शिकण्या-समजण्याची अनुभुती

By Admin | Updated: July 14, 2016 16:46 IST2016-07-13T18:47:37+5:302016-07-14T16:46:49+5:30

तरुणांमध्ये नेतृत्वगुण, शरीर साक्षरता, वस्ती साक्षरता विकसित होण्यासाठी ‘अनुभुती’ या सामाजिक संस्थेमार्फत पुढाकार घेऊन मुंबईमध्ये विनामूल्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं

Learning experience | शिकण्या-समजण्याची अनुभुती

शिकण्या-समजण्याची अनुभुती

>- प्रवीण दाभोळकर
तरुणांमध्ये नेतृत्वगुण, शरीर साक्षरता, वस्ती साक्षरता विकसित होण्यासाठी ‘अनुभुती’ या सामाजिक संस्थेमार्फत पुढाकार घेऊन मुंबईमध्ये विनामूल्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. तरुणांना सक्षम करण्याच्यादृष्टीने अनुभूतीने मुंबईमधून तरुणांचं एक जाळं तयार करण्याचा हा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या दिपा पवार आणि त्यांचे सहकारी गेली दीड वर्षे करत आहेत.
दादरच्या छबीलदास शाळेत अनुभूतीचे एकदिवसीय शिबीर संपन्न झालं. त्यात मुबंई, ठाणे, कल्याण परीसरातील संघिटत, असंघिटत क्षेत्रात काम करणाया अनेक तरुणांनी सहभाग घेतला. तरुण एकत्र येऊन देशातील राजकारण, समाजकारण, आर्थिक दरी यावर विचारमंथन करतात. सध्या ३० सदस्य या नेटवर्क मध्ये सक्रीय आहेत.  ग्रामीण भागातील, शहरी वस्त्यांमधील युवा युवतीसोबत सत्र , कार्यशाळा, शिबीरं, गटकेंद्री चर्चा, वादविवाद सत्र ,खेळ, अभिनय या माध्यमांचा वापर केला जात आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जात, आर्थिक स्तर , शहरी - ग्रामीण तफावत, प्रांतीय दरी, भाषीक वाद, लिंगभिन्नता , धार्मिक सत्तेचा कशा प्रकारे परिणाम होत असतो यावर तरुण म्हणून आपली भूमिका काय असते हे याची अनूभूती चर्चेच्या माध्यमातून तरुणांना येत असते. 
तरु णांसोबत काम करत असतानाच शासकिय तसेच निमशासकीय कर्मचायांसोबतही त्यांचे सामाजिक जिवनातील अनुभव आणि  प्रश्न , शंका यांची या कायद्याच्या  अनुषंगाने खोलवर चर्चा अनुभूतीमार्फत करण्यात आली. यावेळी महिला कर्मचाºयांनीही त्यांना आलेले वेगळे  अनुभव मोकळेपणाने मांडले . लैंगिक हिंसा म्हणजे काय?  हा कायदा कशा  प्रकारे लैंगिक छळविरोधात प्रभावी भूमिका बजावतो? या कायद्याअंतर्गत येणाºया महत्त्वपूर्ण बाबींचा खुलासा यावेळी करण्यात आला .
 फेसबुक, ट्विटर, ब्लॉग अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा अनुभूतीचा प्रयत्न सुरु  आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात जबाबदार तरु ण घडविण्याचय अनुभूतीचे उद्दीष्ट असल्याचं मुख्य समिती सदस्य दिपा पवार  सांगतात.

Web Title: Learning experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.