शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

शिकलोही शिकवलंही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:00 IST

डॉक्टर व्हायचं ठरवलं, शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मग ठरवून शाळा काढली गावात..

- रवींद्र दयाराम निकम

माझं प्राथमिक शिक्षण जालना जिल्ह्यातल्या कंडारी (काकडे) या गावी झालं. माध्यमिक शिक्षण घ्यायला मी भडगाव तालुक्यातल्या कजगावला गेलो. दहावी पास झाल्यावर पुढं काय करायचं हे ठरवायला काही मार्ग नव्हता. कुणी माहिती द्यायलाही नव्हतं. वर्गमित्र डॉक्टरच्या कोर्सला जायचं म्हणाले म्हणून मीही निघालो. डी.एच.एम.एस. करायला गेलो. १९८४ सालची ही गोष्ट. फार जुनी; पण सांगावी वाटली म्हणून सांगतोय. शिक्षण झाल्यावर त्या काळी मी पारोळा तालुक्यातील करमाड या दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावी दवाखाना सुरू केला. बोरी धरणाच्या बॅक वॉटरनं करमाड खुर्द व करमाड बुद्रूक हीे दोन्ही गावं पावसाळ्यात पाण्यानं वेढलेली असायची. मलेरिया, कावीळ, टायफाइड, कॉलरा यांसारख्या आजारांनी अनेक लोक त्रस्त असत. गरिबीमुळे बहुसंख्य लोक इंजेक्शन तर उधार घेत, परंतु औषधं मात्र विकत घेणं त्यांना शक्य नसायचं. पैसे नाहीत म्हणून एकाही रुग्णाला मी उपचाराविना परत पाठवलं नाही. हे तत्त्व तेवढं जपलं.

डॉक्टरकी करताना एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हावं असंही वाटायचं. बारावी आर्ट्सचा १७ नंबर फॉर्म भरून दिला आणि बाहेरून बी.ए. केलं. एम.ए. केलं. एमपीएससीची पूर्वपरीक्षा पास झालो; पण मुख्य परीक्षेत यशस्वी झालो नाही. या दरम्यान एक गोष्ट जाणवायला लागली होती. माझी आजी, आई, माझी पत्नी या तांदुळवाडी गावच्याच. आमच्या गावात हायस्कूल नसल्यामुळे पालक मुलींना जेमतेम चौथी किंवा सातवीपर्यंत शिकवत. माझ्या आई आणि पत्नीच्या बाबतीत तेच घडलं होतं. मुलींना शिकण्याची सोय नव्हती. पालक लहान वयातच मुलींचं लग्न करून टाकत.

मग मी ठरवलं आपणच गावात हायस्कूल सुरू करायचं. शाळेला मान्यताही मिळाली, पण शिक्षक मिळेनात. छोट्याशा गावात शाळा चालेल की नाही, शासन अनुदान देईल की नाही, असे प्रश्न होतेच. त्यात गावात शिक्षक टिकेनात. मग मी स्वत: बी.एड. केलं आणि शिक्षकी पेशा स्वीकारला. आज माझी शाळा प्रगतिपथावर आहे. रोज नवीन गोष्टी शिकतो आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शालेय व्यवस्थापन पदविका २००५ साली पास झालो. शाळेचे लिपिकही कॉम्प्युटर शिकले. २००६ सालापासून शाळेचं कामकाज संगणकावर चालू आहे. आज माझी ही शाळा डिजिटल झाली आहे. शाळा सुरू करण्याचा एकमेव उद्देश गावातील मुली शिकाव्यात हा होता. तो सफल झाला.(तांदुळवाडी, ता. भडगाव, जि. जळगाव) 

टॅग्स :educationशैक्षणिक