजी चुकीची माहिती, भलत्याच साइट सापडल्या की त्यातून काही गैरसमज निर्माण होतात. त्याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, समाजावर होऊ शकतात. इंटरनेटच्या माध्यामातून जेव्हा माहिती शोधतो त्यावेळी त्या माहितीची सत्यता पडताळण्याची कोणतीच यंत्नणा नाही. अशा परिस्थितीत लैंगिकतेसारख्या संवेदनशील विषयावर माहिती देणारे योग्य पर्याय निर्माण होणं हे खूप महत्त्वाचं आहे.याच संवेदनशील मुद्दय़ावर तरु णांशी संवादाचा प्रयत्न पुण्यातील ‘तथापि ट्रस्ट’ letstalksexuality.com  या वेबसाइटच्या माध्यमातून करत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाने उपलब्ध करून दिलेली ‘स्पेस’ सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने वापरणं हा यामागचा उद्देश आहे. ‘सेक्स आणि बरचं काही’ ही  या वेबसाइटची टॅग लाइन आहे. या टॅगलाइनमध्ये अनेक अर्थ सामावले आहेत. शरीरसंबंधांपलीकडे प्रश्न याशिवाय अपंगत्व आणि लैंगिकता यासारख्या दुर्लक्षित विषयांवर माहिती दिली जाते. लैंगिकता ही संकल्पना यापेक्षा खूप व्यापक आहे. प्रेम-मैत्नी-आकर्षण, निरनिराळे लैंगिक कल, आवडी-निवडी, लिंग आणि लिंगभाव, आरोग्य, अन्याय आणि हिंसा अशा अनेक गोष्टींचा समावेश लैंगिकतेच्या संकल्पनेत होतो. या वेबसाइटवर या सर्व विषयांवर तरु णांशी मोकळा संवाद साधला जातो. याशिवाय ग्रामीण, आदिवासी भागात, शहरात अशा ठिकाणी जाऊन विद्याथ्र्याना मार्गदर्शन केलं जातं. इथं मुलांना आपलं म्हणणं मांडता येतं, प्रश्न विचारता येतात आणि त्यांच्या शंकांना उत्तरंही दिली जातात.

*** 

संमती आणि सुरक्षिततासंमती र्‍ लैंगिक व्यवहारात सामील असलेल्या आणि कायद्यानं सज्ञान असलेल्या व्यक्तींनी विनासंमती केलेला व्यवहार कायद्याने जसा गुन्हा समजला जातो तसाच तो एखाद्या व्यक्तीच्या खासगीपणाच्या अधिकाराचेही उल्लंघन असतो.  सुरक्षितता र्‍  हेही तेवढंच महत्त्वाचं मूल्य आहे. मग सुरक्षितता आजार आणि संक्र मणापासून असो की नको असलेल्या गर्भधारणेपासून. लैंगिक व्यवहारातील असुरक्षितता विशेषतर्‍ मुलींच्या एकूणच आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकते. लैंगिकतेची चर्चा करताना लिंगभाव समानता, भिन्न लैंगिक कलांबद्दलचा स्वीकार, समोरच्या व्यक्तीबद्दल आदर आणि निवडीचे स्वातंत्र्य या मूल्यांनाही तितकंच महत्त्व आहे याबाबतचं मार्गदर्शनही तरुण मुलांना केलं जातं.     सहभागातून संवाद वाचकांना आपल्या मनातील, आपल्या लैंगिकतेशी संबंधित कुठलाही प्रश्न इथे विचारता येतो. ज्याचे उत्तर तीन ते चार दिवसांच्या आत त्यांना दिले जाते. त्यासाठी त्यांना आपली ओळख जाहीर करण्याची किंवा इतर काही माहिती देण्याची गरज नसते. बहुतेक प्रश्नांची उत्तरं तथापिचे प्रशिक्षित कार्यकर्ते देतात; पण जिथे तांत्रिक किंवा औषधं, आजारांशी संबंधित प्रश्न असतात तिथे लैंगिकतेच्या क्षेत्नातील तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर्स यांची एक टीम त्या त्या प्रश्नांची उत्तरं देतात. वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, लैंगिकता, शिक्षण आणि आपुलकी ही तत्त्व प्रत्येक उत्तर देताना काटेकोरपणे पाळली जातात. असं तथापि ट्रस्टचे सदस्य अच्युत बोरगावकर  सांगतात.अधिक माहितीसाठी - http://www.tathapi.org/